6.28.2021

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज




  • जन्म - २६ जून १८७४ (कागल)
  • मृत्यू - ६ मे १९२२ (मुंबई)

शाहू भोसले हे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर संस्थानाचे १८९४-१९२२ दरम्यान छत्रपती व मराठी समाज सुधारक होते.

 ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

 शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, 'शाहू' हे नाव ठेवले.

 १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

 शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

 १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ ला निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाता खाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले.

 दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

 त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.

 महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या, अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण 

 अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले.

 शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली.

 जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठाधनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

 तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

 वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

 कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.

 बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला, यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

 

सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले. शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते.

 डॉ. बाबासाहेबांनी मूकनायकहे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

 त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

 शैक्षणिक कार्य :

महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे :

  • * व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
  • * दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
  • * वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
  • * मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
  • * मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
  • * दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
  • * श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
  • * पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
  • * श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
  • * इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
  • * कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
  • * आर्यसमाज गुरूकुल (१९१८)

 इतर कार्ये :

शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिलची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटस्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.

 कलेला आश्रय :

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

 सन्मान :

शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवसम्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.

शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.

 संकलन : मिलिंद पंडित , कल्याण

 संदर्भ : इंटरनेट

6.22.2021

(फादर्स डे)

 

                                             बाप दिवस (फादर्स डे)




बापावर प्रेम करणारी सुज्ञ पोरं लाभणे ही त्याची फार मोठी उपलब्ध मानली जाते. संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते. ज्यांना चांगले अपत्य लाभतात, खरंच ती माणसं भाग्यवान. कारण अनेकांना मुलांचं प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही. मुलांच्या प्रेमासाठी तरसणा-या बापाच्या हृदयाच्या ठिक-या होतात, हे किती जणांच्या लक्षात येत असेल. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करु शकत नाही. यावर मुलांचं प्रेम हेच एकमेव औषध रामबाण औषधी ठरते. मुलाची अधोगती पाहून' माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही, लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो, हे समजायला बापच व्हावे लागते.

आईच्या तुलनेत बापाला फारच कमी महत्व दिले गेले आहे. आई जितकी महत्त्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो. परंतु साहित्यिकांनी, लोकवाड्मय निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली. बापाकडे दुर्लक्ष झाले. आई प्रेम व्यक्त करते. आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते. खरं तर आई म्हणजे व्यक्त प्रेम आणि बाप म्हणजे काही राग नसतो. बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते, याची जाणीव मुलांना करुन देणे गरजेचे आहे.

आई सतत कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते. संस्कार करण्यासाठी तिची धडपड असते. मग ती बापाची भीती दाखवून मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. 'हे करु नकोस बाबा मारतात' 'ते करु नको बाबा ओरडतात.' हे ऐकून ऐकून मुलांच्या मनात बापाविषयी भीती निर्माण होते. भीती आहे तिथे प्रेम कसे विकसित होईल? सतत नकारात्मक ऐकायला मिळालेल्या मुलांना बाप म्हणजे खलनायक वाटायला लागतो. त्यांच्या मनात प्रेमाऐवजी रागच निर्माण होतो.

मग अनेक मुलं बापाला प्रेम न देता टाळत राहतात. हे बापाच्या लक्षात येते तरी बाप मुलांसाठी खस्ता खाणं थांबवत नाही. पैशाअभावी लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून उन्हातान्हात तो राबतो. घाम गाळत असतो. लेकराचं शिक्षण थांबता कामा नये म्हणून आईही बापाला तगादा लावते, भांडते. वेळप्रसंगी अश्रू ढाळते. मुलं हे सर्व पाहतात. लेकरांना वाटते आई आपल्यासाठी किती तळमळते. अश्रू ढाळते.

