5.28.2021

आला काजवा महोत्सव: काजव्यांचा विणीचा हंगाम

 

आला काजवा महोत्सव:  काजव्यांचा  विणीचा हंगाम

निसर्ग हा नवलाईने नटलेला असुन प्राणी – पक्षी हे नेहमीच माणसाच्या कुतुहलाचा विषय असतात. अशापैकिच दुर्मिळ असलेला किटक म्हणजे काजवा... स्वयंप्रकाशित असलेला  हा किटक रात्रिच्या अंधारात चमकु लागल्यावर आपले लक्ष वेधुन घेतो.

पण ते येतात कोठून जातात कुठे, खातात काय? या बद्दल फार थोडी माहित लोकाना आहे.  खर तर काजव्यांचे चमकने हा निसर्गाचा चमत्कार आहे. काजव्याच्या पिढिचा वारसा पुढे चालु ठेवन्यासाठी 2 सेमि किटकाला निसर्गाने त्याला दिलेला अनमोल दागिना आहे. जो पावसाळ्याच्या तोंडावर आपले  लक्ष  वेधुन घेतो.  सध्या शहरांच्या आसपास हे काजवे दिसत नसले तरी अजुनही गावांमधे, घनदाट जंगलांत किंवा गड किल्ल्यांवर पावसाळ्यातील संध्याकाळे हे लुकलुकणारे काजवे उडताना दिसतात.  काजव्यांचे चमकने खरे तर  हे  प्रकाशाद्वारे एकमेकांशी  संवाद असतो. तो संवाद कशासाठी? एक तर मिलणासाठी किंवा दुसरा भक्षक आला तर त्याच्यासाठी . काजवे हिरवा, लाल पिवळा , निळा, रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात.  काजव्यांच्या या प्रकाश निर्मितिच्या प्रक्रियेला बियोलुमिनिसेन्स अस म्हणतात.  पोटामधल्या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज जैव रसायनाचा  ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. ऑक्सिजन आणि मॅग्नेशियमही महत्वाची भूमिका बजावतात. 

काजव्यांचे  चमकणे ही मादीला मिळवण्यासाठी नरांच्या मध्ये असलेली स्पर्धा असते. ज्या नराचा प्रकाश जास्त तो नर मादी निवडते.  आणि  जोडीदार निवडीच स्वातंत्र्य हे मादीला असत.  बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. मात्र त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो.

अंटार्क्टिका खंड वगळता जगभरात सगळ्या देशांमधे काजवे आढळतात. जगभरात २००० जाती असून त्यात सतत नविन उपजातींची भर पडत असते. यापैकी सात ते आठ जाती भारतात आढळतात.

काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो.   

बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात.

काजव्याचे चमकने कधी-कधि त्याच्या जीवावर बेतते. काही इतर जातीच्या काजव्याच्या माद्या घेतात. त्या प्रकाशून नराला प्रतिसाद देतात पण तो नर मादीच्या जवळ आल्यावर चक्क त्याला खाउन टाकतात.  खर तर काज्व्याच्या नराचे जीवन हे इतर कीटकाप्रमाणे क्षणभंगुर अस्ते. क्षण एक पुरे  प्रेमाचा,  वर्षाव पडो मरनाचा या उक्तिप्रमाणे मादिशि  मिलन झाल्यानंतर नर मरण पावतो. मिलनानन्तर मादी जमिनीखाली अंडी घालते व तीही मरून जाते. तीन ते चार आठवड्यात अंड्यातुन अळी बाहेर पडते. काजव्याच आयुष्य अंडी, अळी, प्रौढ या चक्रातून जात. अंड्यातून अळी बाहेर पडली की वर्षभर काजवे अळी या स्थितीत राहतात. काजवा मांसभक्षक असुन गोगलगाय व तत्सम प्राण्यांवर आपली गुजराण करते.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर हजारो-लाखो काजवे विणीच्या हंगामासाठी एकत्र जमतात आणि आपली प्रेम आराधना करत असतात हे दृश्य पाहण्यासाठी खूपच विलोभनीय असते म्हणूनच अनेक जंगलांमध्ये हे विलोभनीय दृश्य आपल्या नजरेत साठवण्यासाठी किंवा कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी शेकडो लोक दरवर्षी जमत असतात. यालाच अलीकडे काजवा म्होत्सव म्हणतात. राधानगरी, भंडारदरा, कळसूबाई च्या जंगलात व पश्चिम घाटातील बहुतांश जंगलात ह्जारोंच्या संख्येने लोक हजेरी  लावत  असतात मात्र विलोभनीय कीटकाच्या स्वातंत्र्यात अडथळा निर्माण करीत असून भविष्यात काजव्याचे अस्तित्व संपुष्टात येईल की काय अशी स्थिति निर्माण झाली आहे.  सध्या पावसाळा तोंडावर आला असून आपल्या परिसरात सुद्धा हे कीटक आपल्याला पाहावयास मिळण्याची शक्यता आहे तेव्हा निसर्गप्रेमी मंडळींनी आणि नागरिकाने आपल्या परिसरात जरूर या काजव्यांचा अनुभव घ्यावा आणि कोणताही अडथळा निर्माण करतात याची अनुभूती घ्यावी.

 

 

प्रा. डॉ. विधिन  कांबळे

प्राणी शास्त्र विभाग

सांगोला महाविद्यालय सांगोला

5.26.2021

७०% चा मंत्र

                             ७०% चा मंत्र

दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फूट इतके लहान आहे, परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे, तरीसुध्दा त्याचे घर हे लहान आहे. म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात, तो साधी कार व आयफोनचे जुनेच मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस. त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला.

*महाग फोन* : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखापर्यंत मिळते, परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्स व्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशल मीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्येसुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व अॅप निरुपयोगी, काही कामाची नसतात.

*महागडे घर* : आजकाल मोठे मोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे लोक अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

*महागडी कार* : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रँडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर लोक कार तर घेतात. परंतु सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर बसने किंवा लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियासोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.


*महागडे कपडे* : उच्च, आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रँडेड रेडिमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी वापरले जातात, बाकी ते कपाटातच पडून राहतात आपण घेतलेले महागडे कपडे हे बऱ्याचदा निरुपयोगी असतात, ते फक्त ठराविक वेळीच वापरतो नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत.

*मित्र/नातेवाईक* : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात, जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात, कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत करत नाहीत. गर्दी पेक्षा दर्दी लोकांत रहा.

*कमाविलेला पैसा* : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते. ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच त्याला उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल तर त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच खाणार. काही लोक रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात, शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधला का?

*भांडी व साड्या*: आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात, परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिकलाईफ स्टाईल म्हणून फार कमी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या वापरल्या जातातत्यामुळे त्यांचा वापरही ७०%ही होत नाही. 

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तूंवर वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तू खरेदी करण्याचे वेड असते, परंतु पाश्चात्य देशातील अनेक लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुद्धिमता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते.