10.03.2019

गुणकारी मेथी

                 गुणकारी मेथी 


मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
गुणधर्म --- 
पौष्टिक,  भरपूर  कँल्शियम,  स्वादिष्ट,  वायुनाशक,  कफनाशक,  रक्तशुद्धिकारक,  ज्वरनाशक,  कडवट  चव,  मलनिस्सारक.
***
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.

1.एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.

2. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.

3. मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.

4. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.

5. मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.

6. अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.

7. उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.

8. मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.

9. मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.
***

10.  मधुमेह  असणाऱ्यांनी  मेथी  दाणे  चघळून  खाल्यास  चांगला  लाभ  होतो.  किंवा रात्री  भिजत  ठेवून  सकाळी  पाण्यासह  खावे.  शरीरातील  वायूपण  दूर  होतो.
 (प्रमाण १ / २ चमचे)

11. पोटाच्या  काही  तक्रारी  असल्यास  किंवा  ताप  असल्यास  मेथी  दाण्यांचा  काढा  आवश्य  प्या.  लवकरच  गुण  येतो.

12. अशक्तपणात  मेथीची  भाजी  खाल्ल्याने  शक्ती  वाढते.

13. वात  विकार  उदा.  सांधेदुखी,  कंबरदुखी,  टाचदुखी,  गुडघेदुखी,  खांदेदुखी  यावर  एक  लहान  चमचा  मेथी  पूड  +  एक  कप  दूध  मिक्स  करून  रात्री  झोपतांना  घ्या.  किंवा 
मेथी  दाणे  पाण्यासोबत  गिळा. (प्रमाण १ चमचा)

14. पोट  साफ  लवकर  होण्यासाठी  मेथीची  भाजी  आवश्य  खा.  भरपूर  फायबर  ( तंतू )  आहेत.  किंवा 
लहान अर्धा  चमचा  मेथी  दाणे  रात्री  पाण्यासोबत  गिळा.

15. मेथी  स्त्रियांसाठी  फार  उपयुक्त  आहे. मासिकपाळीच्या  सर्व  तक्रारी  दूर  होतात. आवश्य  मेथीचा  वापर  करा.

16. पचनसंस्थेच्या  तक्रारी  दूर  होतात.

17. मेथीचा  पाला  वाटून  केसांना  लावल्यास  डोक्यातील  कोंडा  जातो.  केसांची  चांगली  वाढ  होते.  मुलायम  राहतात.

18. आहारात  मेथीचा  वापर  केल्याने  रक्त  लवकर  शुद्ध  होते.तसेच  शरीरपण  आतून  लवकर  स्वच्छ  होते.

19. मेथीचा  पाला  रस  +  गाजर  रस  +  काकडी  रस  +  मध  मिक्स  करून  सकाळी  रिकामे  पोटी  रोज  घेतल्यास  लिव्हरला  आलेली  सूज ,  काविळ,  डोकेदुखी,  दमा,  T B  व  अनिद्रा  इत्यादी  आजारात  खूप  फायदा  होतो. (प्रमाण १  ग्लास)

20. आठवड्यातून  २ / ३  वेळा  तरी  मेथीभाजी  खावी.

19.  मेथी  दाणे  पोटात  गेल्यावर  चांगले  फुगतात.  त्यामुळे  पोट  लवकर  साफ  होते.

No comments: