9.24.2019

एक झाड माणसाला ५० वर्षात काय काय देते.


  • एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
  • एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
  • एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
  • एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
  • एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
  • एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
  • एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
  • एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
  • एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या 
  • एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
  • एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
  • एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
  • जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
  • एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.

जरा विचार करा 
तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
.

Dr. vidhin Kamble

9.08.2019

मूग.. सर्वाधिक पौष्टिक अन्नअरविंद कुंभार,* (निवृत्त प्राध्यापक) पर्यावरण व पक्षी अभ्यासक तथा मुक्त पर्यावरण पत्रकार

मूग.. सर्वाधिक पौष्टिक अन्न पदार्थ म्हणून ओळखले जाणाऱ्या मुगाविषयी जाणून घ्या..*
✅मूग हे एक कडधान्य आहे. मूग खरीप पीकामध्ये मोडते. ज्वारी पिकविण्यासाठी योग्य असलेल्या रानात मुगाची पीक घेतली जाते. मे महिन्यात रोहिणी बरसले की मूग पेरतात. सामान्यपणे दोन ते अडीच महिन्यांत कमी पाण्यावर ही पीक घेतली जाते. मूग काढून झाल्यावर सामान्यपणे सप्टेंबर महिन्यातील उत्तरा नक्षत्राच्या पावसात त्या जमीनीत ज्वारी पेरली जाते. लेग्युम कुळातील मूग ज्वारीच्या पिकाला फार उपयोगी पडते; कारण मुगाच्या मुळ्यातील गाठीमुळे मातीत नत्र मिसळले जाते व मातीतील सुपीकता वाढते.
✅चीन, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, ब्रह्मदेश या भारताशेजरच्या देशांमध्ये मुगाची लागवड केली जाते. तसेच फिलिपाईन्स व इंडोनेशिया मध्येही मुगाची शेती केली जाते.
*मुगाचे प्रकार:*
काळे, पिवळे, पांढरे, लाल व हिरवे रंगाचे मूग हे मूगाचे प्रकार आहेत. काळे मूग स्वादिष्ठ व गुणकारी आहे.
*पौष्टिक महत्त्व:*
मूग हे सर्वाधिक पौष्टिक अन्न पदार्थ म्हणून ओळखले जाते. पोटॅशियम, आयर्न (लोह), मॅग्नेशियम, पोलेट, तांबे, जस्त इत्यादी लवण घटकांसह ब जीवनसत्त्व (व्हिटॅमिन बी,फोलिक आम्ल) हे अमाप प्रमाणात मुगात आढळतात. मुगामध्ये साधारणपणे २४प्रथिने(proteins), ५६ ये ६० कार्बोदके (carbohydrates) व  तंतू (fibers) आढळतात.
*ओषधी महत्व:*
मूग हे अतिशय ओषधोपयोगी धान्य आहे. मुगातील विविध घटकांमुळे अनेक रोगांवर मात करता येते. मूग सेवनाने अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य आहे. कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी रोगांवर मूग नामी उपाय आहे.
✅लेग्युम (Legume) कुळातील मुगाला विग्ना रेडिएटा (Vigna radiata) असे शास्त्रीय (वनस्पतीय) नाव आहे.
मुगापासून खिचडी, शिरा, डोसा, पापड, साडगे, पराठा,आप्पे, सूप, सॅलड, आमटी अशा नानाविध खाद्यान्न बनवतात.
🔵सद्या मी सेवानिवृत्तीनंतर शहरी जीवन त्याग करून ग्रामीण भागात राहायला गेलो आहे. आमच्या भागात पुरेसा पाऊस नसला तरी बेताचा आहे. यंदाच्या खरीपातील मूगाची पीक जोमाने आली आहे. त्यामुळे हिरव्या मुगचा आस्वाद घेत आहे.