6.17.2023

जगातील महा बोधविहार

                                                            जगातील महा बुद्धविहार  

२५०० हजार वर्षांपासून बौद्धधर्म अस्तित्वात आहे.  बौद्ध धर्माचा प्रसार आणि  विस्तार व्हावा यासाठी जगभरात बौद्धभिकूनी अनेक स्तूप व विहार बांधले .  आजही काही  वस्तू , वास्तू व स्तूप नव्याने आढळून येत असून जे बौद्ध धम्माच्या विस्तार आणि प्रसाराच्या कहाण्या कथन करत आहेत.  असेच एकदा कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकांची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!खरेतरं, अविश्वसनीय!  त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती! 

एक महाविहार ! भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक महाकाय बुद्ध विहार !आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे वंदना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.एवढे अवाढव्य वंदना स्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!एका कंबोडियन बौद्ध सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! 

इसवीसन ११५०च्या सुमारास! मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' विहार आहे, भगवान बुद्धांचे...! मुख्य प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! विहाराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे! ४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच विहाराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, विहारात नाही! पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य विहाराजवळ येतो!तत्कालीन कंबोडियन बौद्ध राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य विहार घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल! 'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!दुसऱ्या सुर्यवर्मनने हे विहार घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या विहारासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!  ४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम.  

दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य  महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ!  त्याला त्याच्या जिवनकालातचं हे विहार पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

 डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य! या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम! आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती  महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य विहाराची सुरुवात!  सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर विहाराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले  चार  कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!  हे विहार पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख! युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, बौद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या विहाराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते! या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत! विहारात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा! ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं! हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!  हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक  छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच, तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परत सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची! असे अवाढव्य बुद्ध विहार बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवने हे सारेचं अफलातून! असे म्हणतात की या विहाराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.

संदर्भ व्हॉट्सॲप 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home