10.09.2019

मधुमेहाबद्दल जाणून घेऊ - (Information about diabetes) प्रा. डॉ. विधीन कांबळे

                  मधुमेहाबद्दल जाणून घेऊ - (Information about diabetes)  

आपणास माहित आहे. आपल्या शरीरात स्वादुपिंड इन्सुलिन (Insulin) तयार  करत असते. हे इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे कार्य करीत असते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर पेशीकडे पाठवली जाते व तिचा उर्जा निर्मितीसाठी चयापचयाच्या  माध्यमातून उपयोग केला जातो.
११ व्यक्तीच्या मागे १ व्यक्ती ही मधुमेहाने पिडीत आहे. जगातील ४६ टक्के लोक या आजाराने प्रभावित असून 2050  पर्यंत  ६२२ कोटी लोकांना या आजाराने ग्रासले असेल. असा जागतिक आरोग्य संघटनेने दावा केला आहे.
diabetis Type – १ चे प्रमाण इतर डायबेटीस चे तुलनेत कमी असते. या प्रकारात स्वादुपिंड पूर्ण पाने निकामी झालेले असते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही या प्रकारच्या डायबेटीसला इन्सुलिन डीपेंदन्ट डायबेटीस असे म्हणतात.
बऱ्याच लोकांचा असा समज आहे कि, diabetis Type – १ फक्त लहान मुलांना होणारा आजार आहे. वास्तविक पाहता मोठ्या माणसांमध्ये याचे प्रमाण ही खूप असल्याचे आढळून येते. diabetis Type – १ ला जुवेनाईल डायबेटीस असे म्हटले जाते.
 Type – १ चे प्रमुख ३  प्रकार आहेत.

१.      डायबेटीस -१
या प्रकारचा डायबेटीस प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळून येतो. एखाद्या कुटुंबात पूर्वी कुणालाही हा आजार झाला नसला तरी या प्रकारचा diabetis होतो. ३० वर्षानतर हा आजार फार कमी प्रमाणात होत असतो. या प्रकारात रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित असते. अशा प्रकारात इन्सुलीन तातडीने देणे गरजेचे असते.
२.      डायबेटीस -१ बी (आयडीयोपैथिक डायबेटीस )
या प्रकारात शरीरात इन्सुलिनचे प्रमाण च्या बरोबर असते. हा आजार अनुवांशिक असून पूर्वी कुटुंबातील व्यक्तीला झाला असेल तर हा आजार होण्याची श्यक्यता जास्त असते.
३.      लेटेंट ऑटोइमून डायबेटीस ऑफ अडल्टहुड (LADA)
हा आजार वयस्क व्यक्तीमध्ये हळू-हळू बळावत जातो. प्राथमिक अवस्थेत हा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो.
डायबेटीस-१ ची  लक्षणे ही लक्षणे व्यक्ती व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. ती खालील प्रमाणे आहेत.
१.      खूप तहाण लागणे.
२.      लघवीचे प्रमाण जास्त असते.
३.      सुस्ती येणे व थकवा जाणवतो.
४.      त्वचेला खाज सुटणे.
५.      दृष्टी अंधुक होणे.
६.      शरीराच्या वजनात कमालीची घट होते.
७.      चक्कर येणे.
८.      सतत उदास वाटणे.
९.      शरीरात गाठी होणे.
१०.  जखम झाल्यास भरून येण्यास खूप वेळ लागतो अथवा जखम  चिघळते.
११.  सतत भूक लागणे.
१२.  अंथरुणात लघवी होणे.

