मस्तीत राहू नका,,, कोरोना एक भयंकर आजार आहे Corona -Dangrrous disease
मस्तीत राहू नका,,, कोरोना एक भयंकर आजार आहे Corona -Dangrrous disease
फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”.ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “casual approch”.म्हणजेच कुठलीही गोष्ट सहज घेणं.असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या management ला ice burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती.तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं.त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या.कारण काय तर त्याची गरजंच नाही.Titanic जहाज कधी बुडणारंच नाही.ईथेही casual approch दिसला.त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारलं असता त्याला 25 वर्षाचा अनुभव असून कुठलाही ice burg त्याचं काहीच वाकडं करू शकतं नाही असं कॅप्टनचं म्हणनं होतं.इथेही तोच casual approch राहिला.
2000 प्रवाशांना घेऊन हे जहाज समुद्रात निघालं खरं पण एका छोट्याशा ice burg ला धडकून निस्तनाबूत झालं.तुम्हाला हे मुद्दाम सांगतो विशेष म्हणजे या जहाजात सर्व प्रवासी,लोकं वेगवेगळ्या जातीधर्माचे होते.1 st class,2nd class,3 rd class,उच्चवर्णीय,सवर्ण सगळेच होते.परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सगळेच एकमेकात मिसळले होते.माणूस म्हणून सगळेच सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते.कुणी businessman होतं.कुणी सफाई कामगार.कुणी वेटर तर कुणी celebrity होतं.कुणी पाॅलीटीकल होतं.सगळेच्या सगळे बुडून समाधीस्त झाले.कुठल्याच वर्गाचं कुणीच वाचलं नाही.त्याचं एकमेव कारण एवढंच होतं “casual approch”. हे सगळं तुम्हाला पुन्हा नव्याने पहायचं असेल तर james cameron नी दिग्दर्शित केलेला “Titanic” तुम्ही युट्युब वर पाहू शकता. आत्ताची परिस्थिती आणि“Corona”च्या बाबतीत देखील आपलं हेच चालू आहे.तुमचा एक casual approch सर्व मानवी जात नष्ट करायला पुरेसा आहे.आणि तुम्ही कुठल्याही class चे असा.सरकार सोबत असा किंवा विरूद्ध.