4.29.2021

मेंढरामागचं 'पोर निघालं लै थोर ! अमोल पांढरे

 


मेंढरामागचं 'पोर निघालं लै थोर !

अमोल पांढरे


एक प्रेरनादाई लेख 



         लोटेवाडीचा मेंढपाळपुत्रआबा लवटे UPSC मार्फत घेण्यात येणा-या IES परिक्षेत देशात २१ वा आला आहे. विशेष म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत मेंढरामागं फिरणा-या आबा लवटे याने देशपातळीवरील या परिक्षेत थेट २१ वी रॅंक मिळवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या घवघवीत यशामुळे सर्वच स्तरावरुन आबा लवटेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर जिद्दचिकाटीमेहनत आणि संघर्षाच्या जोरावर मात करत आबासाहेबाने आकाशाला गवसणी घालणारे हे यश मिळविले आहे. शेळ्या – मेंढ्या राखण्यापासून ते ऊसतोडी करण्यापर्यंत अनेक अंगमेहनतीची आणि कष्टाची कामं करत आबाने हे यशोशिखर गाठले आहे. त्यामुळे आबाचा हा प्रवास आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.

     असं म्हणतातकी ज्या समाजाच्या डोळ्यासमोर कोणतेही 'आदर्शनसताततो समाज कदापी 'आदर्शबनू शकत नाही. त्यामुळे आदर्श समाजनिर्मितीसाठी समाजासमोर चांगले आदर्श असले पाहिजेत. त्या अनुषंगानेच आबा लवटे यांचा हा चित्तथरारक असा संघर्ष एक आदर्श म्हणून पाहूयात...त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा हा एक विशेष वृत्तांत...

    आटपाडी आणि सांगोला तालुक्याच्या सीमेवर लोटेवाडी नावाचे गावं वसले आहे. लोटेवाडी हे सांगोला तालुक्यात आहे. मात्र गावापासून आटपाडी जवळ असल्यामुळे अनेक दैनंदिनं व्यव्हार आटपाडीतूनच चालतात. अशा लोटेवाडी या गावात सुबराव ईश्वरा लवटे यांच्यापोटी आबा लवटे यांचा जन्मं झाला. आईचे नाव हौसाबाई आई घरकाम करते आणि इतर वेळात शेतामळ्यातली कामं तिच्या नशीबी असतात. लहानपणी आबाच्या नशीबी सतत भटकंती होती. कारण वडील मेंढरं राखायचे आईसुद्दा मेंढरामागं असायची त्यामुळे आपसूकच आबालाही आपल्या लहानं भावंडांसह मेंढरामागं रहावं लागायच. आबाला एक बहीण आणि एक भाऊ आहे. ही सर्व भावंड परिस्थितीशी दोन हात करत शिक्षणासाठी धडपडत होती. त्यातच आबाला लहानपणी शिक्षणात जास्त रस नव्हता. इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंत आबाला शिक्षण घेण्याबरोबरच पारंपारिक व्यवसाय म्हणून मेंढरंही राखावी लागत. त्यामुळे आबाचा शिक्षणाकडे ओढा कमीच होता. आबाचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी पर्यंत लोटेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. आई – वडील ऊसतोडीही करायचे. त्यामुळे आबाला ६ महिने आई - वडिलांसोबत ऊसतोडी करण्यासाठी जावे लागायचे आणि राहिलेल्या काळात जमेल तशी शाळा शिकायची. असा त्याच्या प्राथमिक शाळेचा प्रवास होता. त्यानंतर ५ वी ते १० वीन्यू इंगलिश स्कुल लोटेवाडी या शाळेत आबाचे शिक्षण झाले. दरम्यानं परिस्थितीअभावी आबाच्या भावाला ८ वीतून शिक्षणं सोडावं लागलं. तर इयत्ता १० वीतून बहिणीचं शिक्षणं बंद झालं. मात्र आबा सर्वात धाकटा असल्याने त्याचे शिक्षण पुढे सुरु राहिले.  

