7.22.2023

सयाजीराव महाराजांच्या पत्नी जागतिक किर्तीच्या लेखिका होत्या

 सयाजीराव महाराजांच्या पत्नी जागतिक किर्तीच्या लेखिका 

हिंदुस्तानास जर उर्जितकाळ यावयाचा असेल तर तो एकी आणि विद्या या वाचून कधीही यावयाचा नाही…असं जेव्हा महाराजा सयाजीराव म्हणतात तेव्हा शिक्षणाचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यातलं मोल लक्षात येतं. त्यांच्या या वाक्याबरहुकूम आपल्या अधिकारांचा वापर करून बडोदा संस्थानात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत स्त्रीवादाचा जागतिक दृष्टीनं अभ्यास करणाऱ्या व भारतीय स्त्रियांची स्थिती जगासमोर मांडणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे, हर हायनेस महाराणी चिमणाबाई….!


महाराणी चिमणाबाई यांचा जन्म १८७२ मध्ये इंदोर जवळील देवास बु।। या गावी सरदार श्रीमंत बाजीराव अमृतराव घाडगे ह्यांच्या घरी झाला. त्यांचे जन्माचे नाव श्रीमंत गजराबाई देवी होते. त्यांची जन्मतारीख १३ नोव्हेंबर १८७१ अशीही सांगितली जाते. महाराणी चिमणाबाई या पुरोगामी विचाराच्या महिला होत्या जगात विविध ठिकाणी चालू असलेल्या घडामोडींची त्यांना खडानखडा माहिती होती. विदेशातून येणाऱ्या विविध अधिकारी, नेते तसेच अभ्यासकांचे त्या स्वतः स्वागत करत व त्यांच्याशी चर्चा करत असत. त्यांना भेटणाऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या डायरीत लिहून ठेवलं आहे की,  “चिमणाबाई ह्यांना भेटल्यानंतर त्या राज्याच्या प्रमुख असाव्यात आणि सगळ्या संस्थानांवर त्यांचे नियंत्रण असावे असे वाटते.”  बडोद्याच्या सयाजी महाराजांसोबत देशा-विदेशात विविध ठिकाणी फिरण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात तसेच अनुभवामध्ये मोलाची भर पडत गेली. त्यांनी लहान मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांची शाळेतील संख्या वाढावी म्हणून काम सुरू केले. त्यासोबतच तत्कालीन हिंदू समाजामध्ये असणारी पडदा पद्धती हटवण्यासाठीही त्यांचे योगदान मोलाचे होते. त्याकाळी बालविवाह सर्वमान्य होता व लहान मुलींचे लग्न तुलनेने मोठ्या वयाच्या माणसाची केले जायचे. या पद्धतीविरुद्धही त्यांनी आवाज उठवला आणि आपल्या राज्यांमध्ये ही पद्धत बंद व्हावी यासाठी मोलाचे प्रयत्न केले.  1927 आली पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे पहिले अध्यक्ष पद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला.

ज्याप्रमाणे ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ असे म्हटले जाते त्याचप्रमाणे समाजसुधारणेसाठी आणि भारताची सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती व्हावी व बहुजनांना त्यात मोलाचे स्थान लाभावे यासाठी कार्यरत असणाऱ्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पाठीमागेही महाराणी चिमणाबाई यांच्यासारख्या विभूतीचा मोलाचा वाटा होता.त्यांच्याकडेही आपल्या पतीप्रमाणेच दूरदृष्टी आणि सामाजिक कामासाठी वाहून घेण्याची धमक होती. बडोद्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना थोर पणाने वागवले जात असे आपल्या पतीसोबत काम करतानाच त्यांनी तरुणपणीच राज्याच्या कारभारामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आणि आपल्या राज्याची खडान्-खडा माहिती मिळवली त्यांच्यावरती महाराजां प्रमाणेच पुरोगामी विचारांचा मोठा पगडा होता म्हणूनच एस.एम. मित्रा या भारताच्या समस्यांवरती मोठे लेखन करणाऱ्या संशोधक व्यक्तीसोबत त्यांना स्त्रियांच्या दृष्टिकोनात व भारतातील स्त्रियांच्या समस्येकडे एका अत्याधुनिक दृष्टिकोनातून पाहता आले.त्यांनी भारतीय स्त्रियांच्या अडचणी समजून घेणाऱ्या एका ग्रंथाची निर्मितीही केली. ३ ऑगस्ट १८९२ साली महाराणी चिमणाबाई यांना “इंपीरियल ऑर्डर ऑफ द क्राऊन ऑफ इंडिया” या क्वीन एक्सप्रेस यांनी प्रदान केलेल्या किताबाने सन्मानित करण्यात आले होते. स्त्रियांची सर्वोतपरी उन्नती व त्यांचे कल्याण हा त्यांच्या कळकळीचा विषय होता. युरोपात राहिल्यांनंतर हातात मध्ययुगातील तलवार घेऊन लढण्याचे दिवस मागे पडल्याची त्यांना जाणीव झाली. शिक्षण आणि ज्ञानाची सत्ता स्थापन करून त्यावर वर्चस्व मिळवण्यातच देशातल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याची पहाट उजाडेल हे त्यांनी जाणले. “पूर्वी ज्याप्रमाणे लढाईच्या कामात यश आपल्या लोकांनी यश मिळवले त्याचप्रमाणे हल्लीच्या काळातील विद्या, हुन्नर, धंदे व उद्योग यात प्राविण्य संपादन करून यश मिळवले पाहिजे” ह्या महाराजांच्या वाक्यातच त्यांच्या कामाची दिशा आणि धोरण समजून येते. “द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाइफ” या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेल्या बहुतांश गोष्टी या अनुभव आणि आपल्या प्रजेतील सामान्य नागरिकांच्या निरीक्षणांमधून आलेल्या आहेत. देशोदेशीच्या संस्थानाच्या राण्या जेव्हा फक्त मानमर्तब आणि छानछोकीमध्ये व्यस्त होत्या तेव्हा महाराणी चिमनाबाई भारतीय स्त्रियांना आधुनिक युगात घेऊन येण्यासाठी झटत होत्या. हे पुस्तक त्यांनी ‘भारतामधील सामान्य स्त्रियांना’ अर्पण केले आहे ह्यातच त्यांच्या कार्याची महती लक्षात येते. हॉटेल्स पासून कारखान्यापर्यंत स्त्रिया जेव्हा स्वतंत्रपणे काम करू लागतील तेव्हा समाजात समता स्थापित होईल हा विचार ते आपल्या लेखनातून मांडतात तेव्हा त्यांनी समाजाचा किती बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यांचे विचार काळाच्या किती पुढे होते ह्याचा आपल्याला अंदाज येतो. आपल्या सोबतच्या जपान, जर्मनी आणि इंग्लंडच्या स्त्रिया काय करतात? त्यांना व्यावसायिक स्वातंत्र्य कसे मिळाले? ह्या मार्गात त्यांना कोणत्या अडचणी आल्या? ह्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह त्यांनी केला. तेथील स्त्रियांच्या तुलनेत भारतातल्या स्त्रियांची स्थिती किती वाईट आहे, असा अभ्यास करणारा हा एकमेव शोधग्रंथ ठरावा. सामान्य जनतेला समजून घेण्याची ही दृष्टी आणि विचारांमधील खुलेपणामुळेच त्यांना भारताच्या पहिल्या ऑल इंडिया वूमन्स कॉन्फरन्सचे (AIWC) अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधित्व केले. त्या काळामध्ये जेव्हा पुराणमतवादी आणि कर्मठ विचारांचा पगडा समाजावर होता, तेव्हा त्यांनी आपल्या राज्यातील मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि त्यांना शिक्षण घेता यावे म्हणून जागोजागी शाळांची निर्मिती केली.


सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुथुलक्ष्मी यासारख्या या काळातील मोठ्या महिला नेत्यांचेही लक्ष त्यांनी वेधून घेतले कारण बालविवाह पद्धती विरुद्ध एका मोठ्या व्यासपीठावरून आवाज उठवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी ही पद्धत कशी बंद केली ह्याचा एक किस्सा सांगितला जातो. सुरुवातीला महाराणी चिमणाबाई स्वतः पडद्यामध्ये वावरत असत, मात्र आपल्या युरोपच्या दौऱ्यामध्ये त्या पडद्याशिवाय महाराजांसोबत विविध ठिकाणी जात. तसेच युरोपियन स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य आणि त्यांचे राहणीमान त्या स्वतः पाहत होत्या. पडदा पद्धती ही फक्त पोशाखाची पद्धती नसून त्यामुळे स्त्रियांना एका विशिष्ट बंधनात गुंतवले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1914 पर्यंत महाराणी चिमणाबाई स्वतः पडदा पद्धती पाळत असत, मात्र आपल्या निरीक्षणातून आणि सुधारणावादी विचारांना अनुसरून त्यांनी ह्या पद्धतीविरुद्ध आवाज उठवला व तत्कालीन कर्त्या समाजसुधारकांप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा स्वतः या पद्धतीचा त्याग केला. पडदा पद्धती ही मूर्खपणाची आणि प्रतिगामी असल्याचे सयाजीराव गायकवाड यांचेही मत होते व त्यामुळे त्यांनीही पडदा पद्धती बंद करण्याच्या या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला. त्यांच्या प्रयत्नामुळेच 1914 साली बडोदा संस्थांनामधून पडदा पद्धतीची ही प्रथा बंद झाली. नया मंदिर येथून राज्यकारभार करत असताना महाराजा सयाजीराव गायकवाड या सोफ्यावर बसून जनतेशी संवाद साधत असत. त्याच सोप्यावर पडदा न घेता महाराणी चिमणाबाई याही बसल्या आणि त्यांनी जनतेशी विचारपूस केली या दृष्टीनेच जनसामान्यांमध्ये पडदा पद्धती संपली असल्याचे आपोआपच घोषित झाले आणि या पद्धतीवरच शेवटचा पडदा पडला. राज्यातील स्त्री शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या आपल्या उद्देशाला अनुसरून महाराणी चिमणाबाई यांनी विविध संस्थांना उदारपणे आर्थिक मदत केली. त्यांनी आपल्या राज्यामार्फत स्त्रियांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती आणि मदत देऊ केली. याखेरीज स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या विविध संस्था त्यांनी उभारल्या व त्यामध्ये स्वतः काम करून आपल्या स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी महिलांना राज्यकारभार तसेच इतर क्षेत्रांमधील सहभागाचे धडे देण्यास सुरुवात केली.महाराणी चिमणाबाई पाठशाळा, महाराणी चिमणाबाई उद्योगालय, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, महाराणी चिमणाबाई मेटरनिटी अंड चाइल्ड वेल्फेअर लीग, महाराणी चिमणाबाई लेडीज क्लब या संस्थांची निर्मिती करत त्यांनी स्त्रिया जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीला येतील यासाठी प्रयत्न केले. 

पुरुषांना मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि संधी बडोदा संस्थाना मधील स्त्रियांच्या आणि मुलींच्या वाट्याला याव्यात यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या.त्यांची मुलगी इंदिरा देवी हीदेखील कूच बिहार राज्याचे महाराज यांना दिलेली होती व तिला चिमणाबाई दुसऱ्या या नावाने ओळखले जात असे. दुसऱ्या चिमणाबाई यांनी स्थापन केलेली चिमणाबाई वूमन इंडस्ट्रियल होम ही संस्था 1914 मध्ये सुरू झाली व या संस्थेचे उद्दिष्ट होते ते म्हणजे मध्यमवर्गातील विविध महिलांना प्रशिक्षण देऊन तांत्रिक तसेच औद्योगिक कामांमध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण वाढवणे आणि त्याचबरोबर महिलांमध्ये विविध कौशल्य नवनवीन तंत्रे आणि कलाकुसर यांचा विकास घडवून आणणे.याद्वारे महिला सक्षम होतील तसेच स्वतः कमाई करत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होऊन आपल्या स्वतःच्या तसेच कुटुंबासोबत समाजाच्या प्रगतीसही हातभार लावतील अशी त्यांची दृष्टी होती. या संस्थेतून मिळणाऱ्या नफ्याच्या एक लाख रुपयांचा विनियोग त्यांनी विविध मुलींना शिक्षण देण्यासाठी व शिष्यवृत्त्या घेऊन बाहेरच्या संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवायला केला बडोदा संस्थानामधून मुंबईला शिक्षणासाठी जाणाऱ्या स्त्रियांचा ओघ या निमित्ताने सुरू झाला. स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत असणाऱ्या महाराणी चिमनाबाई गायकवाड २३ ऑगस्ट १९६३ रोजी निवर्तल्या. त्यांनी केलेल्या कार्याची दखल आजही तेथील संशोधक घेतात मात्र त्यांच्याच देशात ज्या प्रजेसाठी त्यांनी कार्य केले तेथे या कार्याचे सोयीस्कर विस्मरण करण्यात आले आणि आज कोणत्याच मंचावर त्यांच्या नावाचा उल्लेखही होत नाही ही खेदाची बाब आहे. 

