4.29.2021

मेंढरामागचं 'पोर निघालं लै थोर ! अमोल पांढरे

 


मेंढरामागचं 'पोर निघालं लै थोर !

अमोल पांढरे


एक प्रेरनादाई लेख 



         लोटेवाडीचा मेंढपाळपुत्रआबा लवटे UPSC मार्फत घेण्यात येणा-या IES परिक्षेत देशात २१ वा आला आहे. विशेष म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत मेंढरामागं फिरणा-या आबा लवटे याने देशपातळीवरील या परिक्षेत थेट २१ वी रॅंक मिळवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या घवघवीत यशामुळे सर्वच स्तरावरुन आबा लवटेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर जिद्दचिकाटीमेहनत आणि संघर्षाच्या जोरावर मात करत आबासाहेबाने आकाशाला गवसणी घालणारे हे यश मिळविले आहे. शेळ्या – मेंढ्या राखण्यापासून ते ऊसतोडी करण्यापर्यंत अनेक अंगमेहनतीची आणि कष्टाची कामं करत आबाने हे यशोशिखर गाठले आहे. त्यामुळे आबाचा हा प्रवास आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.

     असं म्हणतातकी ज्या समाजाच्या डोळ्यासमोर कोणतेही 'आदर्शनसताततो समाज कदापी 'आदर्शबनू शकत नाही. त्यामुळे आदर्श समाजनिर्मितीसाठी समाजासमोर चांगले आदर्श असले पाहिजेत. त्या अनुषंगानेच आबा लवटे यांचा हा चित्तथरारक असा संघर्ष एक आदर्श म्हणून पाहूयात...त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा हा एक विशेष वृत्तांत...

    आटपाडी आणि सांगोला तालुक्याच्या सीमेवर लोटेवाडी नावाचे गावं वसले आहे. लोटेवाडी हे सांगोला तालुक्यात आहे. मात्र गावापासून आटपाडी जवळ असल्यामुळे अनेक दैनंदिनं व्यव्हार आटपाडीतूनच चालतात. अशा लोटेवाडी या गावात सुबराव ईश्वरा लवटे यांच्यापोटी आबा लवटे यांचा जन्मं झाला. आईचे नाव हौसाबाई आई घरकाम करते आणि इतर वेळात शेतामळ्यातली कामं तिच्या नशीबी असतात. लहानपणी आबाच्या नशीबी सतत भटकंती होती. कारण वडील मेंढरं राखायचे आईसुद्दा मेंढरामागं असायची त्यामुळे आपसूकच आबालाही आपल्या लहानं भावंडांसह मेंढरामागं रहावं लागायच. आबाला एक बहीण आणि एक भाऊ आहे. ही सर्व भावंड परिस्थितीशी दोन हात करत शिक्षणासाठी धडपडत होती. त्यातच आबाला लहानपणी शिक्षणात जास्त रस नव्हता. इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंत आबाला शिक्षण घेण्याबरोबरच पारंपारिक व्यवसाय म्हणून मेंढरंही राखावी लागत. त्यामुळे आबाचा शिक्षणाकडे ओढा कमीच होता. आबाचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी पर्यंत लोटेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. आई – वडील ऊसतोडीही करायचे. त्यामुळे आबाला ६ महिने आई - वडिलांसोबत ऊसतोडी करण्यासाठी जावे लागायचे आणि राहिलेल्या काळात जमेल तशी शाळा शिकायची. असा त्याच्या प्राथमिक शाळेचा प्रवास होता. त्यानंतर ५ वी ते १० वीन्यू इंगलिश स्कुल लोटेवाडी या शाळेत आबाचे शिक्षण झाले. दरम्यानं परिस्थितीअभावी आबाच्या भावाला ८ वीतून शिक्षणं सोडावं लागलं. तर इयत्ता १० वीतून बहिणीचं शिक्षणं बंद झालं. मात्र आबा सर्वात धाकटा असल्याने त्याचे शिक्षण पुढे सुरु राहिले.  