   आबाचे आई – वडील ऊसतोड कामगार म्हणूनही कामं करत होते. वडील मुकादमं होते. मात्र आठवीत असतानावडील सुबराव लवटे यांच्या ऊसतोड टोळीतील ऊसतोडणी कामगार उचलं घेवूनही कामावर आले नाहीत. त्यापैकी कांहीजण तोंड चुकवून फिरु लागले. त्यामुळे वडील कर्जबाजारी झाले आणि संपुर्ण घर अडचणीत आले. कर्ज वाढत गेले आणि शेवटी कर्जाला कंटाळून वडिलांनी घर सोडले. त्यामुळे वडीलांचे आई – वडील म्हणजे आज्जी आणि आजोबा यांनीच या सर्वांचा सांभाळ केला. ईयत्ता ८ वीत असताना हा प्रसंग घडला. त्यामुळे आबाच्या आयुष्याला एकप्रकारे कलाटणी मिळाली आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कुटुंबाची उन्नती आणि प्रगती करायची असेल तर शिक्षणच घ्यावे लागेल. हे मनाला पटले मात्र ९ वी पर्यंत शाळेतल्या शिक्षकांची आबासाहेबांना जामं भिती वाटत होती. त्यामुळे आबा शाळेला अनेक दांड्या मारायचा. ईयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असताना वर्ग शिक्षकांनी आबाला लाख मोलाचे मार्गदर्शनं केले. शिक्षणाचे महत्व सांगत त्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे आबाच्या मनातील सर्व किंतू दूर झाले आणि आबाने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. परिणामी १० वी च्या परिक्षेत आबाला तब्बल ७३.५३ टक्के गुण मिळाले. त्यानंतर मात्र आबाने पुन्हा कधीही मागे वळूनं पाहिले नाही. एकामागून एक यशाचे अनेक टप्पे त्याने पार केले.

     ११ वीला आबाने आटपाडी येथेआबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र गरीबी पाठ सोडायला तयार नव्हती. परिस्थिती आबासाहेबाच्या अनेक परिक्षा घेण्यासाठी संधी शोधत होती. त्यातच आबाला महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज लोटेवाडी ते आटपाडी असा १२ कि. मी. चा प्रवास सायकलवरुन करावा लागत असे. त्यामुळे १२ कि. मी. सायकलवरुन जाणे आणि १२ कि. मी. येणे म्हणजे दररोज २४ कि. मी. चा सायकल प्रवास त्याला करावा लागत होता. पण जेवढे मोठे धेय्य तितका मोठा संघर्ष हे सूत्र आबाला माहित असल्याने त्याने न डगमगता आपला प्रवास सुरुच ठेवला. परिस्थिती किती बिकट होती... त्यासाठी आबासाहेबांना किती संघर्ष करावा लागलायाचे एक -हदयद्रावक उदाहरण म्हणजेआबा ११ वीच्या वर्गात शिकत असतानाएकदा फार मोठा पाऊस पडला होता. लोटेवाडीहून आटपाडीला जाताना वाटेत माणगंगा नदी आडवी लागते. विशेष म्हणजे या नदीला फक्त पावसाळ्यातच पाणी येते. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. आणि पाण्यामुळे नदीवरचा पुल कट झाला होता. पाणी पुलावरुन वाहत होते. मात्र आबाला पूल कट झाल्याचे लक्षात आले नाही. नेहमीप्रमाणे तो सायकलवरुन शाळेला निघाला आणि पूल ओलांडत पुढे जात असतानाच तो सायकलसहित नदीमध्ये पडला. त्यामुळे पाठीवर असलेली शाळेची बॅग पुर्णपणे भिजलीपुस्तकं भिजलीमात्र पुस्तकं आणि बॅग सावरायच्या नादात आबासाहेबाच्या हातून सायकलचे हँडल निसटले आणि सायकल पाण्याबरोबर डोळ्यासमोर वाहून गेली. रडत – खडत आबा पोहतच काठावर आला. अंगाला पाण्यातील काटे ओरबडले होते. मनाला वेदना होत होत्या. कारणंत्याची स्वतःची सायकल आदल्याच दिवशी चोरीला गेली होती. म्हणून शाळेला जाण्यासाठी आबाने शेजा-याची सायकल मागून घेतली होती आणि ती सायकलपण अशा पद्दतीने नदीत वाहून गेली. त्यामुळे काय करावे ते सूचत नव्हते. परंतूअशा संकटाने खचून जाईल तो आबासाहेब कसला त्याने पुन्हा लढायचं ठरवलं. त्यासाठी बहीणीने आणि भावाने हजारो हत्तींच बळं दिलंत्यांनी आबाला नवी सायकल घेवून दिली. त्यामुळे आबासाहेब नव्या जोमाने अभ्यासाला लागला.