बापाच्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत. बापाला माहित असते की रडून प्रश्न मिटत नाहीत. जीवनाची लढाई लढत पुढे जावे लागते. बाप रडत नाही, तो विचारमग्न राहतो. चिंताग्रस्त होतो. लेकरांच्या शिक्षणासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करायची? कुणासमोर हात पसरुन उसने पैसे मागायचे? कुणाकडून कर्ज घ्यायचे? या विचारात मग्न असलेला बाप काही काळ मुका होतो. आईला मुलं विचारतात आई, बाबा असे गप्प का? पैशाचं काय म्हणतोय? कधी कधी आई रागाच्या भरात सांगून टाकते, ते असंच करतात. पैसा द्यायचं म्हटले की, त्यांचं रडगाणे सुरुच होते. पोरांचा गैरसमज होतो की बाप मुद्दाम असे करतो. मनात आधीच भीती, राग. आता हे ऐकून एक वेगळीच अढी मुलांच्या मनात तयार होते. बाप मात्र तळमळ करुन पैशाची जोड लावून आणतो तेव्हा आई म्हणते," किती तोंड वाजवावे लागले तेव्हा कुठे पैसे आणले."

पोरांनाही वाटते आईनं रडबोंब केल्यामुळेच आपल्या शिक्षणाला पैसे मिळाले. नाहीतर काही खरं नव्हतं.

खरं तर इतकी धडपड करुन पैसे आणण्यामागे पोरांच्या बापाचं पोरांविषयी प्रेम आहे हे त्या आईला माहीत असते पण ती तसं फारसं बोलत नाही. मुलं तर लहानच असतात, त्यांना बापाच्या मुक राहून केलेल्या कृतीमागचं प्रेम कळत नाही. ह्यात बदल होणे गरजेचे आहे.

आईची जबाबदारी आहे बापाचे कष्ट आपल्या पोरांच्या लक्षात आणून देणे. बापाच्या विषयी नकारात्मक बोलू नये. वादही मुलांसमोर घालू नयेत. यासाठी बापानेही काळजी घेतली पाहिजे. बापाचे महत्त्व पोरांना पटवून दिले तर नक्कीच पटते त्यांना.

बापाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी आईची भूमिका महत्त्वाची आहे. या संदर्भात आयांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

मुलांच्या तुलनेत अनेक मुली बापाला समजून घेतात. प्रेम देतात. सेवा करतात. आई भांडत जाऊ नकोस ग बाबांशी ! अगं बाबांच्या कष्टामुळेच आपलं घर चालते याची जाणीव करुन देतात. तेव्हा बापाच्या जखमा भरुन निघतात, बापाचं मन भरुन येते.

 *आपल्याला समजून घेणारी मुलगी सासरी जाताना बाप अश्रू आवरु शकत नाही. तो ढसाढसा रडायला लागतो. मुलींप्रमाणे मुलांनी पण आई समजून घेताना बापही समजून घेण्याची गरज आहे.

 फादर्स डेच्या निमित्ताने एवढा संकल्प करणे ही बापासाठी मोठी गिफ्ट ठरेल.

लेकरांसाठी तळमळणा-या बापाने आपल्यासाठी काय केलंय असे वाटत असेल तर आपण राहतो ते घर, अंगावरचे कपडे, पोटातील अन्न, आतापर्यंत केलेला सांभाळ यासाठी बापाचे कष्ट आठवून बघितले पाहिजे. ज्यांचा बाप जीवंत आहे त्या भाग्यवान मुलांनी बापाला एकदा म्हणून पहा, "बाबा आमच्यासाठी किती कष्ट घेतो. आम्हाला भारी किमतीचे कपडे, चप्पल, बूट तुम्ही मात्र हे सर्व कमी किमतीचे वापरता. खरंच बाबा तुम्ही ग्रेट आहात'!  किती फुलेल बाप मग. उन्हात तळायला हत्तीचे बळ येईल. पोरांनो, आपण मोठे झालो की आपला बाप पण खूप मोठा होतो.

एकदा कलेक्टर असलेल्या आपल्या पोराला भेटायला शेतकरी बाप जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तेव्हा अहो, ताडताड कुठे जाताय. स्वतः ला कलेक्टर समजताय का? असे तेथील एक कर्मचारी म्हणतो. तेव्हा हा बाप अभिमानाने सांगतो "मी कलेक्टर नाही, मी कलेक्टरचा बाप आहे.

     आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणावरुन प्रगती साधत पुढे जाणे ही बाब बापासाठी सर्वांत मोठी भेट ठरेल, असा संकल्प करणे, बापाला समजून घेणे, प्रेम देणे, सन्मान देणे असे घडले तर फादर्स डे अर्थपूर्ण ठरेल

 

Source Sangola Teacher Whatsapp group

6.10.2021

निळावंती- कोण होती निळावंती? काय आहे तिची कहाणी

 निळावंती एक गूढ ग्रंथ !

I liked this article very much so taken as it is for readers... (Dr. Vidhin Kamble)



निळावंती हा एक गूढ असा संस्कृत ग्रंथ आहे. निळावंती ग्रंथमागची कथा खूपच  रंजक आहे.(Nilavanti book)  काही लोकांच्या मते ही एक दंतकथा आहे पण काही लोक म्हणतात की ही एक सत्यकथा आहे आणि निळावंती ही पूर्वीच्या काळी खरोखरच अस्तित्वात होती.  असे म्हटले जाते की या पुस्तकात सांगितलेली विद्या जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तो एक तर पूर्णपणे यशस्वी होतो नाहीतर पूर्णपणे वेडा होतो. या बाबतीत असेही  सांगितले गेले आहे की जर माणूस वेडा नाही झाला तरी  तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमाऊ शकतो म्हणून संसारी व्यक्तींना या ग्रंथमागे न लागण्याचा सल्ला दिला जातो.  निळावंती  मध्ये दिलेले मंत्र जर सिद्ध झाले तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य  राहत नाही पण ही विद्या मिळवणे खूपच कठीण काम आहे.  योगी गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या पुस्तकातील विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकते आणि यामध्ये दिलेल्या  सार्‍या विद्या तुम्ही शिकू शकता.  हे जगातलं एकमेव पुस्तक आहे की यात दिलेले मंत्र जर तुम्ही सिद्ध केले तर तुम्ही जगावर सुद्धा राज्य करू शकता. पण  जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झाला नाहीत  तर एक तर तुम्ही वेडे होऊ शकता किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा तुम्ही कायमस्वरूपी तंत्र मंत्राच्या मार्गावर जाऊ शकता.   चला जाणून घेऊया निळावंती विषयी.  निळावंती कोण होती?  तिला ही विद्या कशी मिळाली? आणि तिने हे पुस्तक कसे  लिहिले चला जाणून घेऊया या बद्दल. 

निळावंती च्या लहानपणाबद्दल थोडी माहिती 

 जाणकारांच्या मते निळावंती ही एका खूपच श्रीमंत माणसाची  मुलगी होती आणि तिच्या माहेरची परिस्थिती खूपच चांगली होती.  निळावंती चा जन्म होतो तेव्हा तिच्या वडिलांना खूप सारे गुप्तधन मिळते आणि ते त्या गावचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात.   निळावंती ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक कन्या.  तिला ना कुणी भाऊ होता ना कोणी बहीण.  त्यामुळे लहानपणापासूनच ती एकटी राहत असे.  आई वडील आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे तिच्याशी बोलायला, तिच्याबरोबर खेळायला कोणाला वेळच नव्हता.  त्यामुळे निळावंती लहानपणी  एकटी राहत असे त्यामुळे ती  निसर्गातील झाडे पशुपक्षी यांनाच आपला मित्र मानत असे.  तिचा पूर्ण दिवस निसर्गाच्या सान्निध्यात जात होता. 

