10.30.2019

शरीराची मागणी लगेचच पुर्ण करा घाबरल्याने अनिष्ठ परिणाम होतात


शरीराची मागणी लगेचच पुर्ण करा 
घाबरल्याने अनिष्ठ परिणाम होतात 
पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.

मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११  चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.
लहान आतडे घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.
मोठे आतडे घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.
फुफ्फुसे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.
यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.
हृदय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.
स्वादुपिंड तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.
तुमचे डोळे तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता
आणि
तुमचा मेंदू तेव्हा घाबरतो जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.
तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.
हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य बसतील च असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या....

10.09.2019

मधुमेहाबद्दल जाणून घेऊ - (Information about diabetes) प्रा. डॉ. विधीन कांबळे

                  मधुमेहाबद्दल जाणून घेऊ - (Information about diabetes)  

आपणास माहित आहे. आपल्या शरीरात स्वादुपिंड इन्सुलिन (Insulin) तयार  करत असते. हे इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे कार्य करीत असते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर पेशीकडे पाठवली जाते व तिचा उर्जा निर्मितीसाठी चयापचयाच्या  माध्यमातून उपयोग केला जातो.
११ व्यक्तीच्या मागे १ व्यक्ती ही मधुमेहाने पिडीत आहे. जगातील ४६ टक्के लोक या आजाराने प्रभावित असून 2050  पर्यंत  ६२२ कोटी लोकांना या आजाराने ग्रासले असेल. असा जागतिक आरोग्य संघटनेने दावा केला आहे.
diabetis Type – १ चे प्रमाण इतर डायबेटीस चे तुलनेत कमी असते. या प्रकारात स्वादुपिंड पूर्ण पाने निकामी झालेले असते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही या प्रकारच्या डायबेटीसला इन्सुलिन डीपेंदन्ट डायबेटीस असे म्हणतात.
बऱ्याच लोकांचा असा समज आहे कि, diabetis Type – १ फक्त लहान मुलांना होणारा आजार आहे. वास्तविक पाहता मोठ्या माणसांमध्ये याचे प्रमाण ही खूप असल्याचे आढळून येते. diabetis Type – १ ला जुवेनाईल डायबेटीस असे म्हटले जाते.
 Type – १ चे प्रमुख ३  प्रकार आहेत.

१.      डायबेटीस -१
या प्रकारचा डायबेटीस प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळून येतो. एखाद्या कुटुंबात पूर्वी कुणालाही हा आजार झाला नसला तरी या प्रकारचा diabetis होतो. ३० वर्षानतर हा आजार फार कमी प्रमाणात होत असतो. या प्रकारात रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित असते. अशा प्रकारात इन्सुलीन तातडीने देणे गरजेचे असते.
२.      डायबेटीस -१ बी (आयडीयोपैथिक डायबेटीस )
या प्रकारात शरीरात इन्सुलिनचे प्रमाण च्या बरोबर असते. हा आजार अनुवांशिक असून पूर्वी कुटुंबातील व्यक्तीला झाला असेल तर हा आजार होण्याची श्यक्यता जास्त असते.
३.      लेटेंट ऑटोइमून डायबेटीस ऑफ अडल्टहुड (LADA)
हा आजार वयस्क व्यक्तीमध्ये हळू-हळू बळावत जातो. प्राथमिक अवस्थेत हा आजार औषधोपचाराने बरा होऊ शकतो.
डायबेटीस-१ ची  लक्षणे ही लक्षणे व्यक्ती व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. ती खालील प्रमाणे आहेत.
१.      खूप तहाण लागणे.
२.      लघवीचे प्रमाण जास्त असते.
३.      सुस्ती येणे व थकवा जाणवतो.
४.      त्वचेला खाज सुटणे.
५.      दृष्टी अंधुक होणे.
६.      शरीराच्या वजनात कमालीची घट होते.
७.      चक्कर येणे.
८.      सतत उदास वाटणे.
९.      शरीरात गाठी होणे.
१०.  जखम झाल्यास भरून येण्यास खूप वेळ लागतो अथवा जखम  चिघळते.
११.  सतत भूक लागणे.
१२.  अंथरुणात लघवी होणे.