    ११ वी सायन्सला गणित विषयात आबा नापास झाला. त्यावेळी ट्युशनची गरज होती. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे त्याने घरीच अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याची ही सवयच त्याला आज इथपर्यंत घेवून आली आहे. स्वतः अभ्यास करण्याची सवय लागल्यानेट्युशनशिवाय अभ्यास करत १२ वी सायन्सला आबाला ७१ टक्के मार्क्स मिळाले. या मार्कांच्या जोरावर आबानेबॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ( बी.ई ) साठीआण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगआष्टा येथे प्रवेश घेतला. आणि अभ्यासात स्वतःला झोकून दिले. विशेष म्हणजे आबाने या ठिकाणीही आपल्या विलक्षण बुद्दीमत्तेची चमक दाखवतइंजिनिअरिंगच्या या चारही वर्षात वर्गात सर्वप्रथमं येण्याची किमया केली. शेवटच्या वर्षी गेट परिक्षेचा अभ्यास सुरु केला. मात्र पहिलाच प्रयत्नं असल्याने तो केवळ पास झालाचांगले मार्क्स मिळाले नाहीत. त्यानंतर आबाला स्पर्धा परिक्षांची गोडी वाटू लागली. या परिक्षांची त्याने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये इंजिनिअरिंगमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजेइंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसअर्थातच  IES असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळेअभियांत्रिकी विभागाशी संबंधित अनेक खात्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. म्हणून आबाने IES होण्याचा चंग बांधला.

     २०१६ ला IES चा पहिला अटेंप्ट दिला. मात्र रिझल्ट फेल म्हणून आला. त्यानंतर २०१७ ला परीक्षेचा पॅटर्न बदलला म्हणूनआबाने २०१७ – २०१८ ला पोस्ट ग्रँज्युएशनं केले आणि आबा M.Tech. झाला. दरम्यानं गेट [GATE- Graduate Aptitude Test in Engineering] परिक्षा देणे सुरुच होते. परंतू खुप जादा इम्प्रुव्हमेंट होत नव्हती. २०१९ मध्ये आबाने पुन्हा एकदा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विविध खात्याच्या परिक्षाही दिल्या. मात्र त्यामध्ये यश आणि अपयश असा सामना रंगला होता. महाडिस्कॉमची परिक्षा - फेलमहाट्रान्सको - पासमहाजनको - फेलएसएससीजेई - फेलआरआरबीजेई – पासएमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एका मार्कात गेले. कारण जागा एकच होती. तर दुसरीकडे गेटची परिक्षा २०१५१६१७१८१९२०२१ ला सलग ७ वेळा उत्तीर्ण होण्याचा बहुमानं आबाने मिळविला. इतकेच काय तर युजिसीची नेट परिक्षाही तो पास झाला. तर दुसरीकडे २०१९ ला इस्त्रोच्या परिक्षेत त्याला अपयश मिळाले. २०१९ ला बीएआरसीच्या परिक्षेतही त्याला अपयशच लाभले. मात्र आबाने आपली लढाई सुरुच ठेवली.

