12.05.2019

आह्रातील साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे परिणाम

हारातील साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे  परिणाम

साखर हा शरीरासाठी सर्वात उपयोगी पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण साखर पचनामध्ये सहाय्य करते, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते. पण असे असले तरी अति साखरेचे दुष्परिणामही दिसून येतात.
साखरेच्या अतिसेवनामुळे चरबी वाढते, लठ्ठपणा, मधुमेह आणि डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
*तर मंडळी या साखरेच्या अतिसेवनाला सर्वात जास्त कारणीभूत आहे चहा आणि नंतर इतर गोड गोष्टी आल्याच.*
दिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळा चहा पितो तसेच वेगवेगळे गोड पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शेवटी नाईलाजाने आपण साखर खाणे पूर्णपणे बंद करतो.
पण मित्रहो तुम्हाला माहित साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो आहे का? चला जाणून घेऊ या!
१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृद्य हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. साखर कमी केल्याने तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.
तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.
३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.
४.  साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.
*५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.*
६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.
*साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.*
७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.
साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.
८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.
९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, कारण साखर ही पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.
१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधे दुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहापासून सुटकारा मिळू शकतो.

No comments: