7.30.2019

आपल्या परिसरातील विदेशी झाडे आणि देशी झाडांचे महत्व (Importance of Trees)

आपल्या परिसरातील  विदेशी झाडे 
आणि देशी झाडांचे महत्व 

उन्हाळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गुलमोहर नेहमी आपल्याला आपला वाटतो. वस्तीव्क पहाता हा वृक्ष मादागास्कर येथून भारतात आला आहे.  भारतभर आढळणारे  निलगिरी, १९७२ साली ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणले. युरोप मधून आयात केलेल्या धान्या बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवरआपले वर्चस्व  जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे .




  निलगिरीचे झाड 
गाजरगवत अर्थात पार्थेनियम तण किंवा आपण त्याला  आणि काँग्रेस गवत म्हणतो हे हानिकारक तण दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे  गव्हाबरोबर आले. हे तण इतके माजले की त्याचा बंदोबस्त करणे मुश्कील झाले.
 व ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .

अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचेdदिसून येते.
 या झाडांच्या फुलात परागकण नसल्यामुळे  त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ..या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत . या विदेशी झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे.  ही विदेशी झाडे इतकी निरुपयोगी आहेत की त्याला आपल्याकडे असलेली  गाय ,बैल ,शेळीसुद्धा त्यांना खाण्यासाठी तोंड लावत नाहीत .निसर्गात वावरणाऱ्या प्राण्यांना ही यांच्या मुले धोका निर्माण झाला आहे. अशा निरुपयोगी झाडामुळे अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे असे अनेक प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत .
आपण सगळे डोंगर व मानवनिर्मित जंगले पहातो ती सगळी ग्लिरिसिडीया या विषारी झाडांनी भरलेली दिसतात.  या  झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ...या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जात. 
१९७०च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.
 परदेशी  झाडाच्या पानाचा धुर, वास, अथवा पराग कनामुळे अनेकांना अलर्जी झाल्याचे आढळून आले आहे. या  शरीर सुजने,  शिंका येणे,मळमळ होणे, दमा  इत्यादी त्रास उद्भवतात.
परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत.

 देशी झाडेचे महत्व

 आपल्याकडे पुरातन काळापासून अनेक वृक्ष आपले महत्व टिकून आहेत. कारण ते इथेच रुजतात आणि मानवाला कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाढतात. हे वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्य बरोबरच पक्षी-प्राणी यांसाठी वरदान ठरतात. या झाडांच्या बरोबर अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. 
पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढण्यास  मदत होते. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत या झाडांच्या मुळ्या खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते . ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे .
सुगरण पक्ष्याचे घरटे 
 देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, , सीताफळ, रामफळ अशी साधारणपणे  ३५० पेक्षा जास्त जातीची झाडांचे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात.   
बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कडुनिंब ,मोह, पळस शिसव, पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज,कवठ, बेल,  ही झाडे आदी स्थानिक झाडांची लागवड करणे गरजेचे असताना. जी झाडे आपली नाहीत, जी झाडे हिरवी दिस्तात्त, खूप मोठ्या प्रमाणावर पाणी शोसतात, आणि प्राणी पक्षांना निराधार ठरतात त्या झाडांचा लोक अवलंब करीत आहेत. अशा लोकांनी वेळीच देशी वाणाची माहिती जाणून घ्यावी. अन्यथा आज जेवढी  जैवविविधता अस्तित्वात आहे ती आपल्याला भविष्यात दिसेल कि नाही सांगता येणार नाही. 

आपण कोणते झाड लावावे, त्याचे काय फायदे आहेत व झाड लावणाऱ्याला कोणते फल मिळणार याचे विवेचन करणारा एक सुंदर श्लोक आहे. तो खालील प्रमाणे.

  अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
 कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।

अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.
 हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय .



