वाढते तापमान कोरोनाचा नाश करेल ! प्रा. डॉ. विधिन कांबळे प्राणीशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला
मित्रहो, गेली १५ -२० दिवस आपण कोरोना या जागतिक महामारीने हैराण झाले आहोत. जवळपास २९७ देशामध्ये कोरोनाने थैमान घातले. या रोगामुळे लाखो लोक संक्रमित झाले आहेत. ६० ते ७० हजार लोक या रोगाने जगभरात मृत्युमुखी पडले आहेत. चीनच्या वूहान शहरापासून सुरु झालेली ही महामारी आता भारतात हळूहळू पाय पसरू लागली असून विक्राळ रूप धारण करू लागली आहे. या रोगावर ठाम असे औषध नाही. फक्त एकमेकाचा संपर्क टाळणे ज्याला आपण Social Distancing असे म्हणतो. हा एकमेव उपाय सुचविण्यात आला आहे. त्यामुळे संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी भारतात विविध औषधाचा वापर (जुगाड) करून रोगी बरे केले जात आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
कोरोनाने युरोपीय देशात मोठ्या प्रमाणवर थैमान घातले असून इटली, स्पेन, फ्रांस, जर्मनी, ब्रिटन इत्यादी देशाचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेसारख्या सर्वच पातळीवर अतिप्रगत समजल्या जाणाऱ्या देशात आजच्या घडीला कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वच युरोपिय राष्ट्रामध्ये संक्रमण फैलावण्याचे प्रमुख कारण म्हणजे सामाजिक दुरी (Social Distancing ) व्यवस्थितरित्या न पाळल्याने सांगितले जाते. युरोपिअन लोक शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणारे समजेल जातात. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होण्या ऐवजी वाढत चालला आहे. दुसऱ्या बाजूला विकसनशील राष्ट्रांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असला तरी फैलाव आणि मनुष्यहानी त्या मानाने कमी झाल्याचे दिसून येते. माझ्या मते त्या-त्या देशातील वातावरण व त्यातील असणारे घटक कमी-अधिक कारणीभूत असावेत असावे असे वाटते. आपण बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात या विषाणूचे संक्रमण स्थानिक नागरीकापेक्षा बाहेरून आलेल्या व्यक्तींमध्ये जास्त झाल्याचे दिसून येते. तसेच इतर देशाच्या तुलनेत विषाणूचा फैलावण्याचा वेग सावकाश असल्याचे दिसून येते. त्याची काही करणे मी या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्लोबल हेल्थ विद्यापीठ उत्तर कोरोलीना या देशातील एन्व्हायर्नमेंटल सायन्स एंड इंजीनेरिंग विभागातील डॉ. लिसा कोसानोव्हा (२०१२) यांच्या चमूने हवामानातील तापमान व सापेक्ष आर्द्रता या दोन घटकांचा SARS Corona Virus वरती काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. यासाठी डॉ. लिसा आणि यांच्या चमूने TGEV (Transmisible Gastroenteritis Virus ) आणि MHV (Mouse Hepatitis Virus) या दोन विषाणूची या अभ्यासासाठी निवड केली. हे दोन्ही विषाणू SARS Covid Virus सदृश्य असल्याने SARS च्या रोगाशी ताळमेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या निष्कर्षानुसार वातावरणातील कमी तापमान व जास्त सापेक्ष आर्द्रता हे विषाणूच्या वाढीसाठी पोषक असतात. याउलट वाढते तापमान व कमी होत जाणारी आर्द्रता यामुळे विषाणू हळू-हळू निष्क्रिय होत जातात. डॉ. लिसा यांच्या अभ्यासानुसार हे विषाणू ४ ते १५ अंश तापमानाला ५ ते २८ दिवस सक्रिय रहात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याउलट वातावरणात ४० अंश तापमान व २० टक्के आर्द्रता असल्यास हे विषाणू पूर्णपणे निष्क्रिय होतात.