त्यांच्या नावाने उभारलेल्या हर हायनेस महाराणी चिमनाबाई टॉवरची इमारतही बडोदा महानगरपालिकेने काही दुकानांसाठी भाड्याने दिली होती आणि त्यामुळे ह्या वास्तूचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

6.17.2023

जगातील महा बोधविहार

                                                            जगातील महा बुद्धविहार  

२५०० हजार वर्षांपासून बौद्धधर्म अस्तित्वात आहे.  बौद्ध धर्माचा प्रसार आणि  विस्तार व्हावा यासाठी जगभरात बौद्धभिकूनी अनेक स्तूप व विहार बांधले .  आजही काही  वस्तू , वास्तू व स्तूप नव्याने आढळून येत असून जे बौद्ध धम्माच्या विस्तार आणि प्रसाराच्या कहाण्या कथन करत आहेत.  असेच एकदा कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकांची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!खरेतरं, अविश्वसनीय!  त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती! 

एक महाविहार ! भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक महाकाय बुद्ध विहार !आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे वंदना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.एवढे अवाढव्य वंदना स्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!एका कंबोडियन बौद्ध सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! 

इसवीसन ११५०च्या सुमारास! मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' विहार आहे, भगवान बुद्धांचे...! मुख्य प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! विहाराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे! ४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच विहाराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, विहारात नाही! पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य विहाराजवळ येतो!तत्कालीन कंबोडियन बौद्ध राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य विहार घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल! 'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!दुसऱ्या सुर्यवर्मनने हे विहार घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या विहारासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!  ४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम.  

दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य  महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ!  त्याला त्याच्या जिवनकालातचं हे विहार पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

 डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य! या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम! आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती  महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य विहाराची सुरुवात!  सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर विहाराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले  चार  कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!  हे विहार पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख! युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, बौद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या विहाराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते! या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत! विहारात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा! ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं! हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!  हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक  छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच, तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परत सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची! असे अवाढव्य बुद्ध विहार बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवने हे सारेचं अफलातून! असे म्हणतात की या विहाराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.

संदर्भ व्हॉट्सॲप 

6.07.2023

डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख (Darwins Theory of Evolution)

 अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांतच  वगळला : डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख 


मानव व प्राणी यांची उत्क्राती विषयी माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल व संभ्रम आहे..  निसर्ग निर्मितीबरोबरच पृथ्वीतलावर  प्राणी वनस्पतीची व सर्व जीवांची निर्मिती व उत्पत्ती परमेश्वरानेच केली आहे असा दृढ समज जगातील अखंड जगातील विविध जाती धर्मात आढळून येते.  परंतु १९०० व्या शतकात डार्विन नावाच्या  प्रचंड विद्वान आणि जैवविविधतेच्यां   अभ्यासकाने अनेक निष्कर्षातून मानव व प्राणी यांच्या उत्क्रांतीचे रहस्य जगासमोर मांडले त्यालाच आपण आज उत्क्रांती म्हणतो. व सर चार्ल्स डार्विन यांना उत्क्रातिवादाचा जनक म्हणून ओळखले जाते. 

चार्ल्स डार्विन या वैज्ञानिकाने एकोणिसाव्या शतकात प्रचंड मेहनतीने संशोधन करून जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दलचे सिद्धान्त मांडले. बायबलमधील जीवसृष्टी आणि मानवाच्या उत्पत्तीच्या संदर्भातील ‘जेनेसिस’च्या संकल्पनेला डार्विन यांनी छेद दिला. बाविसाव्या वर्षी, म्हणजे १८३१मध्ये त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात पुरेसा वेळ घालवता येईल, अशी संधी चालून आली. समुद्राच्या प्रवाहांचा, खोलीचा अभ्यास करणे, युरोपीय आरमाराच्या गलबतांचा प्रवासमार्ग ठरवण्यासाठी सागरी मार्गाचे नकाशे तयार करणे या व अशा कामांसाठी सागर सफरींचे वारंवार आयोजन करण्यात येत होते. ‘एचएमएस बीगल’ नावाच्या जहाजाची अशीच एक मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेसाठी सागरी किनाऱ्यांवरील जीवसृष्टीचा, जीविधतेचा अभ्यास करणारा, त्यात रस असणारा एखादा तरुण निसर्ग अभ्यासक त्यांना हवा होता. तरुण चार्ल्सला हे कळल्यावर, त्याने वेळ वाया न दवडता खूप धडपड करून या मोहिमेत प्रवेश मिळवला.

सन १८३१मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर जहाजावर चढलेले चार्ल्स डार्विन आणि १८३६मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर उतरलेले चार्ल्स डार्विन यांच्या जीवसृष्टी व जीविधतेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला होता. या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी, दर मुक्कामात जीवसृष्टीचा सखोल अभ्यास केला. देवाने एकाच वेळी एकाच ठिकाणी काही तरी विशिष्ट शरीररचना असलेले जीव तयार केले आणि ते त्याच ठिकाणी काहीही बदल न होता टिकून राहिले, या त्यांच्या समजाला तडा गेला. ते या अफाट नैसर्गिक सृष्टीकडे वेगळ्या, नव्या नजरेने पाहू लागले. या सखोल निरीक्षणातून जीवसृष्टीच्या निर्मितीचे कोडे उलगडण्याची प्रक्रिया त्यांच्या डोक्यात हळूहळू चालू झाली. जीवसृष्टीतील विविध जिवांचा एकच समान पूर्वज असणार, असे त्यांना सर्व निरीक्षणांवरून वाटले. आश्चर्य म्हणजे १९२८मध्ये, म्हणजे डार्विन यांच्या मृत्यूनंतर जवळपास ४६ वर्षांनी ओपारीन आणि हाल्डेन या जोडगोळीने साधारण साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी जैविक रसायनांच्या अभिक्रियेतून सजीवांच्या शरीरातील मूलभूत रासायनिक घटक असलेला पेशीद्रव्याचा एक ‘गोळा’ निर्माण झाला; हा गोळा सजीवांचा मूळ जनक असला पाहिजे, असा सिद्धान्त मांडला. पुढे स्टेनले आणि मिलर या शास्त्रज्ञांनी हा सिद्धान्त प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवला. डार्विन यांच्या विचारांमध्ये डोकावणारा हाच तो सामायिक, समान पूर्वज. पुढे या सामायिक पूर्वजापासून लाखो शाखा-उपशाखा असलेला जीवसृष्टीचा महावटवृक्ष निर्माण झाला. एकूणच जीवसृष्टी अतिशय संथ; पण सातत्याने चालू असलेल्या परिवर्तनातून, म्हणजेच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे, हे डार्विन यांच्या लक्षात येऊ लागले. डार्विन यांची निरीक्षणशक्ती अफाट आणि बुद्धिमत्ता विलक्षण होती. त्यांनी गोळा केलेल्या प्राणी व वनस्पतींच्या नमुन्यांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून, ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पिसीज’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी सर्व सजीव प्रजाती एकाच समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने, लाखो वर्षांच्या कालखंडात नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार विकसित झाल्या आहेत आणि होत आहेत, असा निष्कर्ष मांडला. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर युरोपातील धर्ममार्तंड खवळून उठले. याचे कारण, ‘जेनेसिस’मधील सर्व संकल्पना या ग्रंथामुळे बाद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे डार्विन यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. 

या ग्रंथानंतर मानवाच्या उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध कहाणी सांगणारा ‘द डिसेंट ऑफ मॅन’ हा डार्विन यांचा दुसरा अत्यंत मौल्यवान ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी मानवाची उत्क्रांती कशी झाली असावी, याचे तर्कसंगत, शास्त्रीय आधारावर वर्णन केले. आजच्या काळातील वानर-माकड, गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस हे सर्व प्राणी त्यांच्या विशिष्ट लक्षणांमुळे वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार ‘प्रायमेट’ या एकाच गटात मोडतात. पुढे वानर-माकड यांचा वेगळा गट झाला, तर गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि मानवाचा आदिपूर्वज यांचा वेगळा गट बनला. या गटाला ‘कपी’ किंवा ‘एप’ या नावाने ओळखले जाते. या सर्वांचा एकच सामायिक, समान पूर्वज होता. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या ओघात एकाच पूर्वजापासून या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत गेल्या. यात पुढे साधारण ७० लाख वर्षांपूर्वी चिंपांझी आणि मानव यांचा समान पूर्वज अवतरला. त्याला नाव दिले गेले ‘साहेलान्थ्रोपस’. हा आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात वास्तव्य करत होता. या प्राण्यापासून ४० लाख वर्षांपूर्वी पुढे दोन वंश निर्माण झाले. एक म्हणजे, चिंपांझी आणि दुसरा मानववंशाचा खरा मूळपुरुष ‘ऑस्ट्रॅलोपिथेकस’. यांची पुढील लक्षावधी वर्षे उत्क्रांती होत गेली. त्यांच्या मेंदूच्या आकारमानात बदल होत गेले. बुद्धी अधिक प्रगल्भ होत गेली आणि साधारण ५० हजार वर्षांपूर्वी आजच्या मानवाची, म्हणजे आपली, म्हणजेच ‘होमो सेपियन्स’ या प्रजातीची उत्पत्ती झाली. यावरून हे सिद्ध होते, की माणूस आणि माकड यांचे मूळ पूर्वज समान असले, तरी माकडापासून माणसाची उत्पत्ती झालेली नाही; किंबहुना कपी कुळातील गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस या सर्वांमध्ये काही मूलभूत लक्षणे सारखी असली, तरी त्यांच्यात कमालीचे वैविध्य आहे. त्यातल्या त्यात चिंपांझी आपल्याला अधिक जवळचा आहे. माणूस आणि चिंपांझी यांची ९८ टक्के जनुके (जीन्स) एकसारखी आहेत.


या सर्व बाबींचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, की माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालेला नाही. वास्तवात डार्विन यांनीही हे कधी म्हटले नव्हते. दुसरे म्हणजे, पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती विविध धर्मग्रंथांमध्ये उद्धृत केल्याप्रमाणे कोण्या एकाने केली नसून, ४५० कोटी वर्षांच्या इतिहासात पृथ्वीच्या अवाढव्य रंगमंचावर सातत्याने सुरू असलेल्या उत्क्रांतीच्या महानाट्यातील अगणित अंकांच्या आणि प्रवेशांच्या माध्यमातून साकारली आहे. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीसंबंधी एवढे धडधडीत पुरावे असलेला सिद्धान्त अभ्यासक्रमांतून वगळण्याचा अट्टहास का केला जातो आहे, हे समजत नाही. ‘एनसीईआरटी’तर्फे अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात हा सिद्धान्त समाविष्ट केला जाईल. यावर एक युक्तिवाद असा आहे, की दहावीनंतर सगळेच विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेत नाहीत. विज्ञानाव्यातिरिक्त अन्य शाखाही आहेत. अशा विद्यार्थ्यांना डार्विनचा उत्क्रांतिवाद कसा कळणार? असे विद्यार्थी भविष्यात कदाचित धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या मानव आणि अन्य सजीव यांच्या उत्पत्तीच्या व उत्क्रांतीच्या चुकीच्या, अशास्त्रीय, अंधश्रद्धा रुजवणाऱ्या, भ्रामक संकल्पना शिकतील. त्यांना डार्विन कधी भेटणारच नाहीत. संबंधित अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना डार्विन यांच्या मूलभूत उत्क्रांती सिद्धान्तांची ओळख करून द्यावी, एवढीच अपेक्षा.