सौजन्य वन्यजीव प्रेमी whatsapp.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।। - Dr. Vidhin Kamble

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
श्री संत तुकाराम 

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात ओक्सिजन असलेली हवा शिरते आणि त्याच्या या निसर्गात जगण्याचा प्रवास सुरु होतो. जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत निसर्गाने मोफत दिलेले घेऊन जगत असतो पण त्याला त्याची जाणीव होत नाही. जणू देवाने त्याच्याच साठी हा निसर्ग बनवला आहे असे वाटते. परंतु मानवाने या गोष्टीकडे बारकाईने पाहून त्याची किंमत ठरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला हे निसर्गाचे कर्ज सात जन्मात फेडता येणार नाही. या कर्म करंट्या मानवाला थोडासा हिशोब करून दिला पाहिजे म्हणजे त्याचे डोळे उघडतील. आणि आपलाही या निसर्गाचे काहीतरी देणे लागतो एवडे समजले तरी या लेखाचे सार्थक झाले असे मी समजेन.
एक व्यक्ती २४ तासात २७ हजार वेळा  श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी त्याला दररोज ३ कीलो ओक्सिजनची गरज भासते. आणि ती गरज पुर्ण करण्यासाठी ७ मोठ्या वृक्षांची गरज असते. ३ किलो ओक्सिजनची बाजारातील किंमत वर्तमान  बाजारभावानुसार २१०० /- रु आहे. जर एक व्यक्ती आपले आयुष्य ६५ वर्षे जगला तर तो या निसर्गातून ५ कोटी रुपयाचा ओक्सिजनची मोफत वापरतो. मोबदल्यात स्वतःच्या श्वासोच्छवासा साठी लागणारे १  झाड सुध्दा लावत नाहीत .उलट मृत्यूनंतर अग्निसंस्कारासाठी लागणाऱ्या ९ मण (३६० किलो)  लाकडासांठी एका मोठ्या वृक्षाचा बळी दिला जातो. विचार करा जेवढी आपली आयुष्यातील एकूण मिळकत नसते तेवढ्या कोटी रुपयाचा ओक्सिजनची  आपण निसर्गातून मोफत वापरतो पण त्याची परतफेड आपण कधीच करीत नाही
या निसर्गाची परतफेड करायला शिका. झाडे लावा झाडे जगवा.  आणि पुढच्या पिढ्यांनाही जगण्याचा हक्क प्राप्त करून द्या. 


7.28.2019

सापांचे जग (The World of Snake )

सापांचे जग

आपल्या देशात सुमारे २५६ प्रकारचे सर्प आढळून येतात त्यातील ६९   प्रजाती या विषारी आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण ५५ सर्पजाती आढळून येत असून त्यातील नाग, मण्यार,घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत.



 नाग (Cobra) विषारी साप



 घोणस (Viper) विषारी साप

उर्वरित सर्व प्रजाती उदा.धामण, कवड्या, डुरक्या-घोणस, नानेटी, हरण टोळ, श्वान सर्प,  मंडोल (दुतोंड्या),  रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडणाऱ्या प्रजाती असतात.


हरणटोळ साप  (Tree snake)  बिनविषारी साप

                                                                 धामण ( Rat Snake) बिनविषारी साप




साप हे  जमिनीत बिळे, दगड-विटांचे  ढिगारे, झाडाझुडपातील जागा, मोकळी मैदानी जागा, भात शेती तसेच सपाट  भूभाग ही सर्पांची मुख्य आश्रय स्थाने आहेत. मात्र जागतीकीकरणामुळे, गगनचुंबी इमारतीच्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते आणि हे सर्प निसर्गाकडून मानवी वस्तीत येतात.


कोणत्या प्रकारचा सर्प घरात आल्यास त्याला न मारता, निष्णात आणि अनुभवी साप पकडणाऱ्यास बोलवावे,
घराजवळ लोकांची गर्दी करु नये, सर्पास  कपाटामागे अडगळीत, बिळात तसेच  खोलीच्या आतील बाजूस जाण्यापासून रोखावे,  संध्याकाळच्या वेळेस दारे बंद ठेवावीत. घरातील, पडवीतील दिवे लावावेत,
विजेरी पटकन मिळेल अशा ठिकाणी ठेवावी .सापास घरातून बाहेर हुसकावण्यास लांब काठी, तारेचा आकडा,
छत्रीचा आकडा यांचा उपयोग करुन सर्पास मानवी वस्तीपासून दूर सोडावे.

