9.08.2019

मूग.. सर्वाधिक पौष्टिक अन्नअरविंद कुंभार,* (निवृत्त प्राध्यापक) पर्यावरण व पक्षी अभ्यासक तथा मुक्त पर्यावरण पत्रकार

मूग.. सर्वाधिक पौष्टिक अन्न पदार्थ म्हणून ओळखले जाणाऱ्या मुगाविषयी जाणून घ्या..*
✅मूग हे एक कडधान्य आहे. मूग खरीप पीकामध्ये मोडते. ज्वारी पिकविण्यासाठी योग्य असलेल्या रानात मुगाची पीक घेतली जाते. मे महिन्यात रोहिणी बरसले की मूग पेरतात. सामान्यपणे दोन ते अडीच महिन्यांत कमी पाण्यावर ही पीक घेतली जाते. मूग काढून झाल्यावर सामान्यपणे सप्टेंबर महिन्यातील उत्तरा नक्षत्राच्या पावसात त्या जमीनीत ज्वारी पेरली जाते. लेग्युम कुळातील मूग ज्वारीच्या पिकाला फार उपयोगी पडते; कारण मुगाच्या मुळ्यातील गाठीमुळे मातीत नत्र मिसळले जाते व मातीतील सुपीकता वाढते.
✅चीन, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, ब्रह्मदेश या भारताशेजरच्या देशांमध्ये मुगाची लागवड केली जाते. तसेच फिलिपाईन्स व इंडोनेशिया मध्येही मुगाची शेती केली जाते.
*मुगाचे प्रकार:*
काळे, पिवळे, पांढरे, लाल व हिरवे रंगाचे मूग हे मूगाचे प्रकार आहेत. काळे मूग स्वादिष्ठ व गुणकारी आहे.
*पौष्टिक महत्त्व:*
मूग हे सर्वाधिक पौष्टिक अन्न पदार्थ म्हणून ओळखले जाते. पोटॅशियम, आयर्न (लोह), मॅग्नेशियम, पोलेट, तांबे, जस्त इत्यादी लवण घटकांसह ब जीवनसत्त्व (व्हिटॅमिन बी,फोलिक आम्ल) हे अमाप प्रमाणात मुगात आढळतात. मुगामध्ये साधारणपणे २४प्रथिने(proteins), ५६ ये ६० कार्बोदके (carbohydrates) व  तंतू (fibers) आढळतात.
*ओषधी महत्व:*
मूग हे अतिशय ओषधोपयोगी धान्य आहे. मुगातील विविध घटकांमुळे अनेक रोगांवर मात करता येते. मूग सेवनाने अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य आहे. कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी रोगांवर मूग नामी उपाय आहे.
✅लेग्युम (Legume) कुळातील मुगाला विग्ना रेडिएटा (Vigna radiata) असे शास्त्रीय (वनस्पतीय) नाव आहे.
मुगापासून खिचडी, शिरा, डोसा, पापड, साडगे, पराठा,आप्पे, सूप, सॅलड, आमटी अशा नानाविध खाद्यान्न बनवतात.
🔵सद्या मी सेवानिवृत्तीनंतर शहरी जीवन त्याग करून ग्रामीण भागात राहायला गेलो आहे. आमच्या भागात पुरेसा पाऊस नसला तरी बेताचा आहे. यंदाच्या खरीपातील मूगाची पीक जोमाने आली आहे. त्यामुळे हिरव्या मुगचा आस्वाद घेत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home