   आबाचे आई – वडील ऊसतोड कामगार म्हणूनही कामं करत होते. वडील मुकादमं होते. मात्र आठवीत असतानावडील सुबराव लवटे यांच्या ऊसतोड टोळीतील ऊसतोडणी कामगार उचलं घेवूनही कामावर आले नाहीत. त्यापैकी कांहीजण तोंड चुकवून फिरु लागले. त्यामुळे वडील कर्जबाजारी झाले आणि संपुर्ण घर अडचणीत आले. कर्ज वाढत गेले आणि शेवटी कर्जाला कंटाळून वडिलांनी घर सोडले. त्यामुळे वडीलांचे आई – वडील म्हणजे आज्जी आणि आजोबा यांनीच या सर्वांचा सांभाळ केला. ईयत्ता ८ वीत असताना हा प्रसंग घडला. त्यामुळे आबाच्या आयुष्याला एकप्रकारे कलाटणी मिळाली आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कुटुंबाची उन्नती आणि प्रगती करायची असेल तर शिक्षणच घ्यावे लागेल. हे मनाला पटले मात्र ९ वी पर्यंत शाळेतल्या शिक्षकांची आबासाहेबांना जामं भिती वाटत होती. त्यामुळे आबा शाळेला अनेक दांड्या मारायचा. ईयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असताना वर्ग शिक्षकांनी आबाला लाख मोलाचे मार्गदर्शनं केले. शिक्षणाचे महत्व सांगत त्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे आबाच्या मनातील सर्व किंतू दूर झाले आणि आबाने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. परिणामी १० वी च्या परिक्षेत आबाला तब्बल ७३.५३ टक्के गुण मिळाले. त्यानंतर मात्र आबाने पुन्हा कधीही मागे वळूनं पाहिले नाही. एकामागून एक यशाचे अनेक टप्पे त्याने पार केले.

     ११ वीला आबाने आटपाडी येथेआबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र गरीबी पाठ सोडायला तयार नव्हती. परिस्थिती आबासाहेबाच्या अनेक परिक्षा घेण्यासाठी संधी शोधत होती. त्यातच आबाला महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज लोटेवाडी ते आटपाडी असा १२ कि. मी. चा प्रवास सायकलवरुन करावा लागत असे. त्यामुळे १२ कि. मी. सायकलवरुन जाणे आणि १२ कि. मी. येणे म्हणजे दररोज २४ कि. मी. चा सायकल प्रवास त्याला करावा लागत होता. पण जेवढे मोठे धेय्य तितका मोठा संघर्ष हे सूत्र आबाला माहित असल्याने त्याने न डगमगता आपला प्रवास सुरुच ठेवला. परिस्थिती किती बिकट होती... त्यासाठी आबासाहेबांना किती संघर्ष करावा लागलायाचे एक -हदयद्रावक उदाहरण म्हणजेआबा ११ वीच्या वर्गात शिकत असतानाएकदा फार मोठा पाऊस पडला होता. लोटेवाडीहून आटपाडीला जाताना वाटेत माणगंगा नदी आडवी लागते. विशेष म्हणजे या नदीला फक्त पावसाळ्यातच पाणी येते. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. आणि पाण्यामुळे नदीवरचा पुल कट झाला होता. पाणी पुलावरुन वाहत होते. मात्र आबाला पूल कट झाल्याचे लक्षात आले नाही. नेहमीप्रमाणे तो सायकलवरुन शाळेला निघाला आणि पूल ओलांडत पुढे जात असतानाच तो सायकलसहित नदीमध्ये पडला. त्यामुळे पाठीवर असलेली शाळेची बॅग पुर्णपणे भिजलीपुस्तकं भिजलीमात्र पुस्तकं आणि बॅग सावरायच्या नादात आबासाहेबाच्या हातून सायकलचे हँडल निसटले आणि सायकल पाण्याबरोबर डोळ्यासमोर वाहून गेली. रडत – खडत आबा पोहतच काठावर आला. अंगाला पाण्यातील काटे ओरबडले होते. मनाला वेदना होत होत्या. कारणंत्याची स्वतःची सायकल आदल्याच दिवशी चोरीला गेली होती. म्हणून शाळेला जाण्यासाठी आबाने शेजा-याची सायकल मागून घेतली होती आणि ती सायकलपण अशा पद्दतीने नदीत वाहून गेली. त्यामुळे काय करावे ते सूचत नव्हते. परंतूअशा संकटाने खचून जाईल तो आबासाहेब कसला त्याने पुन्हा लढायचं ठरवलं. त्यासाठी बहीणीने आणि भावाने हजारो हत्तींच बळं दिलंत्यांनी आबाला नवी सायकल घेवून दिली. त्यामुळे आबासाहेब नव्या जोमाने अभ्यासाला लागला.