मुंगीचा आवाज आणि प्राण्यांच्या भाषेचे ज्ञान 

 एक दिवस ती  आपल्या शेतामध्ये एका झाडाखाली बसली  होती.  अचानक तिला कसला तरी आवाज ऐकू येतो. जेव्हा ती आसपास पाहते तेव्हा तिथे कोणीच नसते. ती थोडीशी घाबरते. त्यानंतर तिच्या असे लक्षात येते की दोन मुंग्या आपापसात  संभाषण करीत होत्या आणि त्या येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या घराला पाण्यापासून कसं वाचवायचं या विषयांवर बोलत होत्या.  तिला क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना.  पण त्यानंतर ती सावरते  आणि तिच्या लक्षात येत की तिला  मुंग्यांची भाषा ऐकू येत आहे आणि समजत आहे.  जेव्हा ति मुंग्यां बरोबर बोलायला सुरुवात करते  तेव्हा मुंग्यां तिला असे काही मंत्र देतात ज्या मुळे तिला बऱ्याच इतर प्राण्यांच्या भाषा समजू लागतात. मुंगी  दिसायला जरी लहान असली तरी तिच्यात खूप  शक्ती.  मुंगीला  लक्ष्मीचा अवतार पण मानले जाते म्हणूनच म्हणतात की जर तुम्ही मुंग्यांना साखर टाकली  तर तुमची प्रगती  झाल्याशिवाय राहत नाही. 

गुप्त धनाची प्राप्ती (Hidden treasure)

 असो आता बऱ्याच प्राण्यांकडून आणि पक्षांकडून तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या.  मुंगूस सारखे प्राणी तिला गुप्ता धानाचे रस्ते दाखवत होते.  मुंगूस कुबेराचे वाहन मानले जाते आणि मुंगसाला गुप्त धनाबद्दल पूर्ण ज्ञान असते.  त्यानंतर निळावंतीच्या च्या लग्नाचा योग जुळून येतो आणि तिचे लग्न होते. 

लग्नानंतर निळावंती ला घ्यायला तिचे सासरे बैलगाडी बैलगाडीतून येतात.  जेव्हा ती आपल्या सासऱ्यांबरोबर माहेरून सासरी जात असते, तेव्हा रस्त्यात तिला मुंगसाची एक जोडी दिसते.  त्या जोडीमधील मादी मुंगुसाचा आवाज तिला ऐकू येतो.  ती निळावंती ला सांगते कि माझा जोडीदार आंधळा आहे.  त्याला डोळे नाहीत आणि तो काही पाहू शकत नाही त्यामुळे कृपया माझी मदत कर.  निळावंती ला मुंगसाची  खूपच दया येते.  एव्हाना निळावंतीला   कुठल्या आजारावर कुठले  औषध लागू पडते याचे ज्ञान आलेले असते.   त्यामुळे ती त्या मादी मुंगुसाला एक लाल फडके देते आणि ते नराच्या डोळ्यावर बांधण्यास सांगते . आणि काय चमत्कार! लाडके बांधल्यानंतर त्या मुंगसाची गेलेली दृष्टी परत येते.  मुंगूस हा प्राणी खूपच कृतज्ञ असतो.  जर त्याला मदत केली तर तो त्याचे उपकार आयुष्यभर विसरत नाही.  एवढेच कशाला मुंगसाची साधे तोंड पाहणे ही खूपच शुभ समजले जाते.  निळावंतीने केलेल्या मदतीची परतफेड मुंगसाची जोडी तिला गुप्तधनाचा पत्ता सांगून करतात. 

 नाग आणि नागमणी 

त्यानंतर प्रवासात त्यांना एक म्हातारा माणूस भेटतो.  चालता चालता तो माणूस त्यांना साप आणि नागमणी यांची गोष्ट सांगतो.  तो तिला असे सांगतो की ज्याच्याकडे हा नागमणी असतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  हे ऐकताच निळावंती त्या मुंगसाच्या जोडीला बरोबर घेते  आणि नाग आणि नागमनी यांच्या शोधार्थ जंगलात निघते.  शोधता शोधता खूपच रात्र होते पण नंतर त्यांना  एक प्रकाश दिसतो.  जेव्हा ते या प्रकाशा  कडे जातात तेव्हा त्यांना असे दिसते की एक नाग  आपल्या मन्याच्या उजेडात भक्ष  शोधत आहे.  मुंगसाच्या  जोडीला ती त्या नागाला मारण्याची आज्ञा करते आणि नागमणी घेऊन तिथून निघते.  नागमणी प्राप्त झाल्यामुळे तिची शक्ती कितीतरी पटींनी वाढते. 