मधुमेह होण्याची कारणे
डायबेटीस- टाईप १ या मधुमेहाचे ठोस असे कारण सांगता येत नाही. परन्तु काही निष्कर्ष्णावरून त्याची वेगवेगळी कारणे आहेत.
१.      अनुवांशिक :
२.      वातावरणातील बदल
३.      कौटुंबिक स्थिती
४.      वय : हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. परंतु  ४ ते ७ वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक असते. किंबहुना १०  ते १४ वयोगटात हि याचे प्रमाण दिसून येते. लहान मुलामध्ये दिवसे-दिवस वाढत चालले असून जंक फूड हे त्यातील महत्वाचे कारण आहे. पालकांनी स्थूल मुलांच्या बाबतीत काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. भारतात २ करोड पेक्षा जास्त मधुमेही असून त्यामध्ये ७ टक्के प्रमाण ७ ते १४ वयोगटातील मुलांचे आहे. व्यायामाचा अभाव, भोजनामध्ये भाज्या न खाणे. हे मुख कारण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडे वारी नुसार १९८० साली मधुमेहींची संख्या १०८ कोटी होती. २०१४ च्या आकडेवारीनुसार ४२२ कोटी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. १८ वर्ष्याच्या पुढील लोकांची संख्या ८.५ टक्के  आहे.
मध्यम वर्ग व कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये या आजाराचे प्रमाण जास्त अद्ध्ळून येते.
मधुमेहामुळे अंधत्व, किडनी संबधी आजार, हृदयविकाराचा झटका, पायाला गाठी उठणे. इत्यादी दुष्परिणाम उद्भवतात.
२०१६ च्या आकडेवारीनुसार १.६ कोटी लोकाचा मृत्यू केवळ मधुमेहाने झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ५० टक्केपेक्षा जास्त मृत्यू रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे झाले आहेत.
डायबेटीस type -२ हा सामान्यपणे वयस्क व्यक्तीला होणारा आजार आहे. यालाच इन्सुलिन नोन-डिपेंदन्ट  किंवा Adult diabetes असे संबोधले जाते.  या प्रकारात इन्सुलिन अत्यल्प प्रमाणात तयार होते व रक्तात वाढणारे साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यामध्ये इन्सुलिन परिणामकारक होत नसल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वरचेवर वाढत जाते.
 type – १ व type -२ दोन्ही प्रकारात लक्षणे सारखीच असतात. परंतु type -२ मध्ये लक्षणे दिसण्यास उशीर लागतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

type -२ डायबेटीस होण्याची करणे पुढील प्रमाणे आहेत.
, अनुवांशिक
२.  शरीराचे प्रमाणापेक्षा वाढलेले वजन
३. पोषक आहाराचा अभाव.
४. व्यायम व कमी हालचाल.
५. वाढते वय.
६. अति रक्तदाब.
७. गर्भवती असताना कुपोषण.
८. कौटुंबिक स्थिती

मधुमेह या आजाराकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १४ नोव्हेबर हा दिवस ‘’जागतिक मधुमेह दिवस’’ म्हणून साजरा केला जातो.  