Whtasapp source  

(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.) 

4.24.2023

राजऋषी गणपतराव देशमुख ( Shri Ganpatraoji Deshmukh - MLA) लेखक कविवर्य इंद्रजित भालेराव



 राजऋषी गणपतराव देशमुख 

लेखक  कविवर्य इंद्रजित भालेराव 



सांगोल्याचा विषय निघाला की अपरिहार्यपणे गणपतराव देशमुख यांचं नाव समोर येतंच. योगायोगानं माझ्या आणि गणपतरावांच्या काही भेटीही झालेल्या आहेत. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला मी पाहुणा म्हणून गेलो होतो. एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाला सांगोल्याला गेलो तेव्हा सूतगिरणीच्या अतिथीगृहात थांबलो होतो, तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. एकदा शिवाजीराव बंडगर या कवीमित्राच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला गेलो तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. त्या कार्यक्रमाचे गणपतराव अध्यक्ष होते. 

पण ह्या भेटीगाठीपेक्षाही गणपतराव कितीतरी मनात रुजलेले होते ते त्यांच्या कर्तृत्वामुळं. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक अपवादभूत व्यक्तिमत्व. जो माणूस सतत ११ वेळा निवडणुका जिंकला, ५१ वर्ष विधानसभेत निष्कलंक राहिला, आपल्या वयोवृद्ध अनुभवाचा सर्वांना फायदा देत आला, ज्याच्या मतदारसंघात कापसाचं बोंडही पिकत नव्हतं त्या ठिकाणी आदर्श सूतगिरण्या चालवून एक चमत्कार घडवून आणला, ज्या माणसानं पंढरपूर वरून प्यायचं पाणी सांगोला मतदार संघात आणून गावागावात नेलं, आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, ज्या पंढरपुरातून पाणी आणलं त्या पंढरपुरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना सांगोल्यात आणि तालुक्यातल्या ८२ गावात मात्र गावोगाव आणि घरोघरी वेळेवर पाणी येत होतं, ज्या माणसानं वर्षानुवर्ष दुष्काळ परिषदा आणि पाणी परिषदा घेऊन जागृती केली, भयान दुष्काळी भागाला ओलिताखाली आणण्यासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावले, त्यासाठी आंदोलन केली, धरणे धरले, शासनाचा पाठपुरावा केला, ज्या माणसानं आयुष्यात चुकूनही आपला शेतकरी कामगार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा विचारही केला नाही, वेळोवेळी वेगवेगळ्या सरकारकडून मंत्रीपदाच्या ऑफर आल्या असतानाही ज्या माणसानं पक्षनिष्ठा ढळू दिली नाही, जो आयुष्यभर तत्वाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिला, ज्या पक्षाची वाताहात झालेली दिसत असतानाही तो पक्ष सोडून तो इतर पक्षात गेला नाही, काम तर एवढं निर्मळ ही भ्रष्टाचार चुकूनही मतदारसंघात कुठं होऊ दिला नाही, केला नाही, त्यामुळे विकासातून विकास, विकासातून विकास असेच फाटे फुटत गेले, सगळ्यात जास्त दुष्काळी असलेला हा भाग सगळ्यात सुकाळी करण्याचा या माणसानं आयुष्यभर जीवतोड प्रयत्न केला. ज्या माणसानं राजकारणात नेहमीच कोणाच्या वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं. असा हा एक आगळा वेगळा माणूस.

१९८० साली गणपतरावांनी शेतकरी सहकारी सुतगिरणी सुरू केली. गणपतरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पक्षाचं नावच होत शेतकरी कामगार पक्ष, त्यांच्या सूतगिरणीचं नाव होतं शेतकरी सहकारी सूतगिरणी, त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्थेचं नाव आहे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण संस्था, म्हणजे गणपतरावांनी आपल्या प्रत्येक कामात शेतकरी हा केंद्रीभूत मानलेला आहे. प्रत्यक्ष तसं आचरण करून दाखवलेलं आहे. गणपतरावांनी शेतकरी सुतगिरणी काढली आणि तिचा नफा इतका झाला की त्यातून त्यांना शेतकरी सूतगिरणीच दुसरं युनिट काढावं लागलं. या दोन्ही गिरण्यांचा नफा वाढतच गेला. कारण तिथं भ्रष्टाचार करणारं कुणीही नव्हतं. त्यामुळं नफा सरळच शिल्लक राहत होता. त्यातून त्यांनी खास महिलांची म्हणून तिसरी सूतगिरणी काढली. अर्थात गणपतराव या सूतगिरण्यांमध्ये कुठेही कधीही पदावर नव्हते. त्यांनी सतत आपल्या कार्यकर्त्यांना मानाच्या जागा दिल्या. आणि आपल्या अनुभवी मार्गदर्शनाखाली या सूतगिरण्यांची प्रगती घडवून आणली

या सूतगिरण्यांमुळे सांगोल्याच्या दुष्काळी भागातून स्थलांतरित होणारी कुटुंबं आपल्याच गावी सुखानं आणि आनंदानं राहू लागली. या सूतगिरण्यांचा हा आदर्श कारभार पाहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या सूतगिरण्यांची दखल घेतल्या गेली. जगभरातून या सूतगिरण्यांच्या सुताला मागणी आली. सूत निर्यात होऊ लागलं आणि देशाला परकीय चलन मिळू लागलं. या आदर्श कारभारामुळे सूतगिरण्यांना राष्ट्रीय पातळीवरील सहकाराची अनेक पारितोषिक मिळाली. सूतगिरण्यांचा नफा कामगारांमध्ये वाटप केल्यामुळं कामगारांना आपल्या गृहनिर्माण सोसायट्या तयार करता आल्या. सूतगिरण्यांच्या नफ्यातूनच गणपतरावांनी सामूहिक विवाहाच्या संकल्पना राबवल्या, दुष्काळाच्या काळात सूतगिरण्यांच्या आर्थिक नफ्यातून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या हा तर एक वेगळाच आदर्श होता. ह्या केवळ सूतगिरण्या नव्हत्या तर सांगोल्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा तो मानदंडच ठरला. या सूतगिरण्यासोबतच आमच्या मराठवाड्यात निघालेल्या सूतगिरण्यांचे नटबोल्टही शिल्लक नाहीत. तिथं या सूतगिरण्या दिमाखानं उभ्या असून सतत नफ्यातच आहेत. आता या व्यवसायाला राष्ट्रीय पातळीवर घरघर लागली असतानाही सांगोल्यातल्या सूतगिरण्या मात्र आदर्श पद्धतीनं सुरूच आहेत.

गणपतरावांनी शिक्षण संस्था काढली, पण सगळीकडं आपल्याच शिक्षण संस्थेची महाविद्यालये आणि शाळा काढल्या नाहीत. वेगवेगळ्या लोकांना जागोजाग संस्था काढायला लावून त्यांच्या शाळांना विनामूल्य परवाना मिळून दिला. दुसऱ्या कोणी महाविद्यालय काढलं तर त्यालाही सर्वतोपरी मदत केली. नाही तर चार-पाच महाविद्यालये आणि पाच-पन्नास शाळा काढून शिक्षण महर्षी होणं त्यांना सहज शक्य होतं. पण गणपतरावांनी तसं केलं नाही. सगळ्या अधिकारांचं सगळ्यांपर्यंत वितरण झालं पाहिजे हा लोकशाही शब्दाचा खरा अर्थ गणपतरावांना समजलेला होता.

गणपतरावांच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं निखळ मोठेपण महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांना मान्य होतं. त्यामुळं बहुतेक पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करीत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत एकदाही त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही वाटायचं की गणपतरावाच्या विरोधात आपण उमेदवार उभा करू नये. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला तर त्यांच्या विरोधात शक्यतो इतर पक्ष उमेदवार देत नसत. त्यामुळे गणपतरावांचा सतत लढत झाली ती काँग्रेस पक्षाशी. आणि त्यातल्या त्यात शहाजीबाबू पाटील यांच्याशी. शहाजी बापूंनी त्यांच्या विरोधात सहा वेळा निवडणुका लढवल्या. त्यातल्या एकाच वेळी शहाजीबापू निवडून आले. गणपतरावांसारखा अनुभवी आणि आदर्श माणूस विधानसभेत असावा असं सगळ्याच पक्षांना वाटायचं. त्यांच्या अनुभवाचा फायदा विधानसभेला व्हावा म्हणून अनेकदा गणपतरावांचं मार्गदर्शन घेतलं जायचं.

या माणसाचं जगणं, या माणसाचा आदर्श मी नेहमीच माझ्या भाषणातून वेळोवेळी महाराष्ट्रभर सांगत आलेलो आहे. असाही एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आहे याचं वेळोवेळी लोकांना आश्चर्य वाटत आलेलं आहे. अशा माणसाच्या गावी होणाऱ्या साहित्य संमेलनाला मी तीन दिवस होतो. पण आता गणपतराव देशमुख नव्हते. दोन वर्षांपूर्वी नुकतंच वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण चार महिन्यापूर्वीच त्यांच्या शिक्षण संस्थेतले एक प्रा. डॉ. किसनराव माने यांनी 'राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख' हा ग्रंथ लिहिला. तो त्यांनी मला भेट म्हणून पाठवला होता. त्यामुळे गणपतराव नसले तरी माने सरांना भेटूयात आणि गणपतरावांच्या आठवणींचा उजाळा देउयात असं मी ठरवलं. 

सरांनी दिलेलं पुस्तक मी केव्हाच वाचलं होतं. सरांना कळवायचं राहून गेलं होतं. म्हणून संमेलनाला आलो तेव्हा सरांना फोन केला. माने सर म्हणाले, सर आपण तर भेटूयातच पण गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा आपण त्यांच्याकडंही जाऊयात. मलाही उत्सुकता होतीच. गणपतरावांच्या भेटी जरी बाहेर झाल्या असल्या तरी सांगोल्यात त्यांच्या घरी मला जाता आलं नव्हतं. म्हणून संमेलन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब देशमुख यांच्याकडे जायचं ठरवलं. त्याआधी माने सरांनी स्वतःच्या घरी नेलं. त्यांच्या नवीन आलिशान घरात त्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही बाबासाहेब देशमुख यांच्याकडं गेलो.  

गणपतराव असे तत्वनिष्ठ राजकारणी होते की त्यांनी आपण असेपर्यंत आपल्या नातलगांना, मुलांना कधी राजकारणात येऊ दिलं नाही. जो काही वाव द्यायचा तो आपल्या कार्यकर्त्यांनाच दिला पाहिजे म्हणून मुलांना त्यांचे त्यांचे व्यवसाय करायला लावून कार्यकर्त्यांना राजकारणात वाटा देण्याचं काम गणपतरावांनी आयुष्यभर केलं. पण गणपतरावांच्या निधनानंतर लोकाग्रहास्तव बाबासाहेब देशमुख यांना राजकारणात यावं लागलं. ते गणपतरावांचे नातू , एमबीबीएस डॉक्टर आहेत. पण लोकाग्रहास्तव त्यांना राजकारणात उतरावं लागलं. तोच साधेपणा, तीच मनमळावू वृत्ती, तीच सामान्य माणसासाठी झिजण्याची असोशी नातवात उतरलेली पाहून मला खूप आनंद वाटला. 