     २०१९ ला IES ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुप अभ्यास केला. परंतूदुर्देवाने आबा पुर्व परिक्षा फेल झाला. त्याचा माणसिक त्रासही झाला. दरम्यानं अविनाश सोनुरे हा सच्चा मित्र आबाला भेटला आणि या मित्राने आबाला जिंदगीचे रहस्य उलगडून सांगितले. तो म्हणाला कीआबा... आपल्याकडे गमवायला कांहीच नाही. मात्र कमवायला खूप कांही आहे. त्यासाठी आपला लढा कष्टाशी असला पाहिजे. त्यामुळे लढा सुरु ठेव…..! कारणंहे दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. मित्राचा हा लाख मोलाचा सल्ला ऐकूनआबाने आपला लढा नेटाने सुरु ठेवला. अभ्यासावर संपुर्ण लक्ष केंद्रीत केले परिणामी २०१९ ला गेट परिक्षेत ८१.३३  मार्क्स मिळाले. त्यानंतर एन.पी.सी.आय.एल. कंपनीमध्ये इंटरव्यू दिला. मात्र याठिकाणीही अपयशाला सामोरे जावे लागले.

     २०१९ ला IES च्या पुर्व परिक्षेचा आबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला. त्यामुळे २०२० ची IES ची पुर्व परिक्षा ते पास झाले. परंतूमुख्य परीक्षेची तारिख जवळ येत असतानाच लॉक डाऊन सुरु झाले. त्यामुळे हा विषय रखडला. त्यामुळे २०२० मध्ये घरीच राहून पुढील परिक्षेचा अभ्यास सुरु केला. दरम्यानं डिसेंबर २०२० मध्ये बीएआरसीचा [ भाभा अणुसंशोधन केंद्र] इंटरव्यू झाला आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून Electrical Engineering मधून आबा लवटे याचीच एकट्याची निवड झाली. ५ जानेवारीला निकाल लागला आणि १७ जानेवारी २०२१ ला जॉयनिंग झाले. त्यामुळे यश आता पाठीमागे लागले होते.

     मार्च २०२१ मध्ये रखडलेला IES परिक्षेसाठीचा इंटरव्यू होता. हा इंटरव्यू दिल्लीत होता. त्यामुळे आबासाहेबांना दिल्लीला जावे लागणार होते. यानिमित्ताने आबासाहेबांचा दिल्लीला पहिल्यांदा प्रवास झाला. इंटरव्यू एकदम व्यवस्थित पार पडला आणि १२ एप्रिल २०२१ ला IES चा रिझल्ट लागला. यादीत आबासाहेबांचे नाव झळकत होते. त्यांची ऑल इंडिया रॅंक २१ होती. लहानपणी मेंढर राखताना जे स्वप्नं बघितलं होत. आई – वडिलांचे नाव करायचेगावाचे नावं करायचेस्वतःचे कर्तुत्व जगासमोर सिद्द करायचे ते स्वप्नं या यादीत नावं आल्यामुळे ख-या अर्थाने साकार झाले होते. मेंढरामागची पोरं लई हुशार’ या म्हणीची आबासाहेबाने जगाला पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली होती. आकाशाला गवसणी घालणा-या आबासाहेबांच्या या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. आज त्यांच्या या यशाचे पोवाडे गायले जात आहेत. म्हणूनअमोल पांढरे आणि मित्र परिवाराकडूनही आबासाहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना खुप सा-या शुभेच्छा.

       आबासाहेबांना त्यांच्या या प्रवासात त्यांचे १० वीचे वर्गशिक्षक मा. श्री. ढेरे सर यांचे तसेच त्यांचे इतर सर्व शिक्षकमित्रमंडळीग्रामस्थ यांचेही मार्गदर्शनं आणि सहकार्य लाभले. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट (आदमापुर )ने त्यांना विशेष आधार दिला. त्यामुळे ते या सर्वांचे आज आभार मानतं आहेत. आपले आई – वडिल आणि घरच्या मंडळींचा त्यांना दांडगा अभिमान वाटतोय. आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद आठवण सांगतानाआबासाहेब सांगतात कीकर्जबाजारी होवून घर सोडुन गेलेले माझे वडील २०१४ साली घरी परत आले. आल्यानंतर त्यांनी लोकांचे कर्ज परत केले व आयुष्यभर संत बाळूमामांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग आयुष्यातील सर्वात सुखद प्रसंग आहे. आबासाहेब सध्या मुंबईत बी. ए. आर. सी या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत.

