7.28.2019

सापांचे जग (The World of Snake )

सापांचे जग

आपल्या देशात सुमारे २५६ प्रकारचे सर्प आढळून येतात त्यातील ६९   प्रजाती या विषारी आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण ५५ सर्पजाती आढळून येत असून त्यातील नाग, मण्यार,घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत.



 नाग (Cobra) विषारी साप



 घोणस (Viper) विषारी साप

उर्वरित सर्व प्रजाती उदा.धामण, कवड्या, डुरक्या-घोणस, नानेटी, हरण टोळ, श्वान सर्प,  मंडोल (दुतोंड्या),  रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडणाऱ्या प्रजाती असतात.


हरणटोळ साप  (Tree snake)  बिनविषारी साप

                                                                 धामण ( Rat Snake) बिनविषारी साप




साप हे  जमिनीत बिळे, दगड-विटांचे  ढिगारे, झाडाझुडपातील जागा, मोकळी मैदानी जागा, भात शेती तसेच सपाट  भूभाग ही सर्पांची मुख्य आश्रय स्थाने आहेत. मात्र जागतीकीकरणामुळे, गगनचुंबी इमारतीच्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते आणि हे सर्प निसर्गाकडून मानवी वस्तीत येतात.


कोणत्या प्रकारचा सर्प घरात आल्यास त्याला न मारता, निष्णात आणि अनुभवी साप पकडणाऱ्यास बोलवावे,
घराजवळ लोकांची गर्दी करु नये, सर्पास  कपाटामागे अडगळीत, बिळात तसेच  खोलीच्या आतील बाजूस जाण्यापासून रोखावे,  संध्याकाळच्या वेळेस दारे बंद ठेवावीत. घरातील, पडवीतील दिवे लावावेत,
विजेरी पटकन मिळेल अशा ठिकाणी ठेवावी .सापास घरातून बाहेर हुसकावण्यास लांब काठी, तारेचा आकडा,
छत्रीचा आकडा यांचा उपयोग करुन सर्पास मानवी वस्तीपासून दूर सोडावे.

 विषारी बिन-विषारी सर्पाचा दंश 
सर्वसाधारणपणे सर्पाचा दंश माणसाच्या हाताला किंवा पायाला होत असतो. दंश झालेल्या ठिकाणी तो साप जर विषारी असेल तर  त्या जागी विषदंतांच्या दोन खुणा स्पष्टपणे आढळून येतात आणि साप जर बिनविषारी असेल तर तशा खुणा आढळून येत नाहीत.








 विषारी सर्प दंशाची लक्षणे

 सर्पाचे विष फिकट पिवळसर  आणि पारदर्शक असून काहीसं चिकट असतं.मज्जासंस्थेवर परिणाम करणारे न्युरोटॉक्सीक  आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे हिमोलॅटीक असे त्याचे दोन प्रकार असतात.


नाग, मण्यार समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जा संस्थेवर विषाचा परिणाम होतो व त्याचे पुढील
दुष्परिणाम दिसून येतात.

  1. दंशाच्या जागी सूज येऊन बधीरपणा येतो. 
  2. श्वासोच्छवासास त्रास होतो. जीभ आत ओढली जाते. 
  3. तोतरेपणा येतो, डोळे मिटू लागतात, 
  4. व्यक्ती बेशुद्धावस्थेतून कोमात जाण्याची शक्यता निर्माण होते. 
  5. विष हृदयापर्यत गेल्यास पांढऱ्या रंगाचा फेस तोंडातून बाहेर पडतो
  6. तो तोंडावाटे बाहेर पडू श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आणि अखेर हृदयक्रिया बंद पडून
  7. माणसाचा मृत्यू ओढवतो.

- रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या विषाची (सर्पदंशाची) लक्षणे कोणती?*

  • एखाद्या व्यक्तीला घोणस, फुरसे,
  • हिरवा घोणस या सर्पांनी दंश केला असता त्याच्या विषाचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या रक्ताभिसरणावर होतो.
  • सर्पदंश झालेल्या जागी बरीच सूज येऊन तो भाग हूळहूळा होऊन लालसर दिसू लागतो.
  • त्वचा काळी निळी पडते. रक्तवाहिन्यातील रक्तात गुठळ्या निर्माण होऊन ते रक्त तोंड,नाक, कान याद्वारे बाहेर पडू लागतं. शरीरात
  • विष अधिक प्रमाणात भिनल्यास पोटातील आतडी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे विष महारोहीणी द्वारे हृदयापर्यंत जाते
  • आणि अखेर शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयास न झाल्याने मृत्यू होतो.

 सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार


सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर दहा ते पंधरा मिनिटांच्या आत प्रथमोपचार आवश्यक आहे.
सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉल च्या पाण्याने धुवावी. हाताला सर्पदंश झाला असल्यास कोपराचे वर म्हणजेच दंडावर (एकेरी हाडावर ) पायास सर्पदंश झला असता गुडघ्याच्यावर (एकेरी हाडावर ) म्हणजेच मांडीवर दोरी किंवा कापडाचा तुकडा, दुपट्टा, वडाची पारंबी, केळीचे सोप, केपर बँडेज, किंवा आवळपट्टी बांधावी ज्यामुळे सर्पाचे विष शरिरातील अन्य भागात पसरण्यास मज्वाव होईल.
 नाग, मण्यार या सर्पांद्वारे दंश झाल्यास चिरा छेदन पद्धतीचा उपयोग करता येतो. सर्पदंशाचे दोन व्रणांवर पाव सेंटीमीटर लांब, रुंद आणि खोल  अशी तिरपी चिर द्यावी .जेणेकरुन जखम  उघडी होऊन त्या द्वारे ५० टक्के विष
आणि विषारी रक्त शरीराबाहेर पडून प्रवाहित होईल.

पोटॅशियम परमँगनेट (KmNO4)च्या द्रावामध्ये विषातील २६ विषघटकांपैकी ५० टक्के विष-घटकांचे
निराकरण करण्याचे सामर्थ असल्याने एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात पोटॅशियम परमँगनेटचे चार ते पाच कण टाकून ढवळावे व सर्पदंशाच्या जागेवर याची संतत धार धरावी.



सौजन्य -वन्यजीव प्रेमी,whats app

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home