 विषारी बिन-विषारी सर्पाचा दंश 
सर्वसाधारणपणे सर्पाचा दंश माणसाच्या हाताला किंवा पायाला होत असतो. दंश झालेल्या ठिकाणी तो साप जर विषारी असेल तर  त्या जागी विषदंतांच्या दोन खुणा स्पष्टपणे आढळून येतात आणि साप जर बिनविषारी असेल तर तशा खुणा आढळून येत नाहीत.








 विषारी सर्प दंशाची लक्षणे

 सर्पाचे विष फिकट पिवळसर  आणि पारदर्शक असून काहीसं चिकट असतं.मज्जासंस्थेवर परिणाम करणारे न्युरोटॉक्सीक  आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे हिमोलॅटीक असे त्याचे दोन प्रकार असतात.


नाग, मण्यार समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जा संस्थेवर विषाचा परिणाम होतो व त्याचे पुढील
दुष्परिणाम दिसून येतात.

  1. दंशाच्या जागी सूज येऊन बधीरपणा येतो. 
  2. श्वासोच्छवासास त्रास होतो. जीभ आत ओढली जाते. 
  3. तोतरेपणा येतो, डोळे मिटू लागतात, 
  4. व्यक्ती बेशुद्धावस्थेतून कोमात जाण्याची शक्यता निर्माण होते. 
  5. विष हृदयापर्यत गेल्यास पांढऱ्या रंगाचा फेस तोंडातून बाहेर पडतो
  6. तो तोंडावाटे बाहेर पडू श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आणि अखेर हृदयक्रिया बंद पडून
  7. माणसाचा मृत्यू ओढवतो.

- रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या विषाची (सर्पदंशाची) लक्षणे कोणती?*

  • एखाद्या व्यक्तीला घोणस, फुरसे,
  • हिरवा घोणस या सर्पांनी दंश केला असता त्याच्या विषाचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या रक्ताभिसरणावर होतो.
  • सर्पदंश झालेल्या जागी बरीच सूज येऊन तो भाग हूळहूळा होऊन लालसर दिसू लागतो.
  • त्वचा काळी निळी पडते. रक्तवाहिन्यातील रक्तात गुठळ्या निर्माण होऊन ते रक्त तोंड,नाक, कान याद्वारे बाहेर पडू लागतं. शरीरात
  • विष अधिक प्रमाणात भिनल्यास पोटातील आतडी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे विष महारोहीणी द्वारे हृदयापर्यंत जाते
  • आणि अखेर शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयास न झाल्याने मृत्यू होतो.

 सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार


सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर दहा ते पंधरा मिनिटांच्या आत प्रथमोपचार आवश्यक आहे.
सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉल च्या पाण्याने धुवावी. हाताला सर्पदंश झाला असल्यास कोपराचे वर म्हणजेच दंडावर (एकेरी हाडावर ) पायास सर्पदंश झला असता गुडघ्याच्यावर (एकेरी हाडावर ) म्हणजेच मांडीवर दोरी किंवा कापडाचा तुकडा, दुपट्टा, वडाची पारंबी, केळीचे सोप, केपर बँडेज, किंवा आवळपट्टी बांधावी ज्यामुळे सर्पाचे विष शरिरातील अन्य भागात पसरण्यास मज्वाव होईल.
 नाग, मण्यार या सर्पांद्वारे दंश झाल्यास चिरा छेदन पद्धतीचा उपयोग करता येतो. सर्पदंशाचे दोन व्रणांवर पाव सेंटीमीटर लांब, रुंद आणि खोल  अशी तिरपी चिर द्यावी .जेणेकरुन जखम  उघडी होऊन त्या द्वारे ५० टक्के विष
आणि विषारी रक्त शरीराबाहेर पडून प्रवाहित होईल.

पोटॅशियम परमँगनेट (KmNO4)च्या द्रावामध्ये विषातील २६ विषघटकांपैकी ५० टक्के विष-घटकांचे
निराकरण करण्याचे सामर्थ असल्याने एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात पोटॅशियम परमँगनेटचे चार ते पाच कण टाकून ढवळावे व सर्पदंशाच्या जागेवर याची संतत धार धरावी.



सौजन्य -वन्यजीव प्रेमी,whats app