२००३ साली जगातील जवळपास ३० देशात श्वसन संस्थेशी संबधित सार्स (SARS-Co-V) विषाणूने हाहाकार माजवला होता. COVID -19 प्रमाणेच याचे उगमस्थानही चीनच होते. होंगकोंग विद्यापिठीतील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील डॉ. के. एच. चान यांच्या चमूने वातावरणातील तापमान व सापेक्ष आर्द्रता या दोन घटकांचा SARS Co-V या विषाणूवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला होता. त्यांनी वातावरणातील कमी तापमान आणि जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास हे विषाणू सक्रीय राहतात. अशा परिस्थितीत विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणत होतो. याउलट तापमान ३८ अंशपर्यंत आल्यास SARS Co-V हा विषाणू निष्क्रिय होत असल्याचे अत्यंत महत्वाचे निरीक्षण केले आहे.
जगातील काही देशातील सध्याचे तापमान व सापेक्ष आर्द्रता खालील कोष्टकात दिली आहे.
अ. क्र. देशाचे नाव तापमान अंश से. सापेक्ष आर्द्रता
१ न्यूयार्क १० ८४
२ स्पेन १२ ९६
३ फ्रान्स ११ ४९
४ लंडन १४ ७०
५ इटली १० ५८
६ चीन २२ २१
सौजन्य : गुगल,
देशातील काही शहरांचे सध्याचे तापमान व सापेक्ष आर्द्रता खालील कोष्टकात दिली आहे
अ. क्र. ठिकाण तापमान अंश से. सापेक्ष आर्द्रता
१ मुंबई ३२ ५८
२ पुणे ३५ २०
३ दिल्ली ३१ ३४
४ काश्मीर १० ६०
५ सोलापूर ३६ २६
६ नांदेड ३७ ३४
७ धुळे ४० १३
८ सांगली (शहर) ३९ १८
९ सांगोला ३९ १७
१० आटपाडी ३९ १७
सौजन्य : गुगल,
वरील लेखात काही संशोधकांच्या निष्कर्षानुसार ३७ ते ४० अंश तापमानाला काही विषाणू निष्क्रिय होत असल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर सापेक्ष आर्द्रता २० पेक्षा कमी झाल्यास विषाणू निष्क्रिय झाल्याचे आढळून आले आहे. कमी होत जाणारे तापमान आणि वातावरणातील सापेक्ष आर्द्रता हे घटक घटक असून विषाणूच्या वाढीला व फैलावास कारणीभूत ठरतात.
वरील कोष्टकाचा अभ्यास केल्यास, सद्य स्थितीला जगातील काही देशांचा किंवा भारतातील प्रमुख शहरातील तापमानाचा व आर्द्रतेचा ताळमेळ घातल्यास विषाणूच्या प्रादुर्भाव कमी अधिक होण्यामागचे कारण आपणा सर्वांच्या लक्षात येऊ शकेल. जर COVID-19 या विषाणूवर वातावरणातील या घटकांचा परिणाम होत असल्यास निश्चितच आपल्या देशातून कोरोन हद्दपार झाल्याशिवाय रहाणार नाही. जागतिक पातळीवर झालेल्या अभ्यासानुसार हे माझे मत आहे. असे झाले तर अनेक समस्या दूर होतील. काही अभ्यासकांच्या मते तापमानाचा कोरोनाच्या विषाणूवर परिणाम होत नाही. ते काही असो. आपल्या देशात योगा-योगाने उन्हाळा सुरु झाला आहे. इतर देशातील हवामानाच्या तुलनेत आपल्या देशात बदल झाल्यास शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार या संकटातून सर्व देशवासीयांची सुटका होईल. आणि असेच घडावे अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया.
(हे माझे निष्कर्षन नसून जागतिक पातळीवर शास्र्ज्ञानी केलेल्या अभ्यासावरून हा लेख मांडण्यात आला आहे.)
प्रा. डॉ. विधिन कांबळे
प्राणीशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, सांगोला