इंटरनेशनल डायबेटीस फेडरेशन च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर प्रमुख ५ देशांतील आकडेवार खालील प्रमाणे.
१.      चीन               -     १०९ कोटी
२.      भारत              -     ६९ कोटी
३.      अमेरिका            -     २९ कोटी
४.      ब्राझील                   -     १४ कोटी
५.      रशियन फेडरेशन      -     १२ कोटी    
लोकसंखेच्या तुलनेत डायबेटीस पेशंटची घनता जास्त असलेली शहरे  
१.       तोकेलावू     -     २९.७ %
२.      मोरीशस            -     २४.३ %
३.      नौरू         -     २३.८ %
४.      कोक आयलंड -     २१.१ %
५.      मार्शल आयलंड -     २१.१ %
जागतिक आरोग्य संघटनेच्या भाकितानुसार भारतात २०३० पर्यंत type – २ डायबेटीस लोकांची संख्या ९८ कोटी पर्यंत पोहचेल तर चीनची संख्या १३० कोटी पर्यंत पोहचली असेल.. २०१० मध्ये भारतात ५७ कोटी लोक त्रस्त होते. 

Dr. Vidhin Kamble 

10.03.2019

गुणकारी मेथी

                 गुणकारी मेथी 


मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
गुणधर्म --- 
पौष्टिक,  भरपूर  कँल्शियम,  स्वादिष्ट,  वायुनाशक,  कफनाशक,  रक्तशुद्धिकारक,  ज्वरनाशक,  कडवट  चव,  मलनिस्सारक.
***
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.

1.एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.

2. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.

3. मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.

4. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.

5. मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.

6. अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.

7. उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.

8. मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.

9. मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.
***

10.  मधुमेह  असणाऱ्यांनी  मेथी  दाणे  चघळून  खाल्यास  चांगला  लाभ  होतो.  किंवा रात्री  भिजत  ठेवून  सकाळी  पाण्यासह  खावे.  शरीरातील  वायूपण  दूर  होतो.
 (प्रमाण १ / २ चमचे)

11. पोटाच्या  काही  तक्रारी  असल्यास  किंवा  ताप  असल्यास  मेथी  दाण्यांचा  काढा  आवश्य  प्या.  लवकरच  गुण  येतो.

12. अशक्तपणात  मेथीची  भाजी  खाल्ल्याने  शक्ती  वाढते.

13. वात  विकार  उदा.  सांधेदुखी,  कंबरदुखी,  टाचदुखी,  गुडघेदुखी,  खांदेदुखी  यावर  एक  लहान  चमचा  मेथी  पूड  +  एक  कप  दूध  मिक्स  करून  रात्री  झोपतांना  घ्या.  किंवा 
मेथी  दाणे  पाण्यासोबत  गिळा. (प्रमाण १ चमचा)

14. पोट  साफ  लवकर  होण्यासाठी  मेथीची  भाजी  आवश्य  खा.  भरपूर  फायबर  ( तंतू )  आहेत.  किंवा 
लहान अर्धा  चमचा  मेथी  दाणे  रात्री  पाण्यासोबत  गिळा.

15. मेथी  स्त्रियांसाठी  फार  उपयुक्त  आहे. मासिकपाळीच्या  सर्व  तक्रारी  दूर  होतात. आवश्य  मेथीचा  वापर  करा.

16. पचनसंस्थेच्या  तक्रारी  दूर  होतात.

17. मेथीचा  पाला  वाटून  केसांना  लावल्यास  डोक्यातील  कोंडा  जातो.  केसांची  चांगली  वाढ  होते.  मुलायम  राहतात.

18. आहारात  मेथीचा  वापर  केल्याने  रक्त  लवकर  शुद्ध  होते.तसेच  शरीरपण  आतून  लवकर  स्वच्छ  होते.

19. मेथीचा  पाला  रस  +  गाजर  रस  +  काकडी  रस  +  मध  मिक्स  करून  सकाळी  रिकामे  पोटी  रोज  घेतल्यास  लिव्हरला  आलेली  सूज ,  काविळ,  डोकेदुखी,  दमा,  T B  व  अनिद्रा  इत्यादी  आजारात  खूप  फायदा  होतो. (प्रमाण १  ग्लास)

20. आठवड्यातून  २ / ३  वेळा  तरी  मेथीभाजी  खावी.

19.  मेथी  दाणे  पोटात  गेल्यावर  चांगले  फुगतात.  त्यामुळे  पोट  लवकर  साफ  होते.