गुप्तधनाची चटक आणि प्रेत कुरतडणे 

 पण आता तिला गुप्तधनाची चटक लागलेली असते आणि ती जास्तीत जास्त धन  मिळवण्याचा प्रयत्न करत असते.  एके दिवशी मध्यरात्री निळावंती ला कोल्हे कुई  ऐकू येते.  कोल्हेकुई म्हणजे कोल्याचे  ओरडणे.  दोन कोल्हे  आपापसात बोलत असतात की नदीमधून एक प्रेत वाहत येत आहे.  त्याच्या कमरेला एक लाल कापड बांधलेल आहे ज्याच्या मध्ये काही मोती आहेत.   हे ऐकून निळावंती गुपचूप  सर्वांची नजर चुकवून त्या दिशेने जायला लागते.  याची चाहूल तिच्या नवऱ्याला लागते.  ही एवढ्या रात्रीचा कुठे जात आहे हे पाहायला तो तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो.  निळवंती नदीच्या त्या दिशेने जात असते तिथून ते प्रेत वाहत येत असते.  

ती त्या प्रेताला पकडते आणि त्याच्या कमरेला बांधलेले लाल फडके सोडवण्याचा प्रयत्न करते.  पण पाण्याने भिजल्यामुळे  त्याची गाठ  खूपच पक्की झालेली असते.  निळावंती ती सोडवण्याचा प्रयत्न करते पण ते तिला जमत नाही म्हणून ती ती गाठ दाताने सोडवण्याचा प्रयत्न करते.  जेव्हा निळावंती चा पती हे सर्व पाहतो तेव्हा त्याला वाटते की ही एक विचित्र बाई आहे आणि ती प्रेत  कुरतडून खात आहे म्हणून तो तिला सोडून देतो.  

नवऱ्याने सोडून दिल्यावर निळावंती ची अवस्था 

त्यानंतर निळावंति पुन्हा आपल्या माहेरी येते आणि आपला सगळा वेळ झाडे,पशू, पक्षी यांच्याबरोबर घालवायला लागते.  आता तिने जवळपास सर्वच प्राण्यांच्या भाषा आत्मसात केलेल्या असतात.  

जेव्हा तिला  एखादे फळ खायची इच्छा होते तेव्हा ती माकडांना सांगत असे आणि माकडे ती  तीच्यासाठी आणून देत असत.  जेव्हा एखाद जंगली जनावर तिच्या आसपास येई, तेव्हा आकाशातले पक्षी तिला त्याची सूचना देत असत.  आता ती  पूर्णवेळ पशुपक्ष्यांनमध्येच राहायला लागते. आता  निसर्ग पशुपक्षी किडामुंगी याच तिच्या जीवनाचा  अविभाज्य भाग बनले होते. 

निळावंतीला पडलेले स्वप्न, निळावंती  ग्रंथ आणि तिचा मृत्यू  (Nilavanti's dream and death)

एके  दिवशी तिला असे स्वप्न पडते  की जी विद्या तिला माहित आहे तिचा वापर स्वतःपुरता न करता गरिबांसाठी पण करावा.  पण नवऱ्याने सोडून दिल्यानंतर निळावंती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचते  आणि तिला माहित असते  की ती आता जास्त दिवस जिवंत राहणार नाही.  तेव्हा ति हे सारे मंत्र ही सारी विद्या लिहिण्याचा निर्णय घेते आणि हे सर्व मंत्र एका ताम्रपत्रावर  लिहून काढते.  जेव्हा हा ग्रंथ लिहून पूर्ण होतो  त्यानंतर तिचा अंत होतो.  

निळावंतीच्या मृत्यू नंतर... (After the death of Nilavanti)

जेव्हा हा ग्रंथ तिच्या  वडिलांना सापडतो आणि वाचल्यानंतर ते पूर्णपणे वेडे होतात. हा ग्रंथ जेव्हा एका साधूच्या  हातात पडतो  तेव्हा साधू यातील सर्व विद्या आत्मसात करतो आणि आपल्या शिष्यनाही  शिकवितो.  