गणपतरावांचं घर, त्यांची बसण्याची जागा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बसण्याच्या खुर्च्या, त्या बैठकीतलं ते साधेपण गणपतरावांची सतत आठवण करून देत होतं. गणपतरावांच्या किसनराव मानेंनी लिहिलेल्या चरित्राविषयी इथंच लिहिलं पाहिजे. गणपतराव देशमुख यांच्या कारकिर्दीला न्याय देणारं असं हे पहिलंच पुस्तक डॉ. माने यांनी लिहिलेलं आहे. गणपतराव कुणाला दाद देत नसत. त्यांना स्वतःची प्रसिद्धी नको असे. राजा कांदळकरांनी गणपतरावांना बोलतं करून त्यांचं आत्मकथन लिहिण्याचा, शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला  पण गणपतरावांनी त्यांना फारशी दाद दिली नाही. म्हणून ते काम अपूर्णच राहिलं होतं. मी असं आयुष्यात काय मोठं केलेलं आहे की माझं आत्मचरित्र मी लिहावं असं गणपतराव म्हणायचे. ते काम किसन माने यांच्या पुस्तकाच्या रूपाने आता पूर्ण झालेलं आहे. 

किसन माने यांच्या गणपतराव यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की ते लेखक आहेत, प्राध्यापक आहेत आणि गणपतरावांचे कार्यकर्तेही आहेत. या तिहेरी गुणवत्तेमुळे हे चरित्र विश्लेषक, तर्कशुद्ध, तरीही मायेच्या ओलाव्यानं ओथंबलेलं आहे. मला गणपतरावांवर कधीतरी लिहायचं होतं. माने सरांनी निमित्त करून दिलं म्हणून त्यांचे आभार. अमरावती विद्यापीठाच्या उजळणी वर्गात माने सरांची पंधरा वर्षांपूर्वी माझी भेट झाली. आणि आम्ही कायमचे एकमेकांशी जोडल्या गेलो. त्यामुळे सांगोल्याला आलो आणि माने सरांना भेटलो नाही असं होणार नाही. म्हणून आवर्जून माने सरांना फोन केला. त्यांनीही आवर्जून बाबासाहेबांची भेट घडवून आणली. सांगोला भेटीतलं हेही एक महत्त्वाचं फलित म्हणायला हरकत नाही.

4.22.2023

उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी प्रा. डॉ. विधिन कांबळे

                      उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी

प्रा. डॉ. विधिन कांबळे

नुकत्याच खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रसंगी  अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. व  यामध्ये १३  जणांचा मृत्यू झाला आणि तब्बल ६०० ते ७००  जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे उष्माघात या गंभीर समस्या आहे यांची जाणीव आपणा सर्वांना झाली आहे.  सामान्यपणे दरवर्षी अशा  घटना विविध ठिकाणी घडत असतात. परंतु खारघरच्या घटनेने ही समस्या गंभीर असल्याचे दिसून येते.



वातावरणातील जास्त तापमान मानवी शरीर सहन करू शकत नसेल तेव्हा उष्माघात होत असतो.उष्माघात ही एक अशी स्थिती आहे जी तुमचे शरीर जास्त तापते तेव्हा उद्भवते, सामान्यत: गरम हवामानात दीर्घकाळापर्यंत संपर्क किंवा शारीरिक प्रक्रिये मुले आपल्या शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइट (४० अंश सेल्सिअस) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उष्माघात, डोके दुखापतीचा सर्वात घातक ठरू शकते.  उष्माघात झाल्यास संबंधित व्यक्तिला भरपूर घाम येतो. असंबंध बोलते.  त्वचा कोरडी किंवा गरम होते, मळमळ, उलट्या, हृदय गती वाढते, श्वसनक्रिया वाढते, जास्त तहान लागते, डोकेदुखी स्नायू पेटके येतात, आणि शुद्ध हरपते.  उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास उष्माघात तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना झपाट्याने हानी पोहोचवू शकतो. उपचार घेण्यासाठी  जितका जास्त वेळ प्रतीक्षा कराल तितके जास्त नुकसान होईल, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूची शक्यता वाढते. तेव्हा लवकरात लवकर सदर व्यक्तिला वैद्यकीय उपचार देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्या शरीराच्या तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर अगदी कमी असेल, तर अधोथॅलॅमस (Hypothalamus) शरीरातील स्नायू उद्दीपित करून कापरे उत्पन्न करतो व त्यामुळे जास्त उष्णता उत्पन्न होते. शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर अधोथॅलॅमस स्वेद ग्रंथींना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो यामुळे घाम येऊन त्याच्या बाष्पीभवनाने बरीच उष्णता बाहेर जाते. त्याचप्रमाणे त्वचेला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन त्वचेला रक्ताचा जास्त पुरवठा होतो व रक्तामधूम जास्त उष्णता बाहेर पडते. 

मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६° ते ३७·° से. एवढे असते. काही व्यक्तींमध्ये ते नेहमीच ३६° से. असू शकते. तापमानात दैनंदिन बदलही होतात. रात्री २ ते सकाळी ६ या दरम्यान ते सर्वांत कमी असते, तर सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान ते सर्वोच्च असते. या फरकाचा संबंध शारिरिक हालचालींशी आणि चयापचयाशी असतो. उन्हाळ्यात हवेचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा घामाच्या साह्याने शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्याचा प्रयत्न होतो.

उष्णतेच्या लाटांची स्थिती असताना किंवा हवेचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना शारीरिक कष्टाची कामे केल्यास, शरीरातील पाण्याची पातळी वेगाने कमी होते. अशा स्थितीत शरीराचे तापमान वाढू लागते आणि उष्माघाताचा त्रास सुरू होतो. दुसऱ्या स्थितीत, हवेचे तापमान ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आणि सापेक्ष आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर हवेतील बाष्पामुळे शरीरातून घाम येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो. थोडक्यात, उष्माघाताचा त्रास होण्यास फक्त वाढलेले तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रताही कारणीभूत ठरते.

उष्माघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना व काळजी घेणे जरूरी ठरते.




भरपूर पाणी अथवा द्रव पदार्थ जसे की ओ आर एस, लिंबू सरबत, ताक, मट्टा, दही फळांचा रस, आदिचे सेवन करणे. जास्त पाणी पिणे कधीही चांगले, मात्र अतिशय थंड पाणी पिणे टाळा. सैल-फिटिंग असलेले हलके कपडे घाला, फिकट रंगाचे कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा. डोक्यावर नेहमी पांढरा रूमाल अथवा टोपी वापरा.उष्णता वाढल्यास तोंडालाही रूमाल बांधा, नाक, कान पांढऱ्या रूमालने झाका.  घराबाहेर पडताना उषणतेचा डोळयांना शरीराला त्रास होऊ नये म्हणून गाॅगल टोपी रूमाल किंवा छत्री सोबत ठेवावी.एसीतून लगेच उन्हात, किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका१५ ते २०  मिनिटं सावलीत काढल्यानंतर उन्हात किंवा उन्हातून सावलीत उभं राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा. उन्हात जाणे टाळा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा, पाणी पित राहा. आपल्या बाळाला किंवा पाळीव प्राण्याला कारमध्ये कधीही सोडू नका.


काळजी घ्या सुरक्षित रहा ..!!!

  

Labels:

3.02.2023

मधुमेहींसाठी

 *जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे* 


जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे.

पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. TOI च्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोटात गेल्यावर अन्नाचे तुकडे होतात. यानंतर शरीर या अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेते.

अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न पोटात गेल्यावर खूप लवकर आतड्यात पोहोचते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते. याशिवाय चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चालणे हे कार्डिओ व्यायामासारखेच आहे.

यामुळे संपूर्ण शरीरात हालचाल होते जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Walking after meal) असते. चालल्याने पचनक्रिया गतिमान होते जेवणानंतर चालण्याने पचनक्रिया गतिमान होते, अन्न जितक्या वेगाने पोटातून लहान आतड्यात जाते, तितक्या लवकर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या सामान्य समस्यांपासून आराम मिळेल. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवणानंतर नियमित 30 मिनिटे चालण्याने आतड्यांचे कार्य सुधारते, तसेच बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.


मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर :

संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर चालणे केवळ पचन सुधारत नाही तर टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांना देखील फायदा होतो. न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातील संशोधकांच्या मते, जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढते. या ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन स्रावित केले जाते. परंतु, टाइप-2 शुगर असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. म्हणून, जेव्हा तो अन्न खाल्ल्यानंतर चालतो तेव्हा बहुतेक ग्लुकोज शरीरात उर्जेच्या स्वरूपात खर्च होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. संशोधनात असेही म्हटले आहे की, जे लोक जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खातात त्यांनी जेवल्यानंतर नक्कीच चालावे, खाल्ल्यानंतर चालण्याने शरीरातील क्रियाकलापांसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास त्यामुळं मदत होते.

Labels:

3.01.2023

विज्ञान

 *❤️ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!❤️*

विज्ञान सांगतं - 

❣️ विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं 

❣️ ते कारण आपल्या मानवी बुद्धीला समजू शकतं 

❣️सर्व कारणं आजच समजतील असं नाही पण जेव्हा केव्हा समजतील त्यावेळी विज्ञानाच्या नियमानेच समजतील.

❣️ही कारणं समजल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विकासासाठी, काही समस्या दूर करण्यासाठी करून घेता येतो.

❣️ हजारो वर्षे अनुत्तरित असणारे प्रश्न आधुनिक विज्ञानाने सोडवले आहेत. 

❣️ याचा अर्थ सर्वच प्रश्न सुटले आहेत असे नाही पण आज अनुत्तरित असणारे प्रश्न ही विज्ञानाच्या आधारेच सोडवता येणार आहेत. 

❣️ विज्ञान स्वतः काही चागलं किंवा वाईट ठरवत नाही. विज्ञान जे आहे ते, जसं आहे तसं आपल्यासमोर मांडतं.

❣️ शाळा महाविद्यालयांतून निबंध, भाषण स्पर्धेसाठी दिला जाणारा विज्ञान शाप की वरदान हा विषयच चूक आहे. विज्ञान हे वरदानच आहे. ते कधीच शाप असू शकत नाही. 

❣️ विज्ञान वापरणाऱ्याच्या विवेकावर आपण विज्ञानाला शाप किंवा वरदान ठरवत असतो. शाप किंवा वरदान हा विज्ञानाचा गुण नसून वापरणाऱ्याचा आहे.

❣️  विज्ञान संपल्यावर अध्यात्म सुरू होते ही समाजाने जोपासलेली एक गोंडस अंधश्रद्धा आहे. उलट जिथे अध्यात्म थांबतं तिथून विज्ञान सुरू होतं असं म्हणता येऊ शकतं.

❣️  विज्ञान हे अध्यात्माप्रमाणे मला सर्व समजतं किंवा समजलेलं आहे असं म्हणत नाही. 

❣️ आजपर्यंतच्या ज्ञानाच्या आधारे मला एवढं समजलेला आहे असं विज्ञान म्हणतं. अजून न समजलेल्या अनेक गोष्टी आहेत हे विज्ञान नम्रपणे मान्य करतं. 

❣️  न समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी विज्ञान नेहमी नवनवीन ज्ञानाच्या शोधात असतं. 

❣️ विज्ञान आपल्याला निर्भय, समग्र आणि व्यापक विचार करायला शिकवतं. 

❣️  निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग हे विज्ञानाचे सत्य शोधण्याचे मार्ग आहेत.

❣️  अलीकडे विज्ञानाचा वापर करून अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे (फलज्योतिष, वास्तुज्योतिष  वगैरे वगैरे) प्रकार सुरू आहेत त्यापासून सावध राहिलं पाहिजे.

*❤️ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!❤️*

1.13.2023

झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य

 पाण्याबद्दल एक महत्व पूर्ण माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवत आहे.



*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 

  मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* 

         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे.             हवा ही ऊर्जा आहे.            पाणी हे अमृत आहे           तर माती ही जननी आहे.         तर झाडं हे जीवनदायी आहेत. झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

  7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 

       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा.  झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. देशी झाडेच लावा.



9.01.2022

दुपारची झोप घेणारे एकदा नक्की बघा.!

दुपारची झोप घेणारे एकदा नक्की बघा.! 