    ११ वी सायन्सला गणित विषयात आबा नापास झाला. त्यावेळी ट्युशनची गरज होती. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे त्याने घरीच अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याची ही सवयच त्याला आज इथपर्यंत घेवून आली आहे. स्वतः अभ्यास करण्याची सवय लागल्यानेट्युशनशिवाय अभ्यास करत १२ वी सायन्सला आबाला ७१ टक्के मार्क्स मिळाले. या मार्कांच्या जोरावर आबानेबॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ( बी.ई ) साठीआण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगआष्टा येथे प्रवेश घेतला. आणि अभ्यासात स्वतःला झोकून दिले. विशेष म्हणजे आबाने या ठिकाणीही आपल्या विलक्षण बुद्दीमत्तेची चमक दाखवतइंजिनिअरिंगच्या या चारही वर्षात वर्गात सर्वप्रथमं येण्याची किमया केली. शेवटच्या वर्षी गेट परिक्षेचा अभ्यास सुरु केला. मात्र पहिलाच प्रयत्नं असल्याने तो केवळ पास झालाचांगले मार्क्स मिळाले नाहीत. त्यानंतर आबाला स्पर्धा परिक्षांची गोडी वाटू लागली. या परिक्षांची त्याने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये इंजिनिअरिंगमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजेइंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसअर्थातच  IES असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळेअभियांत्रिकी विभागाशी संबंधित अनेक खात्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. म्हणून आबाने IES होण्याचा चंग बांधला.

     २०१६ ला IES चा पहिला अटेंप्ट दिला. मात्र रिझल्ट फेल म्हणून आला. त्यानंतर २०१७ ला परीक्षेचा पॅटर्न बदलला म्हणूनआबाने २०१७ – २०१८ ला पोस्ट ग्रँज्युएशनं केले आणि आबा M.Tech. झाला. दरम्यानं गेट [GATE- Graduate Aptitude Test in Engineering] परिक्षा देणे सुरुच होते. परंतू खुप जादा इम्प्रुव्हमेंट होत नव्हती. २०१९ मध्ये आबाने पुन्हा एकदा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विविध खात्याच्या परिक्षाही दिल्या. मात्र त्यामध्ये यश आणि अपयश असा सामना रंगला होता. महाडिस्कॉमची परिक्षा - फेलमहाट्रान्सको - पासमहाजनको - फेलएसएससीजेई - फेलआरआरबीजेई – पासएमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एका मार्कात गेले. कारण जागा एकच होती. तर दुसरीकडे गेटची परिक्षा २०१५१६१७१८१९२०२१ ला सलग ७ वेळा उत्तीर्ण होण्याचा बहुमानं आबाने मिळविला. इतकेच काय तर युजिसीची नेट परिक्षाही तो पास झाला. तर दुसरीकडे २०१९ ला इस्त्रोच्या परिक्षेत त्याला अपयश मिळाले. २०१९ ला बीएआरसीच्या परिक्षेतही त्याला अपयशच लाभले. मात्र आबाने आपली लढाई सुरुच ठेवली.

     २०१९ ला IES ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुप अभ्यास केला. परंतूदुर्देवाने आबा पुर्व परिक्षा फेल झाला. त्याचा माणसिक त्रासही झाला. दरम्यानं अविनाश सोनुरे हा सच्चा मित्र आबाला भेटला आणि या मित्राने आबाला जिंदगीचे रहस्य उलगडून सांगितले. तो म्हणाला कीआबा... आपल्याकडे गमवायला कांहीच नाही. मात्र कमवायला खूप कांही आहे. त्यासाठी आपला लढा कष्टाशी असला पाहिजे. त्यामुळे लढा सुरु ठेव…..! कारणंहे दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. मित्राचा हा लाख मोलाचा सल्ला ऐकूनआबाने आपला लढा नेटाने सुरु ठेवला. अभ्यासावर संपुर्ण लक्ष केंद्रीत केले परिणामी २०१९ ला गेट परिक्षेत ८१.३३  मार्क्स मिळाले. त्यानंतर एन.पी.सी.आय.एल. कंपनीमध्ये इंटरव्यू दिला. मात्र याठिकाणीही अपयशाला सामोरे जावे लागले.

