दलितमित्र कदम गुरुजी : स्वावलंबी विद्यार्थी ते ज्ञानयोगी एक प्रवास---------- प्रा. डॉ. विधिन कांबळे Dalit Mitra Kadam Guruji - By Dr. Vidhin Kamble
दलितमित्र कदम गुरुजी : स्वावलंबी विद्यार्थी ते ज्ञानयोगी एक प्रवास
कट-कारस्थानामुळे लहान ज्ञानोबाचे वडिलांचे
छत्र हरपले होते. अशा अवस्थेत आपल्या बहिणीला आणि भाच्याचा घातपात होईल याने
व्यथित होऊन त्यांचे मामा डिकसळला(आजोळी) घेऊन आले. अचानक उद्भवल्या प्रसंगाने आई हवालदिल झाली
होती. पण आज्जी आणि मामाने खंबीर साथ दिली, जगण्याचे
बळ दिले, आणि आपल्या एकुलत्या एक लेकराची आई व वडील अशी दुहेरी भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले. मामा आपल्या परिस्थिनुसार ज्ञानोबाचे लाड पुरवत
होते. त्याबरोबरच त्यांचे शिक्षणही सुरु होते. आपल्या गावापासून जवळपास १० किमी
चालत जाऊन हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासुनच
गुरुजी अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.
हायस्कूलमध्ये शिकत असताना स्कॉलरशिप परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने
पास झाले होते इतके ते हुशार व बुद्धिमान
होते.
कट-कारस्थानामुळे लहान ज्ञानोबाचे वडिलांचे
छत्र हरपले होते. अशा अवस्थेत आपल्या बहिणीला आणि भाच्याचा घातपात होईल याने
व्यथित होऊन त्यांचे मामा डिकसळला(आजोळी) घेऊन आले. अचानक उद्भवल्या प्रसंगाने आई हवालदिल झाली
होती. पण आज्जी आणि मामाने खंबीर साथ दिली, जगण्याचे
बळ दिले, आणि आपल्या एकुलत्या एक लेकराची आई व वडील अशी दुहेरी भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले. मामा आपल्या परिस्थिनुसार ज्ञानोबाचे लाड पुरवत
होते. त्याबरोबरच त्यांचे शिक्षणही सुरु होते. आपल्या गावापासून जवळपास १० किमी
चालत जाऊन हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासुनच
गुरुजी अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.
हायस्कूलमध्ये शिकत असताना स्कॉलरशिप परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने
पास झाले होते इतके ते हुशार व बुद्धिमान
होते.
ज्या काळात जाती-पातीच्या भिंती घट्ट होत्या
त्या काळात उच्च-निचतेचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही उलट ते खालच्या
समजलेल्या जातीतील विद्यार्थीमित्रांशी अत्यंत आपुलकीने व प्रेमाने वागत असत.गुरुजी
विद्याथी दशेपासूनचअत्यंत संवेदनशील आणि वैचारिकवृत्तीचे होते.सोलपुरच्या दयानंद
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मराठा बोर्डिंगमध्ये रहात असत.त्याच्या बरोबर खेड्या-पाड्यातून
शिक्षण घेण्यासाठी
आलेले अनेक गरीब मित्र होते.शालेय व दैनंदिन खर्चासाठी त्यांच्याकडे पैशे नसायचे.
त्यांचे हाल अपेष्टा पाहून गुरुजीच्या
मनाला खूप वेदना व्हायच्या.आपल्या मित्रांची दैनिया अवस्था पाहून गुरुजीनाही
गुदमरल्यासारखे व्हायचे. एक दिवस त्यांनी अशा मित्राच्याबरोबर स्वालंबी शिक्षण
घेण्याचा विचार मांडला व तो अमलातही आणला.सर्व
मित्रांनी मिळून बिस्किटे विकून दैनंदिन व शालेय खर्चासाठी लागणारे आर्थिक नियोजन केले.आपल्या
मित्रांसाठी निस्वार्थी मदत करणारे, त्यांच्या मदतीला तळमळीने धावून जाणारे फारच
थोडे थोडके मित्र असतात. जवळपास ७०-८०
वर्षापूर्वी गुरुजींनी परिस्थितीची जाणीव व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवल्यास आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यासाठीनिर्धार व मानसिक तयारी
ठेवावी लागते. असा संदेश आपल्या कृतीतून आजच्या
पिढीतील विद्यार्थ्यासाठी दिला आहे.