झोपणे किंवा आपल्या शरीरासाठी झोप घेणे शरीराची एक गरज आहे. आपण दिवसभर केलेल्या धावपळीनंतर रात्री झोपणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. मानवी शरीराला 24 तासात मधून कमीत कमी सहा तास तरी झोपले पाहिजे. तसे तर मनुष्याच्या वयानुसार त्याच्या झोपण्याची वेळ देखील बदलत असते. जसे की लहान मुलांना जास्तीत जास्त वेळ झोपले पाहिजे तसेच मोठ्यांना कमीत कमी सहा तासांची झोप घेतली पाहिजे.

रात्री शांत झोप झाल्यावर पुन्हा दुपारी झोपण्याची सुद्धा काही जणांना सवय असते. वामकुक्षी हे सुंदर नाव त्याला देण्यात आलं आहे. पुणे शहर तर दुपारी १ ते ४ ही वेळ आराम करण्याची या समजुतीने वर्षानुवर्ष प्रसिद्ध आहे किंवा पुणे शहर सोडले तरी देखील कितीतरी शहरांमध्ये दुपारच्यावेळी 1 ते 2 तास का होईना पण एक डूलकी घेतली जाते पण दुपारची झोप घेणे आपल्या शरीरासाठी चांगली आहे की वाईट हे कसे कळणार.

दुपारी आपले सर्व काम झाल्यावर किंवा जेवल्यानंतर आपल्याला अचानक पणे आळस येतो आणि आपल्याला झोपावेसे वाटते. जर ती झोप आपल्याला मिळाली तर ती आपल्या शरीरासाठी चांगले असते. जर आपण दुपारची झोप घेतली तर हृ’दय’विकाराची शक्यता कमी होते त्याच बरोबर जे लोक दुपारची झोप घेतात त्यांची बुद्धिमत्ता जास्त चांगली असते असे म्हटले जाते.

त्यानंतर जे लोक कामावर जातात किंवा ते दिवसभर काम करत असतात आणि त्यांना झोपायला वेळ मिळत नाही ते आठवड्यातून तीन दिवस देखील दुपारची झोप घेऊ किंवा दुपारी तीस ते पंचेचाळीस मिनिटे अशी झोप घेऊ शकतात त्यामुळे दुपारची झोप घेणे हे काही वाईट नाही पण ही झोप कशा प्रकारे घेतली पाहिजे किंवा कोणत्या वेळी आणि किती वेळासाठी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.

दुपारी जेवण झाल्यानंतर तीस मिनिटानंतर आपल्याला झोप घेतली पाहिजे. त्यामधील पहिली पंधरा मिनिटे तुम्ही असेच बसू शकतात किंवा वज्रासन मध्ये बसू शकता आणि शेवटची पंधरा मिनिटे तुम्ही चालू शकता किंवा घरातील कोणतेही काम करू शकतात आणि त्या नंतरच आपल्याला झोपायला जायचे आहे. आणि झोपताना आपल्याला वामकुक्षी अवस्थेत झोपायचे आहे. म्हणजे त्यावेळी आपल्याला एक हात आपल्या डोक्याखाली घेऊन अशा अवस्थेत झोपल्यानंतर आपले अन्न पचायला देखील सोपे जाते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त 30 ते 45 मिनिटे झोपायचे आहे जास्त मिळते झोपल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा अनेक आजार देखील होऊ शकतात.दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. डायबेटिस आणि स्थूलपणा याचं सुद्धा प्रमुख कारण हे .
६० मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटिस २ या प्रकारच्या आजाराला समोरं जावं लागण्याची शक्यता पन्नास टक्यांनी अधिक वाढते. त्यासोबतच छातीचे आजार होण्याचं प्रमाण सुद्धा ८२% वाढतं असं डॉक्टर सांगतात. अकाली निधनाचं प्रमाण हे दुपारच्या झोपण्याने सत्तावीस टक्क्यांनी वाढतं असं एका डॉक्टर ने सांगितलं आहे.

थोड्या वेळासाठी म्हणजे ३० मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपण्याला आरोग्यास अनुकूल समजलं जात असलं तरीही ज्यांना त्याची गरज नाहीये त्यांनी ती सवय लागण्यासाठी प्रयत्न करू नयेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.


8.27.2022

विंचवाचं विष 80 कोटी रुपयांना 1 लीटर,


विंचवाचं विष 80 कोटी रुपयांना 1 लीटर, पण या विषाचं करतात तरी काय?

सर्पदंश हा प्राणघातक ठरतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्याला विंचू दंश झाला तर त्याची जीवघेणी तळमळ होते. विंचवाचा डंख हा अनेकदा प्राणावरही बेतू शकतो.

पण एवढ्याशा प्राण्याच्या नांगीत असलेलं विष हे जसं प्राणघातक असतं, तसंच ते कोट्यवधी किमतीचंही असतं हे तुम्हाला माहितीये?

टर्कीएमधल्या एका प्रयोगशाळेत दिवसाला विंचवाचं दोन ग्रॅम विष जमा केलं जातं. या प्रयोगशाळेतल्या विंचवांना बॉक्सबाहेर काढल्यानंतर प्रयोगशाळेतले कर्मचारी विंचू विषाचा छोटा थेंब सोडेपर्यंत वाट पाहतात. विषाचा हा थेंब गोठवला जातो, त्याची पावडर केली जाते आणि मग ती विकली जाते.

आपल्याकडे जसं शेळी पालन, कुक्कुटपालन करतात त्याचप्रमाणे मेदिन ओरॅनलेर हे विंचू पालन करतात. आपल्या या विंचू पालनाबद्दल बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "सध्या आमच्याकडे 20 हजार विंचू आहेत. आम्ही त्यांना योग्य प्रकारे खायला घालतो, त्यांची काळजी घेतो, त्यांचं प्रजननही करतो. त्यांच्यापासून मिळालेलं विष हे गोठवून ठेवतो. नंतर त्याचीच पावडर करतो आणि ती युरोपमध्ये विकतो."

साप खरंच डूख धरून बदला घेतो का? साप चावल्यानंतर तातडीने काय करायचं?
एका विंचवाच्या नांगीत केवळ 2 मिलीग्रॅम इतकंच विष असते. "300 ते 400 विंचवांपासून एक ग्रॅम विष मिळतं," मेदिन सांगतात.

जर ते हे विष विकतात, तर पुढचा स्वाभाविक प्रश्न आहे- त्याची किंमत काय आहे? ते सांगतात की, ते विंचवाचं एक लीटर विष हे एक कोटी डॉलर्सना विकतात. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 80 कोटी रुपये.

वैद्यकीय उपचारांमध्ये विंचवाच्या विषाचा वापर
मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विंचवांपासून काढण्यात आलेल्या विषामध्ये मार्गाटॉक्सिन नावाचा एक घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये नवीन पेशी तयार करायला मदत करतो आणि तो हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये वापरला जातो.

हे विंचू पाच सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटरपर्यंत वाढतात. त्यांचं विष हे जीवघेणं नसलं तरी या विंचवाच्या दंशामुळे वेदना होते तसंच सूज येते आणि दंश झालेल्या जागेवर खाजही सुटते.

युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधील प्राध्यापक आणि विंचू दंशाचे अभ्यासक डेव्हिड बीच सांगतात की, हे विष अविश्वसनीयरित्या परिणामकारक आहे.

योग्य तो परिणाम साधण्यासाठी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात याची गरज पडत असल्याचंही ते सांगतात.
शास्त्रज्ञ सांगतात की, मार्गाटॉक्सिन हे सहसा अशा औषधाच्या स्वरुपात वापरतात, जे गिळता येईल, श्वासावाटे शरीरात घेता येईल किंवा इंजेक्ट करता येईल. पण ते पुढे हेही म्हणतात की, हा घटक हृदयविकारावर उपचार करताना शिरेवर स्प्रे म्हणून वापरला जाऊ शकतो.

विंचवाच्या विषाचा हृदयविकारावरील उपचारासंबंधीचा हा अभ्यास तीन संस्थांच्या संयुक्तिक आर्थिक सहकार्यातून केला जात आहे. ब्रिटीश हार्ट फांउडेशन, द वेलकम ट्रस्ट आणि ब्रिटीश मेडिकल रिसर्च कौन्सिल या त्या तीन संस्था आहेत.

एखादा घटक माणसासाठी नैसर्गिकरित्या घातक असला तरी त्याचा उपचारांसाठी कसा उपयोग होऊ शकतो याचं हे चांगलं उदाहरण असल्याचं ब्रिटीश हार्ट फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर पीटर वेइसबर्ग सांगतात.

विंचवाच्या दंशाचे वैद्यकीय उपयोग कसे होऊ शकतात यावर गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे.

सध्याच्या घडीला विंचवाचं विष हे एक व्यावसायिक गोष्ट बनली आहे आणि ती कोट्यवधींमध्ये विकली जाते. केवळ वैद्यकीय उपचारांमध्येच नाही तर कॉस्मेटिक्स, वेदनाशामक तसंच रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचं विष वापरलं जातं.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये 2020 साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामधून असं म्हटलं गेलं होतं की, विषरोधक औषधांच्या निर्मितीमध्येही विंचवाचं विष वापरलं जाऊ शकतं.


8.16.2022

माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान* लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)

*माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान*

औरंगजेबाची छावणी खवासपूर(सांगोला) येथे माण नदीच्या दोन्ही तीरावर सप्टेंबर १७०० रोजी पडली होती . मराठी मुलकात पावसाळा संपत येण्याची ही वेळ . त्यात सांगोला तालुक्यातून वाहणारी ही माण नदी फार मोठी नदी नाही. पावसाळ्यात चार दोन दिवस पूराचे पाणी आले तरी बस्स ! माण नदीच्या दोन्ही तीरांवर बादशाही सरदार, मनसबदार यांच्या छावण्या, तंबू, राहुट्या पडल्या होत्या. खुद्द माण नदीच्या पात्रात देखील काही सरदारांच्या राहुट्या पडल्या होत्या. यावेळी माण नदीचे पात्र कोरडे होते.

माण नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकड्यात ता.१ ऑक्टोबर १७०० चे रात्री मुसळधार पाऊस पडला . खवासपूर छावणीतील मोगली सैन्य गाढ झोपेत असताना या पावसाने आलेल्या पूराची लाट नदीच्या पात्रात घुसली. लाटेच्या तडाख्याने नदी तुडुंब भरून वाहू लागली. तसेच नदीच्या पलीकडे असलेल्या मैदानातही पाणी घुसले. माण नदीच्या अचानक आलेल्या पूराने छावणीतील अनेक माणसे आणि जनावरे पाण्याच्या ओघात वाहून गेली. उरलेल्या अनेकांची चीज वस्तू नाहीशी होऊन ते नंगे फकीर बनले. या मंडळीत अमीर - उमरावांचा देखील समावेश होता. बादशाही छावणीतील सर्व तंबू आणि इतर मालमत्ता यांची अमाप हानी झाली.

    मध्यरात्र होण्याच्या थोड्या आधी जेव्हा छावणीत पूराचा लोट कोसळला तेव्हा साऱ्या छावणीत मोठमोठ्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. मराठे अचानक छावणीत घुसले असे औरंगजेबाला वाटले. त्यामुळे तोही दचकून जागा झाला. त्याचा पाय तंबूच्या कनाताचे दोराला अडखळून तो पडला. त्यामुळे त्याचा उजवा गुडघा निखळला. 

फौजेत शाही हकीम होते. त्यांनी तातडीने उपचार केले. पण बादशहाचा निखळलेला गुडघा त्यांना खोबणीत बरोबर बसविता आला नाही. त्यामुळे बादशहा मरेपर्यंत लंगडाच राहिला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे औरंगजेब बादशहा सतत तीन दिवस दरबारात जाऊ शकला नाही.

तीन दिवसांच्या दुखण्यानंतर बादशहा दरबारात आला तेव्हा बादशहाचा आवडता शहाजादा कामबक्ष याने एक हजार अश्रफ्या, दोन हजार रुपये व एक स्फटिकाचा पेला ओवाळून टाकण्यासाठी म्हणून बादशहाला नजर केला. 