 निळावंती ग्रंथ कसा वाचावा? (How to read Nilavanti Granth)

या पुस्तकांमध्ये हे मंत्र कसे सिद्ध करायचे हे सर्व सांगितले गेले आहेत पण याच्यामध्ये हेही सांगितले गेली आहे या विद्येचा दुरुपयोग केला तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि ती व्यक्ती वेडी होईल त्यामुळे ज्यांना कोणाला ही विद्या आत्मसात करायची आहे त्यांनी एकदम निस्वार्थ भावनेने हे पुस्तक वाचले पाहिजे.(Nilavanti granth marathi online) 

पण हे पुस्तक वाचणे एवढे सोपे नाही.  हे पुस्तक आपल्याला अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली वाचले पाहिजे.  हे पुस्तक एकट्याने वाचण्याचा प्रयत्न करू नये.  एकदा हे पुस्तक  वाचायला चालू केले तर ते मध्येच सोडता येत नाही आणि ते वाचून पूर्ण करावे लागते.  

हे पुस्तक कधीही वाचता येत नाही

जेव्हा एखाद्या गरोदर बाईचा अंत होतो आणि तिच्या चितेला अग्नी दिला जातो त्या  चितेच्या अग्नीच्या प्रकाशात हे पुस्तक वाचावे लागते तरच यातील विद्या आत्मसात होतात. पुस्तकाच्या सुरुवातीलाच मुंग्यांची भाषा दिलेली आहे असे म्हणतात. 

एकदाका जर तुम्ही ती आत्मसात केली तर तुम्हाला बाकीच्या प्राण्यांच्या भाषा सुद्धा अवगत होतात. हे पुस्तक एक आड  एक पान सोडून वाचावे.  जगात खूप कमी लोक असे आहेत ज्यांनी हे पुस्तक वाचून पूर्ण केले आहे कारण पुस्तक वाचणारा एक तर वेडा होतो किंवा हा त्याचा मृत्यू होतो. 

निळावंती ग्रंथ कोठे मिळेल?

कोल्हापूरच्या एका शंभर वर्षांपेक्षा जुने लायब्ररीमध्ये हे पुस्तक पाहिले गेल्याचा दावा केला जातो(Nilavanti granth Marathi). आतापर्यंत  बर्‍याच जणांनी हे पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेच लोक अजूनही प्रयत्न करीत आहेत.  हे पुस्तक म्हणजे एक अंधश्रद्धा आहे किंवा सत्यकथा याबद्दल कोणालाच फारसे काही माहीत नाही. 

जर कोणाला ही विद्या शिकायची असेल तर आधी त्या बद्दल पूर्ण माहिती घ्यावी.  दिवाळीच्या दिवशी दारावर येणाऱ्या पिणाऱ्यांना याबद्दल बऱ्यापैकी माहिती असते.  कारण हे ज्ञान त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेले असते.  त्यांच्या कडव्यांमध्ये निळावंती चा उल्लेख आवर्जून केला जातो. 

योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर हे पुस्तक वाचले तर तुम्हाला हे यामध्ये सफलता मिळू शकते.  आजकाल इंटरनेटच्या युगात निळावंती च्या नावावर खूप सारी  नकली पुस्तके विकली जात आहेत त्यांना घेऊन काही फायदा नाही.  यामध्ये ग्रंथाबद्दल बद्दल अत्यंत तोटकी माहिती दिली आहे.  

निळावंती चा खरा ग्रंथ कसा ओळखावा याबद्दल काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.  जर आपल्याला असा ग्रंथ मिळाला तर  तो  उघडताच वारे वाहायला लागतात.  हे पुस्तक उघडल्यानंतर शेवटच्या पानावर ची शेवटची ओळ वाचावी असे म्हणतात. 

त्यानंतर जर आपले  डोके जड झाले आणि आपल्याला खूपच झोप यायला लागली तर समजावे की ते पुस्तक ओरिजनल आहे.  ओरिजनल पुस्तक हातात येताच ते आपला प्रभाव दाखवते.  

तर हि आहे निळावंती ची कहाणी.

Source: संदर्भ Facebook सर्व दुर्मिळ पुस्तके निलेश सरवणकर