म्याट्रिक मध्ये शिकत असतान शिक्षणाचा खर्च
भागवण्यासाठी गुरुजींनी कापडगिरणीत काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी काम हि
केले. याचा व्हायचा तो झाला. कामातून वेळ न मिळाल्याने नापास होण्याची वेळ
त्यांच्यावर आली. त्याचा मोठा धक्का त्यांच्या मनाला बसला. तर दुसऱ्या बाजूला आईला खूप आनद झाला. कारण
लहानपणापासून घराबाहेर शिक्षणासाठी घराबाहेर पडलेला आपला मुलगा आता आपल्या जवळ
राहील.नापास झाल्याचे शल्य विद्यार्थी असलेल्या गुरुजीना आतल्या आत सलत होते. त्यातूनच त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरण्याचा
निर्धार केला. त्यांनी नुसताच फोर्म भरला नाही तर तितक्याच जोमाने अभ्यासही केला व
चांगल्या गुणानी पास ही झाले. अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रामाणिक प्रयत्न केले
तर यश खेचून आणू शकतो हा धडा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना दिला आये.
त्या काळात भारतीय
स्वातंत्र्याची चळवळ देशभरात गतिमान होत असताना त्याच कालावधीत गुरुजींचे सोलापूरात
महावियालीन शिक्षण सुरु होते. अनेक
स्वातंत्र्य सेनानीशी त्यांचा संपर्क आला. त्यांचे विचार ऐकून गुरुजी खूप प्रभावित
झाले. स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित
विचारांचा प्रचंड प्रभाव गुरुजींच्या मनावर
पडला. देशभरात अनेक चळवळी सुरु होत्या. स्वतंत्र प्राप्तीसाठी म. गांधीच्या असहकार चळवळीने
देशभरात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले
होते म. गांधींच्या सत्य, अहिंसा, व सत्याग्रह या
विचाराने प्रभावित होऊन . अनेक तरूणस्वातंत्र्य
चळवळीत उडी घेत होते. तर दुसऱ्या बाजुला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दलित- शोषित समाजासाठी सामाजिक स्वातंत्र्यासाठी चळवळ
सुरु होती. याचा गुरुजींच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आपल्या आईची व मामाची
मनधरणी करून वकिलीच्या शिक्षणासाठी कोल्हापूर
येथे प्रवेश घेतला. छ. शाहूमहाराज यांनी
केलेले कार्य जवळून अनुभावाण्य्ची संधी त्यांना मिळाली होती. त्यातूनच महात्मा
गांधीजींच्या राजकीय विचाराबरोबरच फुले, शाहू आंबेडकरांचे सामाजिक शैक्षणिक,व सामाजिक
समतेची बीजे त्यांच्या मनात रुजल्याचे दिसून येतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी
वकिलीचा व्यवसाय करण्याऐवजी शैक्षणिक कार्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची पाळेमुळे विद्यार्थीदशेत गुरुजींनी प्रत्यक्षपणे
अनुभवले होते. गरिबीचे चटके कसे असतात
याची त्यांना जाणीव होती. गरीबीचे चटके
त्यांनी सोसले होते. आपल्या गरीब मित्रांचे हाल त्यांनी प्रत्यक्ष पहिले होते.त्यांना
माहित होते. शिक्षण हे एकच असे माध्यम आहे.
ज्या योगे मानवी मूल्याचा विकास होतो. कारण ते स्वतः अनुभवत
होते.
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या
शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशायाच्या शिखरावर जाऊन बसतो
शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी
महत्वाची असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, शिक्षण
हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पितो तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र
आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण प्राप्त
झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील
फरक समजायला लागतो.एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ध्येय निश्चित करुन शिक्षण वर्तमान
आणि भविष्याकडे पोचते.आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे.
शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते असे
शिक्षणाबद्दल आपले व्यापक विचार यांनी मांडले
आहेत. अशाच प्रकारचे विचार आदरणीय कदम गुरुजी यांच्या ठाई असल्याचे दिसून येतात. आदरणीय
यशवंतराव चव्हाण यांचे गुरुजीवर विशेष प्रेम होते. शहरी भागात विद्यार्थ्यांचे किती हाल होतात हे प्रत्यक्ष
अनुभवल्यामुळे चव्हाणसाहेबांच्या पुढाकाराने कदमगुरुजींनी शिक्षण प्रसारक
मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे दालन निर्माण केले.
आणि आंबेडकर यांनी मांडलेल्या विचाराप्रमाणे डरकाळी फोडणारे वाघ निर्माण केले आणि
आजही त्यांनी निर्माण केलेल्या शाळामधून अविरत चालू आहे. सवर्ण असूनही दलित, पिडीत, शोषित आणि वंचित
घटकासाठी गुरुजींनी कार्य केले. दबलेल्या
पिचलेल्या समाजाचे तारणहार ठरतात. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने दलितमित्र आहेत. गुरुजींच्या
अनेक पैली पैकी मला त्यांचे विद्यार्थी जीवन ज्ञानयोगी या चरित्रातून वाचावयास
मिळाला. ते विचार आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा देणारे आहेत. अशा
महान ज्ञानयोगीना माझे विनम्र अभिवादन..
संदर्भ: ज्ञानयोगी, दलितमित्र कदम गुरुजी: कार्य आणि
विचार. ले. डॉ. सौ. मिनाक्षी सुभाष कदम.
प्रा. डॉ. विधिन कांबळे
प्राणीशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय,
सांगोला
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home