औरंगजेब बादशहाच्या प्रवासातील मजला ठरविणे व मुक्कामाची जागा निवडणे याला #खुशमंजील म्हणत. त्या अधिकाऱ्याने अशी ही धोक्याची जागा मुक्कामासाठी कशी निवडली याची विचारणा त्याने मुखालीसखानाला केली. तसेच या संबंधीत अधिकाऱ्याचे हुद्दे काय आहेत याची माहिती घेण्यास त्यास सांगितले.

खवासपूरच्या माण नदीच्या पात्रात अचानक आलेल्या पूरामुळे बादशहा अडकून पडल्याने त्याचा गुडघा निखळला . तो १९ नोव्हेंबर रोजी बरा झाला . बादशहाने या दिवशी आंघोळ केली. तसेच ज्या हकीमाने बादशहाच्या गुडघ्यावर उपचार केले त्यालाही बादशहाने खिलतीची वस्त्रे दिली.

माण नदी एक छोटीशी नदी !

कधीतरी पावसाळ्यात वाहणारी व इतर काळात ठणठणीत कोरडी राहणारी. या चिमुरड्या नदीने सुद्धा मराठ्यांच्या लढ्यात आपले योगदान दिले. काबुल कंदाहार पासून जिंजी वेलोरपर्यंत राज्य कारभार करणारा हा बादशहा तिने कायमचा लंगडा करून टाकला . त्यामुळे या नदीचेही हे ऐतिहासिक कार्य असेच म्हणावे लागेल .

संदर्भ – सोलापूर जिल्ह्याचा इतिहास - मराठा कालखंड

लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)

11.10.2021

गोट बँक ऑफ कारखेडा'

गोट बँक ऑफ कारखेडा' 

 अकोला : आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या आहेत. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, अकोल्यात दोन वर्षांपूर्वी एका कल्पनाशक्तीच्या बाहेरील संकल्पनेची बँक स्थापन झाली आहे. राज्यासह देशाच्या ग्रामीण भागात 'अमुलाग्र' आणि 'क्रांतीकारी' बदल घडवू पाहणारी ही बँक आहे. 

या बँकेत पैशांचा कोणताही व्यवहार होत नाही. मात्र, येथील व्यवहार मात्र तुम्हाला लखपती, करोडपती बनविणारा आहे. मग बिना पैशांची ही बँक कशी आहे. कसं चालतं या बँकेचं काम?... ग्रामीण भागात बदल घडविणाऱ्या या बँकेचं 'मॉडेल' नेमकं आहे कसं? , 

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'गोट बँक ऑफ कारखेडा' समजवून घेऊयात. 

 काय आहे 'गोट बँक ऑफ कारखेडा' :

    आता तुम्ही म्हणाल की, बकऱ्यांची कुठं बँक असते का?. परंतू होय, 'गोट बँक ऑफ कारखेडा' हे याचं 'होय' असं उत्तर आहे. तुम्हाला नवल वाटत असलेली ही बँक आहे चक्क बकऱ्यांची... अन ही बँक आहेय अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी गावात. या बँकेत कर्जातही बकरीच मिळतेय... तुम्हाला व्याजही अगदी बकरीच्याच स्वरूपात भरावं लागतं... अन तुम्हाला डिपॉझिटही अगदी बकरीच्याच स्वरूपात भरावं लागतंय. अन तुमच्या बकरीच्या डिपॉझिटवरचं व्याजही तुम्हाला अगदी बकरीच्याच स्वरूपात मिळतंय.... म्हणजेच 'सबकुछ' बकरीच. 

ही बँक 4 जुलै 2018 मध्ये नरेश देशमुख यांनी अकोल्यात सुरू केली. देशमुख यांचं मुळगाव वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यातलं कारखेडा... म्हणून बँकेचं नाव ठेवलंय 'गोट बँक ऑफ कारखेडा'. नरेश देशमुख यांनी बँकेच्या टॅगलाईनमधून आपल्या कामाची आणि ध्येय्याची दिशा स्पष्ट केली आहे. 

'बँक ऑफ कारखेडा'ची टॅगलाईन आहे 'सामाजिक व आर्थिक क्रांती'.... नेमकं हेच त्यांना 'गोट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात साध्य करायचं आहे.

कोण आहेत नरेश देशमुख?

     नरेश देशमुख हे 'गोट बँक ऑफ कारखेडा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. नरेश देशमुख हे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या कारखेडा गावाचे रहिवासी. याच गावात त्यांची संपूर्ण जडणघडण झाली. 1995 ते 2000 असे पाच वर्षे ते कारखेड्याचे सरपंचही राहिले आहेत. नरेश देशमुख यांचं अद्यापही कारखेडा येथे घर आणि शेती आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ते अकोल्यात स्थायिक झाले आहेत. मातृभूमी असलेल्या कारखेडा गावाशी नाळ जुळलेली असल्याने देशमुख यांनी आपल्या या 'हटके' बँकेचं नावही ठेवलं 'गोट बँक ऑफ कारखेडा'... नरेश देशमुख यांचं अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झालं आहे...  

अशी सुरू झाली बँक :

    बँक सुरू करण्याची प्रेरणा नरेश देशमुख यांना आपल्या कारखेडा गावातील एका शेतमजुरामूळे मिळाली. या शेतमजुराने शेतमजुरीतून जोडलेल्या पैशांतून काही बकऱ्या विकत घेतल्यात. पुढे यातून मिळालेल्या पैशांतून त्याने तिन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. नंतर दोन मुलींची लग्नही अगदी धुमधडाक्यात केलीत. तेंव्हा गावातील अतिशय सधन समजल्या जाणाऱ्या कुटुंबांचीही आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना या शेतमजुराने हे सारं जुळवून आणलं होतं फक्त आपल्या जवळच्या बकऱ्यांच्या बळावर... याच घटनेनं बीजारोपण झालं 'गोट बँक ऑफ कारखेडा' या संकल्पनेच्या जन्माचं. देशमुख यांनी या गोष्टीवर पाच-सहा वर्ष चौफेर अभ्यास केला. अखेर 4 जुलै 2018 मध्ये या बँकेची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. 

    अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्याने देशमुख यांना अर्थशास्त्रातल्या 'कंपाऊंडींग'च्या सुत्रातून त्यांना ही संकल्पना सुचली. बकरी पालन हा 'सुपर कंपाऊंडींग'च्या सूत्रानुसार नफा देणारा व्यवसाय... म्हणून त्यांनी बकरी बँक सुरू करण्याचं ठरवलं. यासाठी सर्वात आधी त्यांनी 40 लाखांच्या 340 बकऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर गरजू शेतकऱ्यांना 1100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी कर्ज म्हणून दिलीय. हे देतांना बकरीच्या 40 महिन्यातल्या चार वेतातील प्रत्येकी एक अशी चार पिल्ल बँकेला परत करण्याचा करार केला गेला. बँकेला मिळालेल्या ११०० रूपयांत बँकेनं बकरी मालकाला पशुवैद्यक आणि पशुसखीच्या माध्यमातून आरोग्य, खाद्य आणि लसीकरण विषयक सल्ल्याची व्यवस्था करण्यात येते. अकराशे रूपयांत बकरीचा विमासुद्धा काढला जातो. त्यामूळे बकरीला काही झालं तर लाभार्थ्याला त्याच्या नुकसान भरपाईची हमी राहते. 

असा चालतो बँकेचा कारभार आणि संभाव्य फायदे :

  • 1100 रूपयांच्या करारात लाभार्थ्याला मिळते बकरी.
  • ग्रामप्रेरकाच्या माध्यमातून होतो करार.
  • 40 महिन्यांत चार बकऱ्या बँकेला परत करणे बंधनकारक.
  • बँक लसीकरण, खाद्य आणि रोग प्रतिबंधक सल्ला पुरविते.
  •  बँकेची नवी शाखा उघडण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांची आवश्यकता.
  • शाखेसाठी अडीच एकरांत बकरीच्या पशुखाद्यासाठी जंगली वनस्पतींची लागवड आवश्यक.
  • बँकेत बकरीच्या स्वरूपातच कर्ज, व्याज, परतफेड, डिपॉझिटची व्यवस्था.
  • बकरी सात ते आठ महिन्यांची झाल्यावर 35 ते 40 किलोची झाल्यावर विक्रीतून मिळू शकतो नफा. 

 सांगवी मोहाडी गावाला बनवले बँकेचे 'मॉडेल व्हिलेज' :

     बँक स्थापन केल्यानंतर या संकल्पनेचे दृष्य परिणाम दाखविण्यासाठी त्यांना कामाचे 'मॉडेल' उभे करणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी अकोला तालुक्यातील सांगवी मोहाडी गावाची निवड केली. मात्र, येथे काम उभं करणं अनेक आव्हानांनी भरलेलं होतं. लोकांना संकल्पना पटवून देणं, त्यांचा विश्वास जिंकणं यासोबतच लाभार्थ्यांची निवड करतांना त्यांच्यावर विश्वास ठेवणं या बाबी अतिशय कठीण. मात्र, 'इच्छा तेथे मार्ग' या तत्वानुसार देशमुखांनी स्वत:ला कामात झोकून दिलं आणि आज या गावात एका क्रांतीला सुरूवात केली. बँकेच्या माध्यमातून आज गेल्या दोन वर्षांत गावात अनोखी समृद्धी आलीय. बँकेनं कर्जात दिलेल्या 16 बकऱ्यांच्या आज गावात दोनशेंवर बकऱ्या झाल्यायेत. म्हणजेच सव्वा लाखांच्या कर्जावर गावानं तब्बल 16 लाखांची कमाई केली आहे. गावातील अनेक कुटुंब यातून आता लखपती झाले आहेत. अनेकांची कुटूंब सावरत प्रगतीकडे अग्रेसर झाली आहेत. आता दररोज अनेक लोक बँकेची माहिती घ्यायला येथे येत आहेत.


 बँक पहिल्या दोन वर्षांतच नफ्यात झाली 'करोडपती' : 

    नरेश देशमुखांनी व्यवसायाला सुरूवात केल्यानंतर सर्वात आधी त्यांनी 40 लाखांच्या 340 बकऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर गरजू आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना 1100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी देऊन टाकली. नंतर 40 महिन्यानंतर बकरीची चार पिल्ले आणून देण्यास सांगितले आणि व्यवसायाला सुरुवात झाली. असं पाहिला गेले तर बकरी 40 महिन्यात 30 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे त्यातील चार पिल्ले बँकेला आणून दिली तरी त्यांच्याकडे 26 पिल्ले राहतात. त्यानुसार महिन्याला नाही म्हटले तरी लाखो रुपयांचे उत्पन्न होते. बकऱ्याची किंमत ही त्याच्या वजनावर ठरते. एखाद्या बकऱ्याचे वजन 35 ते 52 किलो असेल तर त्यानुसार 12 ते 18 हजाराला बकरा विकला जातो. बकरा किंवा बकरीचे जीवन हे 8 ते 12 वर्षांचे असते. त्यानुसार ते 7 वर्षांपर्यंत पिल्लाला जन्म देऊ शकतात. बकरी ज्यावेळी पहिल्यांदा पिल्लाला जन्म देते त्यावेळी तिचे वय 7 ते 10 महिने असणे गरजेचे असते. तर बकऱ्याचे वय 4 ते 8 महिने असणे गरजेचे असते. तर बकरीच्या गर्भधारणेचा कालावधी 146 ते 155 दिवसांचा असतो. आतापर्यंत बँकेनं लाभार्थ्यांना दिलेल्या बकरींपैकी 800 पिल्ले शेतकऱ्यांनी आणून दिलीय. त्यानंतर बकऱ्यांची पिल्ले एका कॉन्ट्रॅक्टरला विकल्यानंतर बँकेला तब्बल 1 ते सव्वा कोटींचा फायदा झालाय. 

गोट बँकेची 'शाखा' स्थापन करण्यासाठी असं करता येईल.