 

   गरीबीची जाणं असल्याने आबासाहेबांना यापुढील आयुष्यात आपल्या परिने इतरांना मदत आणि मार्गदर्शनं करायचे आहे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनाही सहकार्य करायचे आहे. तसेच ज्यांच्यामुळे इथपर्यंत आलो त्यांना मदत आणि सहकार्य करणेहेच आपले ब्रीदवाक्य असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यामुळे समाजऋणांची परतफेड करण्याची भावना असलेल्या आबासाहेबांचा हा प्रवास थक्क करणारा आणि सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे. तेंव्हा अशा या मनमिळावूकर्तबगार आणि होतकरु अधिका-याच्या हातून आखंड माणवजातीची सेवा घडो... त्यांच्यासारखे अनेक आबासाहेब समाजात जन्माला येवोत. अशी सदिच्छा व्यक्त करुनआपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करुया...!

सौजन्य -आपुलकी कार्यकारिणी - Whatsapp Group

4.19.2021

कोविड पेशंट कसा सिरियस होतो?*

 *कोविड पेशंट कसा सिरियस होतो?*

*पहिला दिवस*- मला ताप आला, सर्दी झाली, अंग दुखतेय काही खास नाही. घरच्या घरी पॅरासिटॅमॅाल किंवा सर्दीची औषधी घेतली जरा बर वाटते

*दुसरा दिवस*- थोडा खोकला आहे एवढे काही नाही असा विचार परत घरच्याघरी औषधोपचार. मला बर वाटतेय

*तिसरा,चौथा,पाचवा व सहावा दिवस* - ताप आहे, खोकला आहे अंग ही दुखत आहे. गावातील डॅाक्टरकडे ईलाजासाठी गेले. गावातील डॅाक्टरने सलाईन लावले. तीन दिवस उपचार केले. पण खुपच थकवा येतोय, धाप लागतेय  दोन दिवस अजुन ॲाथोराईज्ड कोविड सेन्टरकडे जाणेसाठी वेळ घेतला. आता ॲाक्सिजन ची गरज पडायला लागली पळापळ सुरु केली. बेड मिळेना शेवटी कुठल्यातरी ॲाथोराईज सेन्टरला बेड मिळाला.

*नववा दिवस*-सीटी स्कॅन केला, बल्ड टेस्ट केल्या सीटी स्कोर २५ पैकी १२ च्या वर आला. रक्तातील काही घटक कमी जास्त झाले. महागडी औषधे विकत घ्यावी लागले. व्हेटिलेटर चा खर्च वाढतो

येथुन सुरु होतो धोकादायक प्रवास. ८ ते ९ दिवसानंतर आपण स्वत:हुन आपल्या शरिराची पुर्ण वाट लावलेली असते. या परिस्थितीत ॲाक्सिजन लेव्हल घटतच राहीली की पेशंट सिरियस होतो. डॅाक्टरच्या हातातही आता जास्त काही राहत नाही.पेशंटचा खर्चही खुप झालेला असतो व तरीही जीवाची काही गॅरंन्टी नसते. वाचलात तरी तुमचे फेफडे बऱ्याच अंशी कायमचे निकामी झालेले असतात.

म्हणुन पहिल्या दिवशीच लक्षणे दिसल्यास ताबडतोब *RTPCR टेस्ट करावी.* व पॅाझीटीव आल्यास नजीकच्या *CCC,DCH मधे ( कोविड सेंटर मध्ये ) ॲडमीट व्हावे.* म्हणजे पेशंट सहजगत्या ८ ते १० दिवसात बरा होवुन आनंदाने घरी जावु शकतो.

आता निर्णय तुमचा आहे की आपणास आनंदाने घरी जायचे आहे की हास्पिटलमधेच दगावयाचे आहे,

4.16.2021

क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचे चारित्र - Mahatma Jotirao Phule

क्रांतिसुर्य महात्मा  जोतिबा फुले




जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण , सातारा, महाराष्ट्र

मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे , महाराष्ट्र

वडील: गोविंदराव फुले

आई: चिमणाबाई गोविंदराव फुले

पत्नी नाव: सावित्रीबाई फुले

अपत्ये: यशवंत

बालपण आणि शिक्षण - जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण (खटाव-माण) हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.  प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ  त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय  होते. 

