उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी प्रा. डॉ. विधिन कांबळे
उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी
प्रा. डॉ. विधिन कांबळे
नुकत्याच खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र
भूषण पुरस्कार सोहळा प्रसंगी अनेकांना
उष्माघाताचा त्रास झाला. व यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आणि तब्बल ६०० ते ७००
जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उष्माघात या गंभीर समस्या आहे यांची जाणीव
आपणा सर्वांना झाली आहे. सामान्यपणे दरवर्षी
अशा घटना विविध ठिकाणी घडत असतात. परंतु खारघरच्या
घटनेने ही समस्या गंभीर असल्याचे दिसून येते.
वातावरणातील
जास्त तापमान मानवी शरीर सहन करू शकत नसेल तेव्हा उष्माघात होत असतो.उष्माघात ही एक अशी स्थिती आहे जी तुमचे शरीर
जास्त तापते तेव्हा उद्भवते, सामान्यत: गरम हवामानात दीर्घकाळापर्यंत संपर्क
किंवा शारीरिक प्रक्रिये मुले आपल्या शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइट (४० अंश
सेल्सिअस) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उष्माघात, डोके
दुखापतीचा सर्वात घातक ठरू शकते. उष्माघात
झाल्यास संबंधित व्यक्तिला भरपूर घाम येतो. असंबंध बोलते. त्वचा कोरडी किंवा गरम होते, मळमळ,
उलट्या, हृदय गती वाढते, श्वसनक्रिया
वाढते, जास्त तहान लागते, डोकेदुखी स्नायू पेटके येतात, आणि शुद्ध हरपते. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास त्वरित
वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास उष्माघात तुमच्या मेंदू, हृदय,
मूत्रपिंड
आणि स्नायूंना झपाट्याने हानी पोहोचवू शकतो. उपचार घेण्यासाठी जितका जास्त वेळ प्रतीक्षा कराल तितके जास्त
नुकसान होईल, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूची
शक्यता वाढते. तेव्हा लवकरात लवकर सदर व्यक्तिला वैद्यकीय उपचार देणे अत्यंत
महत्वाचे आहे.
आपल्या शरीराच्या तापमानाचे
नियंत्रण मुख्यतः मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भागाकडून केले
जाते. शरीराचे तापमान जर अगदी कमी असेल, तर अधोथॅलॅमस (Hypothalamus) शरीरातील स्नायू उद्दीपित
करून कापरे उत्पन्न करतो व त्यामुळे जास्त उष्णता उत्पन्न होते. शरीर जर बरेच गरम
झाले असेल, तर अधोथॅलॅमस स्वेद ग्रंथींना
उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो यामुळे घाम येऊन त्याच्या
बाष्पीभवनाने बरीच उष्णता बाहेर जाते. त्याचप्रमाणे त्वचेला जाणाऱ्या
रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन त्वचेला रक्ताचा जास्त पुरवठा होतो व रक्तामधूम
जास्त उष्णता बाहेर पडते.
मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६° ते ३७·५° से. एवढे असते. काही
व्यक्तींमध्ये ते नेहमीच ३६° से. असू शकते. तापमानात
दैनंदिन बदलही होतात. रात्री २ ते सकाळी ६ या दरम्यान ते सर्वांत कमी असते, तर सायंकाळी ५ ते ८ या
दरम्यान ते सर्वोच्च असते. या फरकाचा संबंध शारिरिक हालचालींशी आणि चयापचयाशी असतो.
उन्हाळ्यात हवेचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा घामाच्या साह्याने
शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्याचा प्रयत्न होतो.
उष्णतेच्या लाटांची स्थिती असताना किंवा हवेचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना शारीरिक कष्टाची कामे केल्यास, शरीरातील पाण्याची पातळी वेगाने कमी होते. अशा स्थितीत शरीराचे तापमान वाढू लागते आणि उष्माघाताचा त्रास सुरू होतो. दुसऱ्या स्थितीत, हवेचे तापमान ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आणि सापेक्ष आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर हवेतील बाष्पामुळे शरीरातून घाम येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो. थोडक्यात, उष्माघाताचा त्रास होण्यास फक्त वाढलेले तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रताही कारणीभूत ठरते.
उष्माघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना व काळजी घेणे जरूरी ठरते.
काळजी घ्या सुरक्षित रहा ..!!!
Labels: उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी प्रा. डॉ. विधिन कांबळे
1 Comments:
Very useful and significant information
Thank you for sharing this with us
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home