    एखाद्या बचत गटाला किंवा बचत गटांच्या समुहाला (सीएमआरसी)ला गोट बँकेची शाखा आपल्या गावात स्थापना करायची असल्यास 13 लाखांचं भांडवल लागतं. यात आता माविमचं अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचंही 10 लाखांचं अनुदान मिळतं. सोबतच बकऱ्या ठेवायला 'शेड' आणि अडीच एकर शेतीत बकऱ्यांसाठी आवश्यक 20 प्रकारचा पशुखाद्य असणाऱ्या रानटी पाला आणि गवताची लागवड करणे आवश्यक आहे. या पशुखाद्याच्या विक्रीतून शाखेला अधिकचा नफा कमावणे शक्य आहे. शाखा सुरू करण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांचं भांडवलापासून गट सुरूवात करू शकतो. पुर्ण क्षमतेनं 800 बकऱ्यांपर्यंत नफ्यात असलेली शाखा सहा वर्षांत साडेतीन कोटींपर्यंत कमाई करू शकते असं गणित देशमुख पुराव्यांसह मांडतात. यातील खर्च वजा जाता एक शाखा सहा वर्षांत दोन ते तीन कोटींपर्यंत नफा कमावला जावू शकतो असं ते सांगतात. ते गणित असं

 नफ्याचं 'अर्थशास्त्र' :

  • ▪️ 800 बकऱ्यांच्या वाटपावर 40 महिन्यांत 3200 बकऱ्या आणि पिल्ले मिळतील. 
  •  ▪️एक पिल्लू किंवा बकरीचे वजन 30 किलो पकडले तर 3200 × 30 = 96,000 किलो. 
  • ▪️सध्या बकरीचे मटण 318 रूपये किलो आहे. त्यानुसार 9600 × 318 = 30528000

 'बँक ऑफ कारखेडा'ला मिळालं 'पेटंट' :

      नरेश देशमुख यांचा 'गोट बँक ऑफ कारखेडा'चा प्रयोग अतिशय 'अफलातून' आणि 'क्रांतीकारी' असाच. त्यामुळे त्यांनी या प्रयोगाचं पेटंट करायचा निर्णय घेतला. अन त्यांच्या या प्रयोगाला अलिकडेच पेटंटही मिळालं आहे. आता बँकेचा कारभार चालविण्यासाठी 'कारखेडा कृषी उत्पादक कंपनी' स्थापन करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे 521 भागधारक आहेत. 

बँकेनं अल्पावधीतच ओलांडलीत प्रगतीची क्षितीजं :

    या गोट बँकेची क्षितीजं आता राज्य आणि देशाच्या सीमा ओलांडतांना दिसता आहे. या बँकेच्या शाखा स्थापन करण्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेशासह नेपाळमधूनही विचारणा झाली आहे. राज्य सरकारनंही गोट बँकेच्या या उपक्रमाचं कौतूक केलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी पालघरसह अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्य़ांत शेळी बॅंकेचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत शेळी बॅंक उपक्रम राबवण्याचा महिला व बालविकास विभागाचा मानस आहे. 'माविम' यासाठी महिला बचत गटांना 10 लाखांचं कर्ज देणारेय. शेळी बँक उपक्रमासाठी राज्य सरकारच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि 'कारखेडा कृषी उत्पादक कंपनी' यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

 'गोट बँक ऑफ कारखेडा' हा ग्रामीण भागात क्रांती आणू पाहणारा प्रयोग आहे. जोडधंदा नसल्यामुळे शेती व्यवसायाला लागलेल्या आत्महत्येच्या किडीवर रामबाण उपाय ठरू पाहणारा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या शाश्वत विकासाच्या 'मॉडेल'ला by अधिक लोकाभिमुख करीत सरकारनं ताकद देणं गरजेचं आहे. यातून निश्चितच विकास आणि स्वयंपुर्णतेचं एक नवं पर्व ग्रामीण भागात सुरू होऊ शकतं हे निश्चित...


https://marathi.abplive.com/tv-show/special-report/akola-goat-bank-in-demand-special-report-abp-majha-979479/amp

10.14.2021

STUDY OF EFFECT OF MOSQUITO REPELLENT LIQUID ON RAT

 

STUDY OF EFFECT OF MOSQUITO REPELLENT LIQUID ON RAT

Kamble, V. S.

Department of Zoology  Sangola College, Sangola, Dist. Solapur(MS)

Introduction

          In most urban and rural area of the country mosquito population are menacing throughout the year. Mosquitoes are disease vector transmitting diseases such as malaria, filariasis and many viral diseases such as Japanese encephalitis, dengue, yellow fever etc.  currently variety of repellents are marketed in the form of coil, mat, vaporizers, lotions , buzzers electrocuting device etc. These repellent contains Allethrin group of compounds marketing in India well organized.  So that many brands can be found throughout the country. Repellents such as vaporizer and herb are widely used in the country to combat mosquito nuisance and malaria. Certain chemicals may affect through modulation of tissue microsomal mixed function oxidase that metabolize endogenous substances like steroid hormones and xenobiotics leading to drug interaction and possible toxicological consequences (Hodgson and Levi, 1994; Gibson and skett, 1994; Hoyumpa and Schenker, 1983).

Mostly in repellents synthetic pyrethroids are used. These insecticides are heat stable and used in the treatment of mat coil, and vaporizer includes allethrin, d- transallethrin, S-bioallethrin etc. on heating and burning of mat and liquids these compounds vaporize without decomposition at temperature up to 4000C and produce repellent action on  the mosquito. Pyrethroid insecticides have been used for more than 40 years in view of their wide availability, and accounts for 25% of the world insecticide market (Kakko et al., 2003, Shafer et al., 2005). Available literature suggest that indoor pyrethroid exposure is of considerable magnitude in India and other countries including United states (Bateman, 2000; Pankaj and Prahlad, 2004; Narahashi, 2000).  No much relevant data or considerable literature are available on the chronic toxic effect of the compound in humans (Pankaj and Prahlad, 2004; Kolaczinski and Curtis, 2004; Mishra and Singh, 2003).

Allethrin is a synthetic anologue of the natural pyrethrum insecticides obtained from the flowers heads of the plant Chrysanthenium cinerariafollium known to be act by immobilizing the insect nervous system through poisoning of its nervous system (Craig and Stitzel, 1987). Allethrin biodegraded by the environment after time in an indoor and outdoor situation.  The longitivity of allethrin in the environment varies from 1-2 hr in the atmosphere to less than 8hr in an aqueous environment.  Allethrin will be breakdown in to water, Co2 and other carbon based material. (www.thermocel.com). Chemical induced organ toxicity may manifest as tissue or organ damage and derangement of cellular metabolism, culminating in cell death and subsequently, organ failure (Gaw et al., 1998).

Considering these view present study was conducted to know about effect of mosquito repellent on different organs, biochemical changes and histopathology in rat which is correlated to various human health hazards.

Human Health hazard due to mosquito repellents

There is pucacity of information concern the effects on human health due to prolonged and long-term use of allethrin. (Pankaj and Prahlad, 2004; Kolaczinski and Curtis, 2004; Mishra and Singh, 2003).

Allethrin a type-1-pyrethroid is among the top few commonly used insecticides having maximum human exposure for prolonged period as it is used as chief component of mosquito repellent (Anvita et al., 2006; Tsuji, et al., 2002). Pyrethroids are lipopholic in nature responsible for various pyrethroid induced toxicity (Narahashi, 1996).

 The main site of action of the pyrethroids is the sodium channel, which is kept open for long period of time, causing prolonged sodium current to flow, leading to hyper excitation, of the nervous system.  (Narahashi et al., 1992). Synthetic pyrethroids like allethrin cause subnormal or super-normal excitability affecting the sodium channel opening time (Cheng et al., 1992).  

Many researchers are now providing data on the harmful health hazards due to repellents used against mosquito.Liu and Sun (1998) reported that mosquito coils containing aromatic and aliphatic hydrocarbons which are combustion product of wood, dist, filler and dyes in the mats. Gupta et al.,(1999) reported allethrin used in the mat and vaporizer increases blood brain barrier  and biochemical changes causing health risk, especially at early age. Narendra et al., (2008) Studied, allethrin induced biochemical changes in erythrocyte membrane of human.  They noticed reduction in phosphotidyl serin (PS) in human blood. They have also reported decrease in membrane cholesterol. Total phospholipid concentration and membrane lipid peroxidation.  Sharma (2001) in his study reported repellents are harmful to human health. In his stydy 11.8 % people using various types of repellent complained of ill health effect.   Mennon and Hanker (1998) stated that repellents could lead to running noise and wheezing, prolonged used could lead to corneal damage, asthama and liver damage. Diel et al., (1999) reported the immunotoxic properties of s-bioallethrin caused by inhibiting lymphocyte proliferation in a dose-dependent manner.   Moya –Quiles et al., (1995) suggested a possible insertion and aggregation of allethrin in the lipid bilayer of model membrane creating special domains with consequent increase in membrane instability and allethrin induced fluizing effect.  They also noticed that allethrin modified bilayer order (Moya-Quile et al.,1995)

Material and method

Mosquito repellent containing allethrin 0.88% (Good Knight) was selected for the study. Adult rat (Rattus rattus) weighing about 200-250 gm made available from the godown nearby Sangola. The collected rats were divided in three groups each having 5 individuals kept in steel cage and feed with pelleted food during winter and summer. 1st  group is assigned as control group, 2nd group as test group for 8 hr exposure to 0.88 % allethrin inhalation and 3rd group as test group for 24 hr for inhalation of allethrin 0.88 % for 30 days. Blood sample for biochemical study were collected from all animals prior to commencement of the studies and also at termination. From theses pooled sample estimation of glycogen by De Zwaan and Zandee (1972), total protein by Lowry (1951), total lipid by Barnes and Blackstock (1973).  Simultaneously, for histopathological study organs like liver, lung, kidney were pooled out from each group and fixed in formaldehyde and dehydrated with alcohol. These tissues were cleared with xylem and impregnated with paraffin wax and sections cut and stained with haematoxylen and eosin, and mounted on slides for light microscopic examination. For study of formulations available in the market, personnel interview with chemists and druggist of Sangola Dist. Solapur Maharashtra state  have been carried out.

 

 

Results

Study of effect of Mosquito repellent inhalation on some organs of rat:

There were no  significant difference in the mean body weight between control and inhaled animals.  The effect of inhalation of repellent on some organs weights at termination are shown in table No. 2. When compared to control wet-weight. The lung, and kidney showed decrease in weight but there was very little change in weight of liver.

Table:- No. 1. Effect of mosquito repellent liquid inhalation on organs weight of rat at termination of experiment after 30 days of exposure to allethrin (0.88% ).

 

Weight of organs (Wet-weight) in gm.

 

Organ

Control group

Test group

8 hrs of exposure

Test group

24 hrs of exposure

Kidney

1.54±0.06

1.48±0.09

(3.89%)

1.41± 0.05

(8.44%)

Lung

1.80±0.04

2.32±0.07

(28.88%)

2.53± 0.1

(40.55%)

Liver

8.12±0.23

8.16±0.25

(0.49%)

8.22±0.15

(1.23%)

 Values are expressed as means ± SD. Of n=5,

Values in parenthesis represents percent

 

Study of effect of mosquito repellent liquid on biochemical composition of rat.

Table No. 2. Effect of mosquito repellent liquid inhalation on serum biochemical constituents of rat at termination of experiment after 30 days of exposure to allethrin(0.88).

Parameters

Control group

Test group

 (8 hr)

Test group

(24 hr)

Blood glucose

64.34

61.23±0.11

(4.83%)

59.05±0.17

( 8.22%)

Cholesterol

112.67

105.72±0.23

(6.16%)

103.97±0.2

(7.72%)

Total protein

280.27

237.13±0.12

(15.39%)

212.54±0.22

(24.16%)

Values are expressed as means ± SD. Of n=5

Values in parenthesis represents percent

Study of mosquito repellent liquid inhalation on histopathology of rat:

 Histopathological study of different organs like liver kidney and lung have been carried out during chronic exposure to allethrin 0.88 % for 8hrs and 24 hrs daily for the duration of 30 days.  The lung showed inflammatory response, septa thickening and consolidation in alveolar areas, in contrast to normal bronchiolar epithelial wall and normal alveolar areas of lung of control group.