     २०१९ ला IES च्या पुर्व परिक्षेचा आबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला. त्यामुळे २०२० ची IES ची पुर्व परिक्षा ते पास झाले. परंतूमुख्य परीक्षेची तारिख जवळ येत असतानाच लॉक डाऊन सुरु झाले. त्यामुळे हा विषय रखडला. त्यामुळे २०२० मध्ये घरीच राहून पुढील परिक्षेचा अभ्यास सुरु केला. दरम्यानं डिसेंबर २०२० मध्ये बीएआरसीचा [ भाभा अणुसंशोधन केंद्र] इंटरव्यू झाला आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून Electrical Engineering मधून आबा लवटे याचीच एकट्याची निवड झाली. ५ जानेवारीला निकाल लागला आणि १७ जानेवारी २०२१ ला जॉयनिंग झाले. त्यामुळे यश आता पाठीमागे लागले होते.

     मार्च २०२१ मध्ये रखडलेला IES परिक्षेसाठीचा इंटरव्यू होता. हा इंटरव्यू दिल्लीत होता. त्यामुळे आबासाहेबांना दिल्लीला जावे लागणार होते. यानिमित्ताने आबासाहेबांचा दिल्लीला पहिल्यांदा प्रवास झाला. इंटरव्यू एकदम व्यवस्थित पार पडला आणि १२ एप्रिल २०२१ ला IES चा रिझल्ट लागला. यादीत आबासाहेबांचे नाव झळकत होते. त्यांची ऑल इंडिया रॅंक २१ होती. लहानपणी मेंढर राखताना जे स्वप्नं बघितलं होत. आई – वडिलांचे नाव करायचेगावाचे नावं करायचेस्वतःचे कर्तुत्व जगासमोर सिद्द करायचे ते स्वप्नं या यादीत नावं आल्यामुळे ख-या अर्थाने साकार झाले होते. मेंढरामागची पोरं लई हुशार’ या म्हणीची आबासाहेबाने जगाला पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली होती. आकाशाला गवसणी घालणा-या आबासाहेबांच्या या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. आज त्यांच्या या यशाचे पोवाडे गायले जात आहेत. म्हणूनअमोल पांढरे आणि मित्र परिवाराकडूनही आबासाहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना खुप सा-या शुभेच्छा.

       आबासाहेबांना त्यांच्या या प्रवासात त्यांचे १० वीचे वर्गशिक्षक मा. श्री. ढेरे सर यांचे तसेच त्यांचे इतर सर्व शिक्षकमित्रमंडळीग्रामस्थ यांचेही मार्गदर्शनं आणि सहकार्य लाभले. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट (आदमापुर )ने त्यांना विशेष आधार दिला. त्यामुळे ते या सर्वांचे आज आभार मानतं आहेत. आपले आई – वडिल आणि घरच्या मंडळींचा त्यांना दांडगा अभिमान वाटतोय. आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद आठवण सांगतानाआबासाहेब सांगतात कीकर्जबाजारी होवून घर सोडुन गेलेले माझे वडील २०१४ साली घरी परत आले. आल्यानंतर त्यांनी लोकांचे कर्ज परत केले व आयुष्यभर संत बाळूमामांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग आयुष्यातील सर्वात सुखद प्रसंग आहे. आबासाहेब सध्या मुंबईत बी. ए. आर. सी या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत.

 

   गरीबीची जाणं असल्याने आबासाहेबांना यापुढील आयुष्यात आपल्या परिने इतरांना मदत आणि मार्गदर्शनं करायचे आहे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनाही सहकार्य करायचे आहे. तसेच ज्यांच्यामुळे इथपर्यंत आलो त्यांना मदत आणि सहकार्य करणेहेच आपले ब्रीदवाक्य असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यामुळे समाजऋणांची परतफेड करण्याची भावना असलेल्या आबासाहेबांचा हा प्रवास थक्क करणारा आणि सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे. तेंव्हा अशा या मनमिळावूकर्तबगार आणि होतकरु अधिका-याच्या हातून आखंड माणवजातीची सेवा घडो... त्यांच्यासारखे अनेक आबासाहेब समाजात जन्माला येवोत. अशी सदिच्छा व्यक्त करुनआपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करुया...!

सौजन्य -आपुलकी कार्यकारिणी - Whatsapp Group

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home