मधुमेह होण्याची कारणे
डायबेटीस- टाईप १ या मधुमेहाचे ठोस असे कारण सांगता येत नाही. परन्तु काही निष्कर्ष्णावरून त्याची वेगवेगळी कारणे आहेत.
१.      अनुवांशिक :
२.      वातावरणातील बदल
३.      कौटुंबिक स्थिती
४.      वय : हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. परंतु  ४ ते ७ वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक असते. किंबहुना १०  ते १४ वयोगटात हि याचे प्रमाण दिसून येते. लहान मुलामध्ये दिवसे-दिवस वाढत चालले असून जंक फूड हे त्यातील महत्वाचे कारण आहे. पालकांनी स्थूल मुलांच्या बाबतीत काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. भारतात २ करोड पेक्षा जास्त मधुमेही असून त्यामध्ये ७ टक्के प्रमाण ७ ते १४ वयोगटातील मुलांचे आहे. व्यायामाचा अभाव, भोजनामध्ये भाज्या न खाणे. हे मुख कारण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडे वारी नुसार १९८० साली मधुमेहींची संख्या १०८ कोटी होती. २०१४ च्या आकडेवारीनुसार ४२२ कोटी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. १८ वर्ष्याच्या पुढील लोकांची संख्या ८.५ टक्के  आहे.
मध्यम वर्ग व कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये या आजाराचे प्रमाण जास्त अद्ध्ळून येते.
मधुमेहामुळे अंधत्व, किडनी संबधी आजार, हृदयविकाराचा झटका, पायाला गाठी उठणे. इत्यादी दुष्परिणाम उद्भवतात.
२०१६ च्या आकडेवारीनुसार १.६ कोटी लोकाचा मृत्यू केवळ मधुमेहाने झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ५० टक्केपेक्षा जास्त मृत्यू रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे झाले आहेत.
डायबेटीस type -२ हा सामान्यपणे वयस्क व्यक्तीला होणारा आजार आहे. यालाच इन्सुलिन नोन-डिपेंदन्ट  किंवा Adult diabetes असे संबोधले जाते.  या प्रकारात इन्सुलिन अत्यल्प प्रमाणात तयार होते व रक्तात वाढणारे साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यामध्ये इन्सुलिन परिणामकारक होत नसल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वरचेवर वाढत जाते.
 type – १ व type -२ दोन्ही प्रकारात लक्षणे सारखीच असतात. परंतु type -२ मध्ये लक्षणे दिसण्यास उशीर लागतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

type -२ डायबेटीस होण्याची करणे पुढील प्रमाणे आहेत.
, अनुवांशिक
२.  शरीराचे प्रमाणापेक्षा वाढलेले वजन
३. पोषक आहाराचा अभाव.
४. व्यायम व कमी हालचाल.
५. वाढते वय.
६. अति रक्तदाब.
७. गर्भवती असताना कुपोषण.
८. कौटुंबिक स्थिती

मधुमेह या आजाराकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १४ नोव्हेबर हा दिवस ‘’जागतिक मधुमेह दिवस’’ म्हणून साजरा केला जातो.  

इंटरनेशनल डायबेटीस फेडरेशन च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर प्रमुख ५ देशांतील आकडेवार खालील प्रमाणे.
१.      चीन               -     १०९ कोटी
२.      भारत              -     ६९ कोटी
३.      अमेरिका            -     २९ कोटी
४.      ब्राझील                   -     १४ कोटी
५.      रशियन फेडरेशन      -     १२ कोटी    
लोकसंखेच्या तुलनेत डायबेटीस पेशंटची घनता जास्त असलेली शहरे  
१.       तोकेलावू     -     २९.७ %
२.      मोरीशस            -     २४.३ %
३.      नौरू         -     २३.८ %
४.      कोक आयलंड -     २१.१ %
५.      मार्शल आयलंड -     २१.१ %
जागतिक आरोग्य संघटनेच्या भाकितानुसार भारतात २०३० पर्यंत type – २ डायबेटीस लोकांची संख्या ९८ कोटी पर्यंत पोहचेल तर चीनची संख्या १३० कोटी पर्यंत पोहचली असेल.. २०१० मध्ये भारतात ५७ कोटी लोक त्रस्त होते. 

Dr. Vidhin Kamble 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home