          In liver histological structure of control group showed normal hepatocytes. Whereas, rat exposed to mosquito repellent liquid (Allethrin 0.88%) for 8hr and 24 hrs exposure for 30 days  group showed morphological changes of liver characterized by proliferation of cells when compared with control.  Histopathological structure of kidney did not showed any change in both 8 hrs and 24 hrs of exposure of allethrin 0.88% for 30 day of exposure to rat  (Rattu rattus) when compared with histopathological structure of kidney  control.

Discussion :

Results obtained from experiment fo study of effect of mosquito repellent on rat shoed that the allethrin vapour inhalation caused change in weight of organs like kidney, lung and liver. Present study also showed effect on biochemical parameters including protein, glucose and cholesterol. Liu and sun (1987), exposed rats to the mosquito coil smoke for 60 days resulted in focal delication to tracheal epithelium, metaplasia of epithelial cells and morphological alterations of alveolar macrophages. Okine et al, (2004) reported decreased in lung and plasma biochemical parameter but not in kidney from albino rat due to mosquito coil. They further stated that smoke affect on tissue microsomal mono-oxygenase activities. Which are likely to affect the metabolism of the other xenobiotes and hence cause drug interaction. In present investigation similar might be the case where decrease in biochemical constituents have been observed.. Maximum decrease in protein level followed by cholesterol and blood glucose have been observed in both treated groups (8 hrs and 24 hrs) after 30 days of exposure to allethrin (0.88%).

          Histopathological studies of liver, lung and kidney in the rat indicated that lung was severely affected by inhalation of allethrin for 30 days in both the test groups. It has been also observed that kidney did not showed major damge to tissue. The lung tissue of both the  test group showed thickening of bronchiolar epithelial wal, alveolar wall, thickening of septa and consolidation in alveolar areas in 8hr and 24 hrs treated groups of rat for 30 days.  Similar observations have been reported by Okine, et al., (1985) Tong et al., (1983). They stated that damage to clara and alveolar cells of lung with concomitant reduction in some mono-oxygenase activities and increase in lung wet-weight.  Similar might be true about present investigation where wet-weight of lung was increased more than in kidney and liver. In animals and man, the liver is the organ responsible for  general metabolism including biosynthesis of protein. In present investigation due to inhalation of allethrin 0.88% for 30 day in both the treated groups showed histopathological alterations which affect the normal function of liver. Damage to hpatic cell indicated by gross morphological changes includes infiltration of liver and proliferation. Kidney is the most important organ involved in excretion of metabolic wastes, like  urea and creatinine.in the present study due to prolonged exposure to mosquito repellent liquid allethrin 0.88 % showed little damage to kidney tissue as compare to lung and liver.  It is also observed that  wet-weight of kidney did not increased more as compare to the lung and liver.

 

 

 

 

 

 

 

Table No. 3. Report of various kinds of mosquito repellents available in the market

Sr. No.

Formulation

Trade name

Main Ingredient

Mode of application

1.

Cream

Odomass

N-N Diethylbenzamide

Directly applied on body

2

Good knight

N-N Diethylbenzamide

3

Liquid Vaporizer

Good knight

Prallenthrin 1.6%

Emit fumes when heated

4

All out

Transfluthrin 1.66%

5

Total

Transfluthrin 0.88%

6

Good knight silver

Transfluthrin 0.88%

7

Mortin power guard

Transfluthrin 0.88%

8

Coil

Mortin power guard

D-transellethrin  0.1%

Releases smoke on burning

9

Good knight

Allethrin 0.2%

10

Maxo

D-transellethrin 1.0%

11

Tortoise Lazer

D-transellethrin 1.0%

12

Sweet dream (Herbal)

Neem, Tulasi, peppermint,  citronella

13

Marigold (Herbal)

Marigold, Neem, Tulasi,lime grass

14

Dhhop (Herbal)

Neem, tulasi, gober,

15

Mat

Mortin

Prellethrin 1.0%

Emit fumes when heated

16

Good Knight

Prellethrin 1.00%

17

All out

Prellethrin 1.00%

18

Spray

Hit

D-transmelathion  0.25%

Noxious fumes in the spray mist

19

Deltamethrin

Allethrin 1.30%`

20

Baygon (Allout)

Cyfulthrin 0,025%, transfulthrin 0.04%

 

Personal Interview with seller and some repellent user it has been observed that presently, coils and liquid mosquito repellents are used  in large number as mosquito repellents.  

 

 

 

 

 

 

 

Conclusion :

The in conclusion, the inhalation of mosquito repellent by rat caused selective damage to lung and liver. Kidney was not severly affected by inhalation of mosquito repellent.  It is possible that prolonged or chronic exposure/inhalation of mosquito repellent liquid in human may also be harmful and this will be investigated and need further study in this regard..

Suggestions or alternative measures to combat mosquito:

From the present study it has been observed that mosquito repellent and other device are not suitable and safe for human health. Considering this here I am going to suggest some safe alternative measures to the use of chemical based mosquito repellents. These measures requires personal, community and local bodies attention, which are as follows.

1.     Good drainage: Proper gradient should be provided to eliminate standing water in drains low-lying areas, pits burrows, ditches etc. periodical de-slitting of drains befor the onset of monsoonto maintain steady flow. 

2.      Regular (Weekly) emptying and drying of all standing water sources around houses.

3.     Underground and over head water tank well etc will be sealed properly to prevent entry of mosquito.

4.     Larvi-vorous fishes should be released in ponds, lake, drains etc.

5.     Personal protection includes use of mosquito net, wire mesh doors, windows and ventilator can be used

6.     Burning neem oil with kerosene would be cost effective alternative to chemical repellent.  

Acknowledgement:

I am very much thankful to University Grants Commission, Pune for providing financial assistance to this research work (Minor Research Project). I also thankful to Ex-Principal Dr. A. G. Pujari, In-charge Principal Dr. K. J. Ingole sangola College, Sangola Dist. Solpaur (MS) and Prof. Gadekar V. S. Head, Department of Zoology for providing necessary facilities for this project.

 

References

Anvita S., Mithilesh Kumar S., Rajendra Behari R. (2006). Ninety day toxicity and one-generation reproduction study in rat exposed to allethrin based liquid mosquito repellent. J. Toxicol. Sci. 31(1):1-7.

Bateman, D. N.(2000). Management of pyrethroid exposure. J. Toxicol. Clin. 38:107-109.

Cheng, V., Lee, H. R. and Chen, C. S.(1992) Toxicol Lett.62:163-177.

Craig, R. C. and Stitzel, R. E. (1994) Modern pharmacology, sixth edition. Little Brown and Company, USA. 33:39.

Curitis, C. F. and White, G. B. (1982)New Sci.:93-338.

Diel, F., Detscher, M., Schock, B. and Ennis, M. (1999) Allergy 53:1052-1059.

Gaw, A., Cowan, R. A., O’Reilly,  DSt. J., Stewart, M. J. and shepherd, J.(1998) Clinical Biochemistry:An illustrated colour text, Churchil Livingstone, Edinburgh,UK., 12(55):120-123.

Gibson, G.G. and Skett, P. (1994) introduction to drug metabolism, sec. Ed. Chapman and Hall Publishers, UK.; 1-24, 37-68, 78-104, 166-172, 220.

Gupta, A., Nigam, D., Gupta, A., Shukla, G. S. and Agarwal A. K.(1999)  J. Appl. Toxicol. 19:67-72.

Hodgoson, E. and Levi, P. A. (1994)Introduction to Biochemical Toxicology, Send Ed. Appleton and Lange, norwak, USA.

Hoyumpa, A. M. and Schenker, S.(1983) Major drug interaction: Effect of liver disease, alcohol and malnutrition. Ann. Rev. Med. 33:133.

Johansson, U., freriksson, A. and Eriksson, P. (1995) Err. J. Pharmacol. 293:159-166.

Kakko I., Toimela T., Tahti H.(2003). The symptosomal membrane bound ATPase as a targate fir neurotoxic effect pyrethroids. Permethrin and cypermethrin. Chemosphere 51:475-480.

Kolaczinski, J. H., Curitis CF(2004)Chronic illness as a result of low level exposure to synthetic pyrethroid insecticides : a review of debate. Food. Chem. Toxcicol. 42(5):697-706.

Liu, W. K. and Sun, S. E. (1998) Toxicol. Litt. 41:145-157.

Liu, W.K., Wong M. S. and Mui, Y. L. (1987) Toxicol. Litt. 39:223-230.

Lowry, O.H., Rosenbrough, N. N., Farr, A. L> and Randall, R. J. (1951). Protein measurement with the folin reagent. J. Biol. Chem.193:265-275.

Menon, S. and Halarnker, S. (1998) India Today, 70.

Mishra, D., Singh, H. (2003). Cypermethrin poisoning in pediatric patient. Pediatr. Tody. 6:322-324.

Moya-Quiles M. R., Munoz-Degado E., Vidal,  C. J. (1995). Interaction of pyrethroids insecticide allethrin on membrane fluidity. Biochem. Mol. Biol. Int. 36:1299—1308.

Moya-Quiles, M. R., Munoz-Delgado, E. and Vidal, C. J. (1994) Arch. Biochem. Biophys., 312:95-100.

Moya-Quiles, M. R., Munoz-Delgado, E. and Vidal, C. J. (1995) Biol. Chem.Mol. Biol. Int. 36:1299-08.

Narahashi, T. (2000). Neuronal ion channels as the basis for drug action: past, present and future. J. Pharmacol. Exp. Ther. 294:1-26.

Narahashi, T.(1996). Neuronal ion channels as the target site of insecticides. Pharmacol.Toxicol. 79:1-14.

Narahashi, T., Frey, J. M., Ginsburg, K. S. and Roy, M. L.(1992) Toxicol Litt.: 429-436.

Narrendra, M., Kavita, G., Padmavati, p., Helag Kiranmai A. and Varadhachayyulu, N. C. (2008) Allethrin Induced biochemical changes and properties of human erythrocyte membrane. Affr. J. Biochem. Res. 2(1):24-29.

Okine, L. K., Goochee, J. M. and Gram, T. E.(1985)studies on the distribution and covalent binding in vivo. Biochem. Pharmacol. 34(22):4051-4057.

Okine, L.K.N., nayarko, G.E., Armah, B., Awumbila, K., Owusu, S., Setsofia and Ofosuhnea, M.(2004) Adverse effect of mosquito repellent coil smoke on lung, liver and certain drug metabilishing enzymes in male wistar albino rat. Ghana Medical Journal.38(3):89-95.

Pankaj, G., Prahlad G (2004).  Mosquito coil(allethrin)  poisoning in two brothers. Indian Pediatrics 41:1177-1178.

Shafer, T.J., Mayer DA, Crofton KM (2005). Developmental neurotoxicity of pyrethroids insecticides: Critical review and future research needs. Enveron. Health. Perspect. 113(2):1-14.

Sharma, V. P., Ansari, M. A. and Razdan, R. K. (1993). Am. Mosquito control Assoc., 87,626.

Sharma, V. P., Ansari, M. A.(1994) J. Med. Entomol. 3:505-507.

Tsuji R., Kobayashi K.,  Ikeda, M., Yoshioka, T., Yamada T., Seki T., Okuno Y., Nakatsuka I., Tsuruo Y., Kishioka S. (2002). Lack of changes in brain muscarinic report and motor activity of mice after neonatal inhalation exposure to d-allethrin. J. appl. Toxicol. 22:423-429.

Zhou, J.F., Huang J.Z., Song, S.J. (1994). Measurement of plasma ascorbic acid and plasma d-tocopherol concentration in cerebral thrombosis patients and its clinical significance. Jizhen. Yixue. 3:73-77.

                    www.thermocel.com

               WWW.babycenter.in

 

Thanking you,                                                        Your faithfully

                                                                             (Dr. Kamble V. S.)