'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥'  

हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने  गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. 

मराठीत मंगलाष्टके रचली.

समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती  गेली। मतीविना  नीती   गेली।

 नीतीविना गती गेली।  गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ  एका अविद्येने केले।। ”

जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. 

त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक  दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन ' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.  तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या  धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 

सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.सन्माननीय उपाधी जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. नाव साहित्यप्रकार लेखनकाळ इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५ गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३ तृतीय रत्न नाटक इ.स. १८५५  ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९ राजे छत्रपती शिवाजी  राजे भोसले यांचा पोवाडा पोवाडा इ.स. १८६९ शेतकर्यांचा असूड लेखसंग्रह सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह इ.स.१८८९ 

 इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत

देण्याची मागणी केली.  इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार. इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास, त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर  प्रवास.   परि स्त्री शिक्षण; हा एकची असे  ध्यास, हा एकची असे ध्यास, या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव  फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक  म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्धज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.

जीवनपट 

इ.स. १८२७ - जन्म कटगुण , सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या ' राईट ऑफ मॅन ' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. 

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची

स्थापना. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, 

इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. 

इ.स. १८५३ - ' दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स ' स्थापन केली. 

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली. 

इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला. इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले. इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली . इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. 

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली. 

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर ). 

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. 

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. 

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. 

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

Dr. Babasaheb Ambedkar- The Legend in Education

 Dr. Bhimrao Ramji Ambedkar  (1891-1956)



  1. B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
  2. D.Litt., Barrister-at-La w.
  3. B.A.(Bombay University)
  4. Bachelor of Arts,
  5. MA.(Columbia university) Master Of Arts,
  6. M.Sc.( London School of Economics) Master Of Science,
  7. Ph.D. (Columbia University)
  8. Doctor of philosophy,
  9. D.Sc.( London School of Economics) 
  10. Doctor of Science
  11. L.L.D.(Columbia University)
  12. Doctor of Laws,
  13. D.Litt.( Osmania University)  Doctor of Literature,
  14. Barrister-at-La  (Gray's Inn, London) law
  15. qualification for a lawyer in  royal court of England.
  16. Elementary Education, 1902  Satara, Maharashtra
  17. Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian etc.,
  18. Inter 1909,Elphinston College,Bombay
  19. Persian and English  B.A, 1912 Jan, Elphinstone  College, Bombay,
  20. University of Bombay, 
  21. Economics & Political Science
  22. M.A 2-6-1915 Faculty of Political  Science,
  23. Columbia University, New York, Main-Economics
  24. Ancillaries-Sociology, Histor
  25. Philosophy,
  26. Anthropology, Politics
  27. Ph.D 1917 Faculty of Political Science,
  28. Columbia University, New York,
  29. 'The National Divident of India - A Historical and Analytical Study'
  30. M.Sc 1921 June London School of Economics, London 'Provincial Decentralization of Imperial Finance in British India'
  31. Barrister-at- Law 30-9-1920
  32. Gray's Inn,
  33. London Law
  34. D.Sc 1923 Nov London School, 
  35. of
  36. Economics, London 'The
  37. The problem of the Rupee - Its origin and it's, solution' was
  38. accepted for the degree of D.Sc. (Economics).
  39. L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia
  40. University, New York For HIS achievements,
  41. Leadership and authoring the constitution of India
  42. D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, Hyderabad For HIS achievements,
  43. Leadership and writing the constitution of India

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञांना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली.

शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते. इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!

यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे. त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !

हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले. जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही  कित्येक लोकांना ही वस्तुस्थिती,इतिहास माहिती नाही ही शोकांतिका आहे.


!! भारतीय असाल तर हे पण माहित असलेच पाहिजे !!!