7.30.2019

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।। - Dr. Vidhin Kamble

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
श्री संत तुकाराम 

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात ओक्सिजन असलेली हवा शिरते आणि त्याच्या या निसर्गात जगण्याचा प्रवास सुरु होतो. जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत निसर्गाने मोफत दिलेले घेऊन जगत असतो पण त्याला त्याची जाणीव होत नाही. जणू देवाने त्याच्याच साठी हा निसर्ग बनवला आहे असे वाटते. परंतु मानवाने या गोष्टीकडे बारकाईने पाहून त्याची किंमत ठरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला हे निसर्गाचे कर्ज सात जन्मात फेडता येणार नाही. या कर्म करंट्या मानवाला थोडासा हिशोब करून दिला पाहिजे म्हणजे त्याचे डोळे उघडतील. आणि आपलाही या निसर्गाचे काहीतरी देणे लागतो एवडे समजले तरी या लेखाचे सार्थक झाले असे मी समजेन.
एक व्यक्ती २४ तासात २७ हजार वेळा  श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी त्याला दररोज ३ कीलो ओक्सिजनची गरज भासते. आणि ती गरज पुर्ण करण्यासाठी ७ मोठ्या वृक्षांची गरज असते. ३ किलो ओक्सिजनची बाजारातील किंमत वर्तमान  बाजारभावानुसार २१०० /- रु आहे. जर एक व्यक्ती आपले आयुष्य ६५ वर्षे जगला तर तो या निसर्गातून ५ कोटी रुपयाचा ओक्सिजनची मोफत वापरतो. मोबदल्यात स्वतःच्या श्वासोच्छवासा साठी लागणारे १  झाड सुध्दा लावत नाहीत .उलट मृत्यूनंतर अग्निसंस्कारासाठी लागणाऱ्या ९ मण (३६० किलो)  लाकडासांठी एका मोठ्या वृक्षाचा बळी दिला जातो. विचार करा जेवढी आपली आयुष्यातील एकूण मिळकत नसते तेवढ्या कोटी रुपयाचा ओक्सिजनची  आपण निसर्गातून मोफत वापरतो पण त्याची परतफेड आपण कधीच करीत नाही
या निसर्गाची परतफेड करायला शिका. झाडे लावा झाडे जगवा.  आणि पुढच्या पिढ्यांनाही जगण्याचा हक्क प्राप्त करून द्या. 


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home